तिखटा-मिठाचा दलिया
Primary tabs

साहित्य :-
१ वाटी दलिया
१ मध्यम कांदा चिरून
१ टोमॅटो बारीक चिरून
घरात असतील त्या सर्व भाज्या-
प्रत्येकी अर्धी वाटी भोपळी मिरची बारीक चिरून, फ्लॉवरचे तुरे, गाजराचे तुकडे, बेबी कॉर्नचे तुकडे
१ ते २ चमचे मक्याचे दाणे
थोडे मटाराचे दाणे
सजावटीसाठी खोबरे, कोथिंबीर
फोडणीसाठी तेल
फोडणीचे साहित्य- मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल मिरचीचे २/३ तुकडे, ५ ते ६ कढिपत्त्याची पाने
अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा साखर, चवीपुरते मीठ
कृती :-
एका भांड्यान दलिया घेऊन तो चांगला भाजून घ्यावा (उपम्यासाठी रवा भाजतो तसा). एकीकडे सव्वादोन वाट्या पाणी घेऊन ते तापण्यास ठेवावे.
दलिया चांगला तांबूस भाजला गेला की त्यात कढत पाणी घालून २ वाफा आणाव्यात. म्हणजे तो चांगला फुलेल.
फ्लॉवरचे तुरे, गाजराचे तुकडे, बेबी कॉर्नचे तुकडे,मक्याचे दाणे व मटाराचे दाणे वाफवून घ्यावे.
एका भांड्यात तेल तापवून फोडणी करून घ्यावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यानंतर भोपळी मिरचीचे तुकडे व नंतर टोमॅटो घालून परतावे.
त्यात वाफवून घेतलेल्या भाज्या घालाव्यात. त्यात चवीपुरते मीठ, साखर व तिखट घालावे.
त्यानंतर त्यात उकडून घेतलेला दलिया घालावा. चांगले ढवळून घ्यावे. १ वाफ आणावी.
वरून खोबर, कोथिंबीर घालून, लिंबू पिळून गरमागरम सर्व्ह करावे :)
- हा तिखटा-मिठाचा दलिया अतिशय पौष्टिक असतो. तो पोटभरीचा होतो आणि चविष्ठ लागतो.
- गव्हाच्या खिरीसाठी उकडतो तसा दलिया कुकरातून शिट्ट्या करून उकडून घेतला तरी चालतो.
- उकडलेला दलिया फ्रिज मध्ये २ दिवस राहू शकतो.
- वर सांगितलेल्या सगळ्या भाज्या घरात नसतील तरी घरी उपलब्ध असलेल्या भाज्या घालून करता येतो.
-- शाल्मली.
वा! क्लासिक पाकृ...
फोटूही मस्त! :)
शाल्मली मॅडम, अजूनही अश्याच वैविध्यपूर्ण पाकृ येऊ द्या प्लीज..
तात्या.
छान फोटो!
दलिया घेऊन कृती छान! करून पाहीन..
फोटो जबरदस्त देता बुवा तुम्ही लोक्स.. :)
पाकृ ही मस्त आहे. आजच आणते दलिया..
धन्यवाद शाल्मली..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
भाज्या कांदा टोमॅटोबरोबर परतल्या (वाफवण्याऐवजी) तर चालेल का?
दलीया कुकरमध्ये उकडण्या आधी भाजायचा का?
फोटू अंमळ झांटामॅटीक आलाय.:)
रेवती
<<भाज्या कांदा टोमॅटोबरोबर परतल्या (वाफवण्याऐवजी) तर चालेल का?<<
चालेल.. पण दलिया घालण्यापूर्वी १ दणदणीत वाफ आण. म्हणजे भाज्या शिजतील.
<<दलीया कुकरमध्ये उकडण्या आधी भाजायचा का?<<
हो. भाज.
<<फोटू अंमळ झांटामॅटीक आलाय<<
धन्यवाद !
--शाल्मली.
सुचनेप्रमाणे करून बघीन.
रेवती
नक्की करून पाहणार.
परदेशात (इंग्लंड,अमेरिका इ.) दलिया कोणत्याही वाणसामानाच्या दुकानात मिळेल की फक्त भारतीय वाणसामानाच्या दुकानात? दलिया हा नक्की काय प्रकार आहे? डाळीसारखा काही प्रकार आहे काय?
(जिज्ञासू)बेसनलाडू
दलिया म्हणजे ज्यापासून आपण गव्हाची खीर करतो.. इथे कदाचित इंडीयन स्टोअरलाच मिळेल असं वाटते..
फोटो , पाकृ अप्रतिम. आई असं काहीतरी करायची असं आठवलं एकदम..
नक्कीच करून पाहणार..
गव्हाचा जाडसर रवा असतो व भारतीय वाणसामानाच्या दुकानात (सगळीकडे) मिळायला हवा.
माझ्या इथे मिळतो त्यात सगळे प्रकार एकदम येतात. म्हणजे कणिक चाळून बाजूला काढावी लागते. अगदी जाड तुकडे (जवळ जवळ गहूच असतो) वेगळे काढून जे काही मध्यम आकाराचे तुकडे मिळतात त्याचा करावा लागेल.
रेवती
दर आथ दिवसा॑नि होतो वाचायला मजा आलि
<<परदेशात (इंग्लंड,अमेरिका इ.) दलिया कोणत्याही वाणसामानाच्या दुकानात मिळेल की फक्त भारतीय वाणसामानाच्या दुकानात? <<
बहुदा तो फक्त भारतीय वाणीसामानाच्या दुकानातच मिळेल. इथे जर्मनीत तरी फक्त तिथेच मिळतो.
<<दलिया हा नक्की काय प्रकार आहे? डाळीसारखा काही प्रकार आहे काय<<
नाही. दलिया म्हणजे गव्हाचे बारीक बारीक तुकडे. गव्हाची खिर करण्यासाठी जो पदार्थ वापरतात तोच दलिया
--शाल्मली
फोटो मस्त,पाकृही छान!
पण मला मात्र दलियाची खीर (नारळाचं दूध +गूळ वाली )जास्त आवडते,उपम्यापेक्षा :)
स्वाती
छान पाकृ. करून बघीन.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद !
शुभेच्छा :)
--शाल्मली.
नक्की करुन पाहीन ..