Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

( दाराआडचा वास )

ख — खिलजि, गुरुवार, 04/04/2019 - 13:36
कुबट वास दाराआडुन पडतो आहे बाहेर किती बाहेर? यत्र तत्र सर्वत्र , नाकाच्या आर पार नाकातले केस जळून जात आहेत , जळत आहेत किती वेळ ? पोटातले ढवळतंय, येतेय बाहेर, कोण आहे तिथे आत कुणी तरी एक बसला आहे स्तब्ध.... करत असेल का तो ही त्या भयानक वासाचा विचार? जळत असतील का त्याचेही नाकातले केस दरवाज्याबाहेर , दरवाज्याच्या पलीकडे? कुणी उभाही राहू शकत नाही , त्या वासाशिवाय ... मग मी माझे नाक घट्ट दाबून , आलेली कळही दाबून , डोळे आणि डोळ्यात जीव आणि पाणी घेऊन शांतपणे उभा राहतो.... वासाला चैत्र पालवी फुटलेली असते नाक नसलेल्या दाराआडून बहरत राहते... बहरतच राहते....

प्रतिक्रिया द्या
3341 वाचन

💬 प्रतिसाद (3)
च
चामुंडराय गुरुवार, 04/04/2019 - 13:38 नवीन
हा हा... भारी... इडंबनाचं पेव फुटलंय राव मिपा वर चांगलंय .. चांगलंय ..
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 04/04/2019 - 13:48 नवीन
नाक नसलेल्या दारा आडून बघत आहेत डोळे दारा आडच्या मुलीने फोडले आग्या मोहळाचे पोळे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 04/05/2019 - 13:34 नवीन
धन्यवाद चामुंडराय साहेब आणि पै बु काका ================== ============================================= घ्यावा म्हणतो मी थोडा तरी, कधी तरी, वास घ्यावा शांत बैसोनि एका कोपऱ्यात हळूच मागून हात फिरवावा खाजवुनिया दोन *पारीत त्याच बोटांचा वास घ्यावा कैसे वाटते आता ? कुणासही इचारू नये फाट्यावर मारावे यथेच्छ त्यालाही थोडासा त्रास द्यावा घ्यावा म्हणतो मी थोडा तरी, कधी तरी, वास घ्यावा कोण म्हणते होत नाही आमचा टाईमपास चला होऊया सहभागी या वासांदोलनात दहापैकी कुठलेही एक आवडते घालावे आत मस्तपैकी घ्यावा नाकाने वास घ्यावा म्हणतो मी थोडा तरी ,कधी तरी, वास घ्यावा सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर एक अलिप्त कोपरा शोधावा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा