Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(दाराआडचा मुलगा)

ज — ज्ञानोबाचे पैजार, गुरुवार, 04/04/2019 - 06:24
पेरणा एक मुलगा दाराआडून चोरून चोरून बघतो आहे बाहेर किती बाहेर? बाथरुमच्या बाहेर, खोलीमधे जिथे त्याची मैत्रीण बसली आहे मोबाईल वर गेम खेळत त्याचीच वाट बघत, करत असेल का ती ही तिकडून जाण्याचा विचार? समजले असेल का तिलाही तो चोरून तिच्या कडे बघतो आहे, तिच्या जाण्याची वाट बघत ? मुलगा दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... कारण तो टॉवेल आणि कपडे खोलीत विसरला आहे, ते नेमके त्या मुलीच्याच शेजारी पडलेले आहेत, मुलगी मात्र गुंग होऊन मोबाईल मधे बघत असते.... टॉवेल विसरलेला मुलगा बाथरुमच्या दाराआडून बघत राहतो... हताशपणे वाट बघतच राहतो.... पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
13514 वाचन

💬 प्रतिसाद (21)
स
संजय पाटिल गुरुवार, 04/04/2019 - 06:47 नवीन
भन्नाट..... तेही फक्त ७ मिनीटात?
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल गुरुवार, 04/04/2019 - 06:49 नवीन
सॉरी सॉरी... तारीख बघीतली नाही.... १ दिवस ७ मिनीटे...
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे गुरुवार, 04/04/2019 - 07:18 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 04/04/2019 - 08:09 नवीन
हाण्ण ति चाय ला
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी गुरुवार, 04/04/2019 - 08:14 नवीन
या गतीने विडंबने येत राहिली तर दहशतीने बहुधा नवीन कविता येणार नाहीत. ;-)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 04/04/2019 - 08:41 नवीन
प्रत्येक गोष्टीचे वर्तूळ असते. चढणे आले अन बुडणे आलेच. पुल म्हणतात त्याप्रमाणे तो विश्वेश्वर घट्ट आहे. त्याला कसलेतरी सोयर नाही अन कसलेतरी सूतक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
त
तुषार काळभोर गुरुवार, 04/04/2019 - 08:55 नवीन
बाथरुमच्या दाराआडून बघत राहतो... हताशपणे वाट बघतच राहतो....
मुर्ख लेकाचा!!!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/04/2019 - 09:05 नवीन
मी म्हणतो असल्या इंग्लिश आंघोळी कराव्याच कशाला? ;)
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 04/04/2019 - 12:12 नवीन
या मुलाच्या दाराआडुन बघण्याला आणि बाहेर न येण्याला काहीतरी लॉजिक आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 04/04/2019 - 12:43 नवीन
मराठीत सुलभ अर्थ प्लीज..
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 04/04/2019 - 13:27 नवीन
जबराव जबराव जबराव झ्याक झालंय मज्या आली
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय गुरुवार, 04/04/2019 - 13:40 नवीन
हा हा...... इडंबनाचं पेव फुटलंय राव मिपा वर चांगलंय .. चांगलंय ..
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/04/2019 - 13:40 नवीन
दाराआड लै जण झाले म्हणून धागा न काढता अ‍ॅक्चुअल दाराचा मुलगा इथेच.. . . . एक मुलगा दाराआडून बघतो आहे बॉलीवूड किती ते प्रचंड? फसलेल्या हिरोगिरीचे, नसलेल्या कुवतीचे बिगबॉसच्या बक्षीसाचे, फिक्सिंगच्या अटकेचे... दारा करत असेल का त्याचा विचार? शिकवलं असेल का त्याला कधीतरी. अचाट ताकतीसोबत राखलेला संयम. पौराणिक पात्रे साकारतानाचे संस्कार. मुलगा ते नाही घेऊ शकत. दारा आपले काम करतच राहतो. जब वी मेट चा पूर्ण पिकलेला सरदार मुलाला कामावरची निष्ठा शिकवत राहतो वय हरवलेला मुलगा आता हनुमानाच्या रोलमध्ये दिल्लीत रामलीला करत राहतो....
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 04/04/2019 - 13:44 नवीन
एकच फाईट वातावरण टाईट. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
त
तुषार काळभोर गुरुवार, 04/04/2019 - 14:34 नवीन
लै भारी लै भारी लै भारी लै भारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ग
गोंधळी गुरुवार, 04/04/2019 - 13:45 नवीन
मुलगी मात्र गुंग होऊन मोबाईल मधे बघत असते.... टॉवेल विसरलेला मुलगा बाथरुमच्या दाराआडून बघत राहतो... हताशपणे वाट बघतच राहतो.... मोबाईलमुळे होणारा दुष्परीणाम सांगीतला आहे.असे वाटते.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या गुरुवार, 04/04/2019 - 18:09 नवीन
ज्ञानोबाचे पैजार, अभ्या भौ .... मस्त !! :))
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या गुरुवार, 04/04/2019 - 18:09 नवीन
ज्ञानोबाचे पैजार, अभ्या भौ .... मस्त !! :))
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर गुरुवार, 04/04/2019 - 23:03 नवीन
तुफान! मैत्रिणीलाच का नाही सांगत टुवाल द्यायला?
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 04/05/2019 - 18:04 नवीन
Kadak !!
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 04/21/2019 - 10:15 नवीन
आंघोळ करत असल्याने हा घोळ झाला आहे. त्याने मैत्रीण अंमळ बिनांघोळीची असेल आणि याच्याच आमंत्रण इच्छुक असेल तर नो घोळ नो टोळ. अखिल मिपा पायघोळ ते पांजरपोळ संघाच्या "गुलाबी खुसपुस" या अनियतकालिकाच्या धोत्र्याची फुले या सदरातून साभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा