Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(दाराआडचा दगड)

M — mrcoolguynice, गुरुवार, 04/04/2019 - 14:20
एक दगड दाराआडून बघतो आहे मिपाबाहेर किती बाहेर? वास्तविकतेच्या बाहेर, भावनांच्यावर स्वार जिथे एक कवयत्री बसली आहे स्तब्ध.... करत तरी असेल का तो क्षणभर तिचा विचार ? जात असेल का हो तोही विडंबनाच्या बाहेर, ट्रोलीकतेच्या पलीकडे? का टाळ कुटातून तो बाहेरच येऊ शकत नाही... अशा बेइमान उजेडात मग कवयत्री तिच्या जिंदगाणीचा अनुवाद वात करून पाठवते, अंधारात दगड शांतपणे जागा राहतो.... कारण त्याला आजकाल पाझरायलाच होत नाही, हळूहळू आपण डोकी गहाण ठेवणारा ठोंब्या कसा झालो,हे त्याचं त्याला कळत नाही; विझणारी ती मुलगी मात्र वात नसलेल्या कंदिलाआडून बघत राहते... बघतच राहते....

प्रतिक्रिया द्या
2195 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
पाषाणभेद गुरुवार, 04/04/2019 - 17:42 नवीन
दगडाचा उपयोग काय? किती मोठा आहे तो?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/04/2019 - 20:32 नवीन
हो ना, दगडाचा आकार कळला तर, तो दुसर्‍याच्या डोक्यात घालायचा की त्याच्यावर स्वतःचे डोके आपटावे, हे ठरविणे सोपे जाईल. ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 04/05/2019 - 06:24 नवीन
पण नशिब, दारा आडची वीट असे लिहिले नाही, (वीटेचे विविध उपयोग माहित असलेला सुलेमानमिया) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 04/05/2019 - 06:42 नवीन
हायला ! दारं आहेत तरी किती ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा