(जळवे)
तमाम मिपाकरांच्या (माझ्या सहित) ,भोचक व वरकरणी मदतीआड त्रस्त पिडणार्या नातेवाईकांना समर्पित
**********
हेच ते पिडणारे पळवे जळवे
ज्यां(च्या)मुळे तुझे जगणं काळजीने पोखरून ठेवलेस!!
पाठिंबा वा संमती असती तर
हे जळवे शक्तिने तांडून
लगेच दृष्टी आड घालून
विस्मृतीत टाकले असते...
ना ही कुतरओढ कसोटी भाळी असती...
ना भोचक डोळे खुपसून (देत)
न संपणार्या टिकेलासुद्धा
सोसत राहिले असते....
ना टोमण्यातून तुझ्या भळजखमा टोकरत राहिले असते....
नाहीतर,
माझ्या प्रिया, सगळ्यांना
आप्त ( नातलग) निवडायची संधी पसाभर देता,
तर विधात्याचे काय जाते?
💬 प्रतिसाद
(4)
ज
ज्ञानोबाचे पैजार
Mon, 04/15/2019 - 06:00
नवीन
आजकाल ही जळवे मंडळी या कार्यासाठी फेसबुक व्हॉट्सप सारखी अधुनिक साधने वापरतात.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 04/15/2019 - 06:24
नवीन
कोणी नातेवाईक मिपा वाचत नाहीत ना? =))
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 04/15/2019 - 06:59
नवीन
फाट्यावर मारतोच मारतो, इथं तर एकदमच सोपं.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 04/15/2019 - 09:21
नवीन
=))
: परखड नाखुंच्या टीप्पण्यांचा पंखा.
- Log in or register to post comments