Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झिम झिम झिम्मड झिम्माड

व — विजुभाऊ, Fri, 04/12/2019 - 11:51
झिम झिम झिम्मड झिम्माड .खेळ खेळू रंगात आज काय पानोळ्या पानोल्या, आल्या खेळुन करवल्या पाने मांडीता मांडीता, साखर सांडून त्या गेल्या. एक करवली हरवली , कोणी नाही देखीली. तीची उरली सावली, माया सारी सम्पली. आई बापाची पोर ती . नवर्‍याने चोरीली. एक फुल चिमुकले. सासूरवाशीन झाले. लगनाच्या होमात. बाळपणी करपले. झिम झिम झिम्मड झिम्माड .खेळ खेळू रंगात.... आज काय खेळू संसारी? कवड्या टाकेन चारी. एक कवडी उलटली, माझी पाटी फुटली. पाटी जशी फुटली, टचकन माया आटली. लाह्या भाकर भाजता , विस्तव चटके हाताला. वडाला बांधते दोरा , उलटव देवा हा फेरा. माणीक मोती झाकले , सासूबाईने टाकले. आई म्हणे तू परकी, असून बा ;मी पोरकी. कोणी देईना थारा, जीव हा सैरा वैरा. झिम झिम झिम्मड झिम्माड .खेळ खेळू रंगात.... आज काय खेळू गं पोरी? गोल वर्तुळ ये भाळी. नको नको हे वर्तुळ बाई , जगणे अवघड होई. वर्तुळ हे तोडूया , जुनी जळमटे झाडूया. ज्योत घरी ही उजळूया ,लेक लाडकी शिकवूया, आता नाही थांबणे. सुरू झाले जगणे जग बदल घालुन घाव, आता हेच आम्हाला ठाव. चिमणी आता बदलली , आकाशी झीपावली. द्या तीला विश्वास. जिंकेल ती आकाश. झिम झिम झिम्मड झिम्माड . झेपवूया गगनात.

प्रतिक्रिया द्या
1346 वाचन

💬 प्रतिसाद (2)
व
विजुभाऊ Fri, 04/12/2019 - 12:28 नवीन
बालविवाह प्रथेचा बळी ठरलेल्या एका चिमुरडीला अर्पण . भारतात / पुरोगमी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात काही आदिवासी गावात अजूनही ही प्र्था चालुच आहे. रुढी च्या विरोधात त्या मुलीचे आईबापही जाऊ शकत नाहीत
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 04/12/2019 - 12:46 नवीन
भोंडल्यातील गाणी आठवली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा