Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दाराआडचे घड्याळ

च — चित्रगुप्त, Fri, 04/05/2019 - 16:34
. एक घड्याळ दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर ? स्वतःच्या बाहेर, शतकानुशतकांच्या पार... जिथे आहे एक लंबकाचे घड्याळ... . आणि एक वाळूचे घड्याळ... . अजुनही मागे मागे.... जिथे आहे घंगाळात तरंगणारे घटिका पात्र . भिंतीवर कोरलेले सावलीचे घड्याळ... . आणखी कितीतरी चित्रविचित्र घड्याळं... ... आणि खूप खूप पूर्वी वाळूत खोवलेला लाकडाचा एक तुकडा.... . पूर्वी कधीतरी सव्वा अकरा वाजता बंद पडलेलं ते घड्याळ जर्जर इमारतीच्या तुटक्या दाराआडून बघतच रहाते... बघतच रहाते... .

प्रतिक्रिया द्या
8363 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 04/05/2019 - 16:44 नवीन
सचित्र कविता आवडली फारच आवडली. भिंतीवर कोरलेले सावलीचे घड्याळ पहिल्यांदा पाहिले मस्त आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
करमरकर नंदा Fri, 04/05/2019 - 20:34 नवीन
टिक टिक टिक... चलती जाए घडी... दोन घडीचा डाव म्हणत म्हणत घड्याळांची अंगडी टोपडी बदल्याचे गीत बनवून वेळात वेळ काढून टाकलेला धागा भावला.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 04/06/2019 - 12:13 नवीन
घंटा नाहीये का घड्याळात? अन चित्रमय विडंबन आवडले. अन आधूनीक चित्रकलेत ते डोळे बाहेर येतात, दोन नाकं, एकच कान असं असत ते मुळ कवितेत फिट बसते.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sat, 04/06/2019 - 18:14 नवीन
"आज्जीजवळी घड्याळ, कसले आहे चमत्कारिक" हि मुळ कविता आणि "शरदाजवळी आहे घड्याळ, कसले चमत्कारिक" हे विडंबन आठवले.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 04/06/2019 - 20:52 नवीन
पैजारबुवा, नंदा करमरकर, पाषाणभेद आणि दुर्गविहारी, अनेक आभार. 'दाराआडची मुलगी'च्या मूळ कवियत्रीने कवितेचा एक सुंदर घाट निर्मिला आहे, त्या घाटावर येऊन काव्यगंगेत डुबकी मारण्यात एक आगळीच मौज आहे. 'शिव कन्या' यांना अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 04/10/2019 - 15:16 नवीन
खरंय चित्रगुप्त साहेब ,, खरंय ,, शिवकन्या याना मनापासून धन्यवाद .. त्यांच्या त्या कवितेमुळे , या सुंदर कविता वाचनात आल्या आणि थोडे हलके हलके वाटत आहे .. चित्रगुप्त साहेब आपण तर कमालच केली .. काय सुंदर सचित्र कविता केल्या आहात आपण .. हि कविता तर अफलातून झालेली आहे . एक काम करतो ह्हीला प्रिंटवतो आणि माझ्या मुलांना वाचायला देतो , निदान त्यांना घड्याळ कशी कशी सुधारत गेली ते चांगलेच समजेल ..
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 04/10/2019 - 19:34 नवीन
वर्तमानकाळ. फक्त चालू वेळ,ना भविष्याचे डोलारे ना भूतकाळातील गाठोडी फक्त "आनेवाला पल जानेवाला है" इतकंच सागणारे काटे असोत कि आकडे बोलतात. आजीचे घड्याळ अंगिकारायचा अल्प प्रयत्नशील नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 04/11/2019 - 13:45 नवीन
वाह, मस्तच ! दाराआडच्या कविता (खरंतर यांचा एक वेगळा कवितासंग्रह (मिपा वर आणि छापील सुद्धा) प्रकाशित करायला पाहिजे. इतक्या या वैविध्यपूर्ण आणि सुरेख आहेत) च्या निमित्तानी ही सुरेख स-चित्र कविता वाचायला मिळाली. घड्याळांचा सुंदर हा परामर्श घेतला आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा