Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सांज

प — प्रणया, Tue, 04/16/2019 - 15:20
सहज असे चालतांना भेट ती फुलांची,तू मला दिलेली ओंजळीत त्या प्राजक्ताचा गंध राहुनी गेला... हात नाही हातात माझ्या पण तूझा स्पर्श राहुनी गेला.... ना किनारा फेसाळणारा ना लाट एकसारखी झेपावणारी, अस्पष्ट जाहले होते सारे नव्हतीच जणू उरली क्षणे पुन्हा एकदा स्मरणारी.... असे घाबरे मन झाले शहारे सरसरुन आले बोटांमध्ये रुतलेली बोटे तूझी, अचानक तेव्हा घट्ट होती झाली... वेड कोणते भोवती होते की हवेत नशा वाहू लागली, आसुसलेली पहाट होती की अस्तास जानारी रविकिरणे गुलाली..... न उमगले मला क्षणात काय झाले तेव्हा, तू असताना समोर तिथे लाजलेली नजर माझी शोधत होती फक्त तूझी सावली.... सरलीच सांज ती अबोली येणारी रात्र आठवणीत सरून गेली.... तू पाहता पाहता दिसेनासा झाला पण एकमेकांत गुंतलेला श्वास मात्र अजुनही तिथेच राहुनी गेला....

प्रतिक्रिया द्या
786 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा