Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंदाज तुमचा, आमचा, मिपाकरांचा.

य
यशोधरा
गुरुवार, 04/18/2019 - 15:29
🗣 217 प्रतिसाद
आजवर मिपाच्या मुख्य फलकावर वेगवेगळ्या प्रकारचे धागे काढायची संधी मिळाली ( थ्यांक यू मिपा!) पण राजकारणाशी संबंधित धागा मात्र कधी काढला नव्हता. तेव्हा, आज राजकारणाशी संबंधित एक धागा. होऊ द्या खर्च.. वगैरे, वगैरे! आणि इतकी वर्षं मिपावर असून एकही राजकारण विषयक धागा काढला नाही, ह्याची एक मिपाकर म्हणून... वगैरे, वगैरे सुद्धा. स्वतःची राजकारण विषयक मतं मिपावर मांडली नसली (मत असलं तरी ते मांडण्याइतका माझा अभ्यास नाही ) तरी मिपावरील राजकारण विषयक धागे वाचायला - त्यातले वितंडवाद टाळून - मला प्रचंड आवडतं. ह्या धाग्यांची वाचनसंख्या पाहता, बरेच जण हे धागे वाचत असावेत. मिपावर राजकारणाचा अभ्यास असणारे जाणकार आहेत -(त्यांची मते जाणून घ्यायची उत्सुकता आहेच)- तरी, अजून यंदाच्या निवडणुकांबाबत अंदाज वर्तवणारा धागा आला नाही बघता, म्हटलं, असा एक धागा काढावा. निवडणुकीच्या वातावरणात, कुठे कोण निवडून येईल? राज्य पातळीवर, देश पातळीवर कोणता पक्ष आपलं अस्तित्व पुराव्यानिशी शाबीत करेल, असं तुम्हांला वाटतं? बोला, बोला! आपापले अंदाज, अपेक्षा, आकडेवारी मांडा मिपाकर मंडळी. फक्त नो वितंडवाद आणि नो तू तू मी मी. ओके? धन्यवाद! माझा लिंबूटिंबू अंदाज आणि अपेक्षा: मागील वेळी भाजपची जशी लाट होती, तशी ह्या वेळी नसेल, तरीही बरेच ठिकाणी निसटते का होईना, भाजपाच्या पदरात विजय पडतील. काँग्रेसची टक्केवारी वाढेल पण दिल्ली का दरबार दूर होगा. काही प्रादेशिक पक्ष आणि त्यांची स्वतःच्या फायद्याची आणि देशाला रसातळाला नेणारी राजकारणं थांबली, संपली तर बरं होईल. शेवटी, देशाची भरभराट व्हावी, सामान्य माणूस सुखी व्हावा, भ्रष्टाचार कमी व्हावा, अशा आपल्या माझ्या माफक अपेक्षा. तेव्हा, सुरू हौद्यात चर्चा.

प्रतिक्रिया द्या
129815 वाचन

💬 प्रतिसाद (217)
श
शाम भागवत गुरुवार, 04/18/2019 - 16:18 नवीन
खरडफळ्यावरील चर्चा चिकटवतोय. ========================================================================== पैलवान — 18 Apr 2019 - 13:01 माझी अपेक्षा एनडीए बहुमत ३०० . भाजप२००. युपीए २२०. काँग्रेस १७०. इतर प्रादेशिक पक्ष जे दोन्ही आघाड्यात नाहीत - २०-२५ अंदाज एनडीए बहुमत - २९०. भाजप २२०. युपीए १८० . काँग्रेस १२०. इतर प्रादेशिक पक्ष जे दोन्ही आघाड्यात नाहीत - ६०-७० ========================================================================== 18 Apr 2019 - 7:26 pm | शाम भागवत पैलवान साहेब, काॅंग्रेस १७० हे खूप वाटतंय. त्यासाठी मतदान टक्केवारी खूप चांगली पाहिजे. २०१४ ला १९% होती. भाजपाची ३१% होती. गुजराथ,कर्नाटक,राजस्थान व मध्यप्रदेश मधील विधानसभा निवडणुकांत भाजपाची टक्केवारी कमी झालेली नाहीये. कर्नाटकांत तर चक्क वाढलीय. रागा पंतप्रधान होण्याची शक्यता जर जाणवली असती तरच १० ते १२ टक्के किंवा जास्त मते त्यांच्या बाजूने फिरली असती. मग मात्र १५० चा पुढचा आकडा गाठता आला असता. माझ्या मते या निवडणुकीत काॅंग्रेस व भाजपाला सोडून लढणारे महागठंधनवाले प्रादेशिक पक्ष संपतील. त्यांचे मतदार काॅंग्रेस व भाजपकडे जातील. थोडक्यात भाजप व काॅंग्रेस दोधांची टक्केवारी सुधारणार आहे. पण भाजपला कमी टक्के वाढूनही जागा जास्त मिळतील. कारण ती वाढ ३१% मधे मिळवायची आहे. काॅंग्रेसची टक्केवारी लक्षणीय दृष्ट्या सुधारणार असली तरी ती टक्केवारी १९% मधे मिळवायची आहे. मला वाटते काॅंग्रेसला मिळणाऱ्या जागा दुप्पट होतील किंवा १०० च्या आत असतील. तर भाजप मागीलप्रमाणे स्वबळावर बहुमत मिळवेल. ========================================================================== ज्ञानव — 18 Apr 2019 - 14:48 @श्याम भागवत हा अनालीसीस कसा केला? ========================================================================== शाम भागवत — 18 Apr 2019 - 15:52 @ज्ञानव डोंबलाचा अॅनालिसीस. मी फक्त कोणाला किती जागा मिळाल्या त्या ऐवजी मतदानाच्या टक्केवारीवर लक्ष देतोय. बाकी काही नाही. गुजराथ निवडणुकी पासून मोदी विरोधक जरा आश्वस्त झाले. प्रत्यक्षात त्या निवडणुकांत भाजपाला ४९% मते आहेत. पण आपल्यावर असा परिणाम झालाय की मोदींची पार वाट लागलीय. प्रत्यक्षात मोदीं नंतर कोणी मुख्यमंत्री व्हायचे हा वाद तिथे नडलाय. पण गुजराथची लोकं मोदींवर रागावली असाच निष्कर्ष काढला जातोय. कर्नाटक विधानसभेत तर भाजपाची टक्केवारी भलतीच सुधारलीय. जागा पण वाढल्याहेत. पण तरीही लोकभावना अशीच आहे की तिथे मोदींचे काही चालले नाही. राजस्थान व मध्यप्रदेशात भाजपाने सरकार गमावलं. इथेमात्र जास्त खोलांच जायला पाहिजे असं वाटंत. लोकांना वाटतंय की या निवडणुकीत मोदी सपशेल आडवे झाले. त्यांचा करिश्मा संपला. २०१९ ला २००४ ची पुनर्रावृत्ती होणार अस मानलं जायला लागलं. प्रत्यक्षांत भाजपाची मतांची टक्केवारी कमी झालेली नाही. काॅंग्रेसची टक्केवारी नक्कीच सुधारलीय पण ती निर्विवाद नाहीये. अनेक जागी खूपच कमी मतांनी भाजप उमेदवार हरलाय. नोटा मतांनी भाजप हरलाय. जे भुकेले आहेत ते अन्नपदार्थात दोष शोधत बसत नाहीत. त्याप्रमाणे जिंकण्याची आशा नसलेल्या काॅंग्रेसवाल्यांनी नोटा पर्याय वापरला असेल अस वाटतं नाही. जर नोटा भाजपाच्या लोकांनी वापरला नसता तर ही दोन्ही राज्यांचे निकाल वेगळे लागले असते. मला वाटते हा राग वसुंधराराजे व चौहानांवर असावा. पण तो मोदींवर असल्याचे मानले गेले आहे. आता निवडणुक प्रचारांत मोदी स्वत:साठी मतं मागायला येणार आहेत. पक्षासाठी अथवा कोणीतरी मुख्यमंत्री बनावा यासाठी ते मतं मागायला येणार नाहीयेत. तो फरक पडणारच आहे. विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी सर्वमान्य चेहरा नाहीये. नितीशकुमारांशी भाजपाने मिळते जुळते घेतल्याने तो धोका आता मोदींना नाहीये. कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचे वेळेस मोदींविरूध्द सर्व एकत्र आले होते. दुरंगी लढती झाल्यास त्याचा फटका मोदींना नक्कीच बसला असता. पण अनेक ठिकाणी दुरंगीच्या ऐवजी तिरंगी लढती होताहेत. अशावेळेस ३१% जनाधार हा खूपच आश्वासक मानला पाहिजे अशी माझी समजूत आहे. विशेषकरून उत्तरप्रदेशमधे प्रियांका गांधींचे कार्ड जेवढे चालेल तेवढ्या प्रमाणांत मत विभागणी झाल्याने २०१४ सारखेच यश भाजपा मिळवेल. मग मात्र विरोधकांचे सगळीच गणिते विस्कळीत होतील. मी तज्ञ वगैरे बिलकूल नाही. मी फक्त विचार कसा करतो आहे एवढेच लिहिले आहे. ते सुध्दा हिरवा झेंडा फडकवत, यशोधरा ताईंनी खरडपट्टीवर येऊ द्या अंदाज असं सुचवल्यामुळे धाडस करतोय. _/\_ ========================================================================== यशोधरा — 18 Apr 2019 - 16:03 राष्ट्रवादी बद्दल काय मतप्रवाह आहे? काकासाहेब ह्यावेळी नको इतका चपळपणा करत कोलांटून राहिलेत का? ========================================================================== शाम भागवत — 18 Apr 2019 - 16:10 मला वाटते काॅंग्रेस राष्ट्रवादीची मते पळवणार. म्हणजे मतांच्या टक्केवारीत काॅंग्रेस पुढे जाईल. राष्ट्रवादीची टक्केवारी २०१४ च्या तुलनेत घसरेल. ========================================================================== शाम भागवत — 18 Apr 2019 - 16:26 ही चपळाई गुजराथ निवडणुकांपासून सुरू झाली राजस्थान व मध्यप्रदेश निवडणुकांनंतर खूप जण अति अति चपळ झाले होते. (देवेगौडांनी पंप्र बनून खूप जणांना स्वप्ने पहायचे व्यसन लावलंय) भाजपा येतच नाहीत अशी खात्रीच झाली होती. शिवाय आधारासाठी २००४ चे उदाहरण होतेच. फिल्डिंग कसं लावलं पाहिजे याबद्दल काका भरभरून बोलत होते. पण एअर स्ट्राईक नंतर सगळेच विरोधक बॅकफूट वर गेले. आता काका म्हणताहेत भाजप येईल पण मोदी पंप्र नसतील. गडकरी झाले पंप्र तर बरं होईल. त्यांच्या मार्फतच देवेंद्र मॅनेज होऊ शकतील. पण जर मोदी आले तर देवेंद्रांना हात लावण्याची कुणाचीच हिम्मत होणार नाही. आता फक्त मतदान टक्केवारी बघायची. जर ती कमीकमी व्हायला लागली तर मग वेगळा विचार करायला लागेल. सध्यातरी फेझ १ ची मतदान टक्केवारी मोदींच्या बाजूची वाटतेय. १-२ % कमी झालीय काही ठिकाणी. पण मतदार वाढल्याने संख्या तीच राहणार आहे. शिवाय त्याचा दुसरा अर्थ असा होतोय की, म्हातारे कमी झाले आहेत व तरूण वाढले आहेत. ========================================================================== शाम भागवत — 18 Apr 2019 - 17:48 निवडणुक आयोगाच्या ५ च्या रिपोर्ट प्रमाणे मतदान २०१४ सारखेच होतंय असं वाटतंय. मात्र बिहार व युपी मधे टक्केवारी वाढायची लक्षणे दिसताहेत. ========================================================================== शाम भागवत — 18 Apr 2019 - 18:01 ओरिसामधे निरूत्साह चांगलाच जाणवतोय.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 04/18/2019 - 16:20 नवीन
व्येश्ट. राहिलं होतं हे करायचं. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
त
तुषार काळभोर Sat, 05/18/2019 - 10:04 नवीन
पैलवान — 18 Apr 2019 - 13:01 माझी अपेक्षा एनडीए बहुमत ३०० . भाजप२००. युपीए २२०. काँग्रेस १७०. इतर प्रादेशिक पक्ष जे दोन्ही आघाड्यात नाहीत - २०-२५ अंदाज एनडीए बहुमत - २९०. भाजप २२०. युपीए १८० . काँग्रेस १२०. इतर प्रादेशिक पक्ष जे दोन्ही आघाड्यात नाहीत - ६०-७०
अपडेटेड अंदाज भाजप 200, मित्रपक्ष 40, रालोआ 240-250 काँग्रेस 120, मित्रपक्ष 30, संपुआ 150-170 इतर प्रादेशिक पक्ष 120-140 साधारण १९९६-२००४ सारखी परिस्थिती असू शकते. काँग्रेसच्या पाठिंब्याने छोट्या पक्षाचा पंतप्रधान किंवा प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने भाजपचा पंतप्रधान मोदी शहा जोडीला दुसरा पर्याय पसंत पडणार नाही, त्यापेक्षा कदाचित ते विरोधात बसणे प्रेफर करतील. राहुल गांधींची पहिली टर्म अशी अस्थिर होणं काँग्रेसला परवडणार नाही, त्यामुळे देवेगौडांसारखं कुणालातरी पाठिंबा दिला जाऊ शकतो. ता.क.: कालची पत्रकार परिषद. पंतप्रधान यांची पहिली आणि (या टर्म मधली) शेवटची. १. मोदींची देहबोली खूप निराश वाटली. कदाचित शारीरिक थकवाही असू शकतो. २. पत्रकार परिषद पंतप्रधानांची नसून भाजपची होती. आणि त्यात अमित शहा सर्वेसर्वा होते. ३. मोदींना प्रश्न विचारल्यावर मी साधा शिपाई आहे, अध्यक्ष काय ते सांगतील असं त्यांनी उत्तर दिलं. ४. भाजपला कदाचित कमी जागा मिळण्याची शक्यता दिसत असेल आणि त्यामुळे मोदींची प्रतिमा वाचवायला शहा पुढे येत आले असतील. ५. किंवा दुसऱ्या टर्मसाठी मोदींऐवजी शहांचा विचार सुरू झाला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ब
बाप्पू गुरुवार, 04/18/2019 - 16:29 नवीन
भाजपा - 250-260 NDA - 300-310 UPA - 100-110 काँग्रेस - 60-80 इतर - 120-130
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/18/2019 - 16:33 नवीन
तीन टक्के पेक्षा जास्त मतदान वाढलं तर त्याला स्विंग म्हणतात. म्हणजे मतदार नक्की काहीतरी विचार करून काहीतरी घडवण्यासाठी घराबाहेर पडलाय असं समजल जातं ६% च्या पुढे मात्र कोणती तरी लाट आलीय असं समजल जातं. युपी व बिहारमधे मतदान अजूनही चालू असल्याच दिसतंय. युपीमधे आत्ताच मागील सरासरीच्या ४% मतदान जास्त झाल्याचं आयोग सांगतोय. तर बिहारमधे ६% पेक्षा जास्त मतदान झालंय.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/18/2019 - 16:39 नवीन
ओरिसामधे २०१४ च्या सरासरीच्या १५% मतदान कमी झालंय. काय भानगड आहे कळंत नाहीये.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/18/2019 - 17:24 नवीन
Bharatiya Janata Party (BJP) 282 All India Anna Dravida Munnetra Kazhagam (AIADMK) 37 Biju Janata Dal (BJD) 20 Telugu Desam (TDP) 16 Communist Party of India (Marxist) CPI(M) 9 Nationalist Congress Party 6 Samajwadi Party 5 Rashtriya Janata Dal 4 All India United Democratic Front 3 Rashtriya Lok Samta Party 3 Indian National Lok Dal 2 Janata Dal (Secular) 2 Jharkhand Mukti Morcha 2 Communist Party of India 1 Kerala Congress (M) 1 National Peoples Party 1 Revolutionary Socialist Party 1 All India Majlis-E-Ittehadul Muslimeen 1 Indian National Congress (INC) 44 All India Trinamool Congress (TMC) 34 Shivsena (SS) 18 Telangana Rashtra Samithi (TRS) 11 Yuvajana Sramika Rythu Congress Party (YSRCP) 9 Lok Jan Shakti Party 6 Aam Aadmi Party 4 Shiromani Akali Dal 4 Jammu & Kashmir Peoples Democratic Party 3 Independents 3 Indian Union Muslim League 2 Janata Dal (United) 2 Apna Dal 2 All India N.R. Congress 1 Naga Peoples Front 1 Pattali Makkal Katchi 1 Sikkim Democratic Front 1 Swabhimani Paksha 1

 

  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/18/2019 - 17:29 नवीन
Bharatiya Janata Party (BJP) = 198 ते 212. Indian National Congress (INC) = 90 ते 114 Shivsena (SS) = 10 ते 13 बाकी, अंदाज भरत राहीन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 04/19/2019 - 06:34 नवीन
बिरूटे सर, शिवसेनेला मागच्या वेळेपेक्षा ८-१० जागा कमी मिळतील, असे तुम्हाला का वाटते? ते कळू शकेल काय? मी तुमच्या इतका जाणकार नाही. तरी मी त्यावर खालील ३ मुद्यांवर विचार करतोय. अर्थात ते निव्वळ तर्क आहेत. पण मागच्या वेळेस शिवसेनेच्या विरोधात मनसेने उमेदवार उभे केले होते. यावेळेस ते नाहीत. मुख्य म्हणजे भाजप व शिवसेना यांनी पाडापाडीचे राजकारण खेळले असते तर टक्केवारी घसरायला पाहिजे होती. तसं फारसं घडलाय का? शिवाय शिवसेनेला यावेळेस मागच्यापेक्षा एक जागा जास्त मिळालीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/25/2019 - 02:54 नवीन
काही मतदार संघात भाजप-सेना खासदार यांच्या सलग चार टर्म झाल्या. अशा वेळी काही बदल होऊ शकतात. मागच्या वेळी मोदी लाटेत काही बुड़त्या नावा 'नमो नमो' च्या नामाने तरल्या. आता ती परिस्थिती वाटत नाही म्हणून काही जागा कमी धरल्या. जसे. औरंगाबाद, परभणी, बुलढाणा,अ.नगर इथे बदल होऊ शकतात. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/18/2019 - 17:45 नवीन
Bharatiya Janata Party BJP 23 Indian National Congress INC 2 Nationalist Congress Party NCP 4 Shivsena SHS 18 Swabhimani Paksha SWP 1 Total   48

 

आता काय बदल होतील, त्याबद्दल आपापल्या जिल्ह्यात किंवा माहितीत असेल तर समजून घ्यायला आवडेल. आमच्या औरंगाबाद मधे चार पंचवार्षिक शिवसेना निवडून आलेली आहे. - दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/18/2019 - 17:58 नवीन
माझ्या समजूतीप्रमाणे, २०१४ ची निवडणूकीचा मूड पुढे चालू राहिलाय. मागच्या पानावरून पुढे असे आपण म्हणतो तसे. हे थोडेसं पहिल्या टप्यात जाणवलं होतं. पण अजूनही पहिल्या टप्याची पूर्ण माहिती मिळत नाहीये. त्यामुळे मतदार संघ निहाय विचार करता येत नाहीये. पण हा दुसरा टप्पा झाल्यावर मतदानाची आकडेवारी पहाता, मोदी लाट तयार व्हायला लागली आहे असे वाटते. भाजप स्वबळावर ३०० च्या पुढे जाईल असं आता मला वाटायला लागलं आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/18/2019 - 18:00 नवीन
९ वाजताच्या आयोगाच्या अहवालाप्रमाणे सरासरी ६६.८०% मतदान झाले असून अजूनही हा आकडा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत !!! ही निवडणूक भल्या भल्यांची झोप उडवणार हे नक्की.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/18/2019 - 18:01 नवीन
एकटा भाजप = ३५० इतर एनडीए घटकपक्ष = ५० ते १०० बाकीचे = उरलेल्या जागा (आता आम्ही बाजूला बसून मजा बघायला मोकळे झालो ! ;) :) )
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/18/2019 - 18:11 नवीन
सद्या तरी ३०० च्या पुढे. नंतरच्या फेर्‍यात मतदान टक्केवारी बघून ठरवता येईल. :) लाट आहे? का त्सुनामी ते ठरायचयं. त्सुनामी असेल तर राजीव गांधींचा विक्रम मोडला जाऊ शकतो. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
य
यशोधरा गुरुवार, 04/18/2019 - 18:29 नवीन
एक्काकाका, तुम्हांला भाजप ची खूप खात्री दिसत्ये. अवांतर: नांदेड मध्ये बोळसा गावामध्ये अजूनही मतदान सुरूच आहे म्हणे. आत्ता टीव्हीवर बातमीमध्ये सांगताहेत. रात्रौ 10 च्या बातम्या. ११ वाजेपर्यंत सुरू राहणार. तांत्रिक अडचणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
य
यशोधरा गुरुवार, 04/18/2019 - 18:59 नवीन
Apr 18, 08:15 PM (IST) Final percentage for Srinagar Lok Sabha polls: Srinagar: 7.9% Ganderbal: 17.5% Budgam: 21.60% Voter turnout in 2nd phase of #LokSabhaElections2019: Assam-76.22% Bihar-62.38% Jammu and Kashmir-45.5% Karnataka-67.67% Maharashtra-61.22% Manipur-67.15% Odisha-57.97% Tamil Nadu-66.36% Uttar Pradesh-66.06% West Bengal-76.42% Chhattisgarh-71.40% Puducherry-76.19% 8:41 PM - Apr 18, 2019 ****** State-wise first phase voter turnout Andaman & Nicobar Islands 70.67% Andhra Pradesh 56% ArunachalPradesh 66% Assam 68% Chhattisgarh 56% Lakshadweep 66% Manipur 78.2% Mizoram 61.29% Nagaland 78% Odisha 68% Sikkim 69% Telangana 60% Tripura 81.8% Uttar Pradesh 64% Uttarakhand 57.85% West Bengal 81%
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 04/19/2019 - 08:35 नवीन
वरच्या आकड्यात जिथे मोठा बदल झालाय तेवढेच नोंदवतोय. श्रीनगर १४.०५% मतदान उधमपूर ७०.१९% मतदान म्हणून जम्मू काश्मीर ४५.६४% आसाम ७८.५३% छत्तीसगड ७४.२०% मणिपूर ८१.०९% ओरिसा ७१.६८% युपी ६२.१२% फेज २ सरासरी मतदान ६८.९८% आजचा सकाळी ११ वाजता नि.आ. अहवालाप्रमाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
श
शाम भागवत गुरुवार, 04/18/2019 - 19:07 नवीन
१० वाजताचा आयोगाचा अहवालानुसार फेज २ ची सरासरी ६७.५९% अजूनही ही आकडेवारी बदलतच आहे. ज्यांना कुणाला ही आकडेवारी उपयोगाची असेल त्यांचे साठी महाराष्ट्रातील स्थिती ६१.७६% 2014 ची % मतदार संघ 2019 ची % 61.35 Buldhana 57.95 58.51 Akola 59.76 62.29 Amravati 63.08 66.29 Hingoli 63.37 60.11 0ded 63.02 64.44 Parbhani 62.47 68.75 Beed 64.34 63.65 Osmanabad 62.75 62.69 Latur 62.02 55.88 Solapur 56.65
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 04/18/2019 - 23:56 नवीन
पाहिलं म्हणजे यशोधराताईंना धन्यवाद. असं खरडफळ्यावर टाकत राहिलात तर आमच्यासारख्यांना कळत नाही. आधीच गॅरीभाऊ, श्रीगुरुजी वगैरेंची कमी जाणवतीये आणि त्यात निवडणुकीवर एकही धागा नाही म्हणजे अगदीच निरस वाटत होतं. गॅरीभाऊ, श्रीगुरुजी आणि इतर मान्यवरांनी परत मिपावर येऊन आपले अभ्यासपूर्ण प्रतिसाद द्यावेत अशी विनंती. त्यांना कोणी वैयक्तिकरित्या ओळखत असेल तर कृपया विनंती करावी. मला आकडेवारी वगैरे सांगता यायची नाही. पण मला वाटतंय की जर भाजप/ एनडीए ला बहुमत मिळालं नाही तर त्यांनी सरकार स्थापन करू नये. काँग्रेस/ तिसरी/ चौथी... वगैरे आघाड्यांना जे काही करायचं असेल ते करू द्यावं.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Fri, 04/19/2019 - 19:36 नवीन
+१ अगदी अगदी, मला पण खरंच वाचायला आवडेल. हे लोक अजून कुठे लिहितात का हे पण माहित नाही. मागे गॅरी दादांना विनंती केली होती कि ते अजून कुठे लिहीत असतील किंवा त्यांचा ब्लॉग असेल तर त्याची माहिती द्यावी, पण ब्लॉग नाही म्हणाले. खासकरून ह्या निवडणुकीच्या वेळी मला सगळ्याच बाजूची मत ऐकलं आवडली असती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
श
शाम भागवत Fri, 04/19/2019 - 06:08 नवीन
अजूनही ओरिसाचा मतदानाचा आकडा बदलतोय. काल रात्रीपर्यंत ५८% च्या आसपास असलेला आकडा आता (म्हणजे सकाळी ९ वाजता) ७०.७८% पर्यंत पोहोचलाय. मागच्या वेळेपेक्षा फक्त ३% कमी. थोडक्यात, ओरिसामधे निरूत्साह वगैरे काही दिसत नाहीये. Happy त्यामुळे फेज २ ची सरासरी ६८.७८% पर्यंत पोहोचलीय
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Fri, 04/19/2019 - 09:37 नवीन
माझा अन्दाज़ एनडीऐ = २०० (भाजप १७०) युपीऐ = १८० (कॉग्रेस १४०) न बीजेपीमित्र - न कॉग्रेसमित्र = १६० (तेलंगाना समिति वैग्रे....)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 04/19/2019 - 09:43 नवीन
माझा अंदाज जवळपास असाच. पण कहो दिलसे मोदीकाका फिरसे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
M
mrcoolguynice Fri, 04/19/2019 - 10:34 नवीन
“फिरसे” का म्हनून भौ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
M
mrcoolguynice Fri, 04/19/2019 - 10:39 नवीन
न बीजेपीमित्र - न कॉग्रेसमित्र
यांच्या मतदारने भावनिक मुद्द्यावर मतदान न करता, स्ट्रेटेजीक़ मतदान केल तर यूपीए चाच अजुन फ़ायदा होवु शकतो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
शाम भागवत Fri, 04/19/2019 - 11:26 नवीन
अभ्याजी, तुमच्या सोलापूराबद्दल बोला की. ५% मतदान जास्त झालंय हो. म्हणजे अंदाजे १ लाख मतदार जास्तीचे आले जे मागच्या निवडणूकीत निरूत्साही होते. कोण असतील? लिंगायत समाजाचे असतील? का प्रकाश आंबेडकरांच्यामुळे? सोलापूरात खूप मोठी सभा झाली होती म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
शब्दानुज Fri, 04/19/2019 - 19:52 नवीन
सोलापुरात आंबेडकर आणि शिंदे यांमुळे ब-याच जणांचे सोलापुरच्या निवडणूकीत लक्ष आहे. इथली लढत जातीय वळणार जाणारी आहे. वाढलेले मतदार समोरच्याचा पराभव करण्याच्याच हेतूने बाहेर पडले आहेत. पण यातही आंबेडकर उभे असल्याने त्यांना मानणारा समाज मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेला असू शकतो जो इतरवेळी तितका उत्साह दाखवत नाही (कारण त्यास प्रतिनिधित्व मिळत नाही.) सोलापुरात आंबेडकरांना मानणारा समाज खुप मोठा असला आणि जरी तो बाहेर पडलेला असला तरी त्यांचे संख्याबळ बहुमतात जाणारे नाही. बाकी मध्यमवर्ग हा वंचितला मतदान करेल असे वाटत नाही. मागील वेळेस शिंदेंचा पराभव मुख्यतः नवमतदारांमुळे झाला होता. तरूणांची एकगट्ठा मते भाजपाला मिळाली होती.आत्ता ही ते भाजपाच्या मागेच उभे राहण्याची शक्यता बरीच आहे. एकंदरीत भाजपाचे पारडे मला तरी जड वाटते. शिंदे यांना मानणारा मतदार हा पारंपारिक , ठरलेला आहे. नवीन पिढीची मते मिळवण्यात ते कमी पडतील. जर खुपच मोठी मते मिळवण्यात यश आले तर भाजपाची मते खाल्ली जातील आणि त्याचा फायदा आंबेडकरांना होईल. केवळ तेव्हाच मतविभागणीचा फायदा घेऊन आंबेडकर जिंकू शकतील. भाजप , वंचित आघाडी आणि शेवटी कांग्रेस असा मिळणारा मतांचा उतरता क्रम ठरण्याची शक्यता आहे. (हे वैयक्तिक मत आहे. आमचा राजकारणाचा अभ्यास शुन्य आहे. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
अ
अभ्या.. Fri, 04/19/2019 - 20:25 नवीन
सोलापूराचे राजकारण पहिल्यापासून विचित्र आहे. इथल्या दोन भाजपा आमदारात सुध्दा सतत कुरघोड्या चाललेल्या असतात. अशा राजकारणात भाजपाने सेपरेट गेम खेळली. पहिल्यांदा मराठा आरक्षणावेळी धनगरांना(त्यांची टक्केवारी लक्षणीय आहे) आरक्षण देउ म्हणून आशेला लावले. मराठा आरक्षण होताच धनगरांची आंदोलने सुरु झाली. ऐनवेळी सोलापूर विद्यापीठाचेया नामांतराचा प्रश्न उभाकेला. अहिल्यादेवी की सिध्देश्वर अशी लिंगायत धनगरात फूट पाडून शेवटी अहिल्यादेवी नाव दिले. आता लिंगायत खवळतील म्हणून महाराजांचे उमेदवार म्हणून नाव पुढे केले. एक महाराज म्हनले की सर्व लिंगायत एकमताने पाठीशी उभे राहतील असा होरा पण लिंगायत एकच एक महाराजांना मानणारा समाज नाही. सोलापूर आणि सीमाभाग धरला तर कमीतकमी १०-१२ अधिकारी लिंगायत महाराज आहेत. प्रत्येकांना मानणारे वेगवेगळे लिंगायत समाज आहेत. आमदार विजयकुमार देशमुख हे स्वतः लिंगायत समाजाचे आहेत पण ऐनवेळी शरद बनसोडेंची काटलेली उमेदवारी ही बौध्द आणि शहराबाहेरील मते फिरवू शकते. त्यात पुन्हा प्रकाशराव आले आहेत रिंगणात. भीमा कोरेगांव प्रकरणापासूनच प्रकाश आंबेडकरांचा सोलापूरात वावर वाढला आहे. त्यामुळे ते इथे गेम चेंजर ठरु शकतात. शिंदेसाहेब पट्टीचे राजकारणी आहेत. एकदा झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. निवडणुकीच्या आधीच ३ महिन्यापासून त्याणी विविध समाजगटात कॅम्पेनिंग सुरु केले आहे. व्हाटसप ग्रुप, फेस्बुक आदी मिडीयातून प्रचंड बीजेपीविरोधी पोस्टस फिरवल्या जात आहेत. मोदी नकोत कुणीही चालेल इतपत ती हवा आहे. बाकी सोशल मिडीयात नुसतं चांगभलं करणारी तरुणाई मात्र मोदी मोदी करण्यात जरी गुंतली असली तरी मतदानात त्याचे रुपांतर कसे होते हे पाहणे रोचक ठरेल. सोलापूर हे मध्यमवर्गीयाचे नसून कामगारांचे शहर आहे. बंद पडलेल्या कापड मिल्स, अवैध धंदे, अल्पसंख्याकांचे लांगूलचालन आदी बिले शिंदेसाहेबांच्या नावाने फाडली गेली तरी आता ती पिढी नामशेष झाली आहे. गेल्या पाच वर्षात एकही नवीन उद्योग अथवा प्रकल्प सोलापूरात आलेला नाही. एक एनटीपीसी आला पण त्याचे श्रेय शिंदेसाहेबांना गेलेय. कम्युनिस्ट आमदार आडम मास्तरांना शिंदे हवे तसे वळवू शकतात. जरी आडम मास्तरांनी गेल्या वर्षी मोदींच्या हस्ते कामगार घरकुले आदी प्रोजेक्ट आरंभले असले तरी सर्व कामगार वर्गाची मोट बांधून ती हवी तशी वळ्वण्यात मास्तर वाकबगार आहेत. गेल्या वर्षभरात सेनेशी भांडत भांडत केलेला भाजपाचा संसार आता दाखवायच्या गोडीत असला तरी महाराज हे सेनेसाठी अनपेक्षित उमेदवार आहेत. त्यांचा काय प्रचार करायचा हे सेनेने ठरवलेच नाही तर करणार तरी काय. राज ठाकरेही एक सभा गाजवून गेले. आता भाजपाकडे हक्काची व्होट बँक नाही, दोन आमदार आहेत पण ते पट्टीचे राजकारणी असले तरी उमेदवार हा राजकारणी नाही आणि फक्त लिंगायत इतकीच आशा ठेवली शिंदेसाहेबांचे विश्वासातील काँग्रेस शहरप्रमुखापासून बरेच कार्यकर्ते लिंगायत आहेत. तर बौध्द, मातंग, कैकाडी, पारधी ह्यासह अनेक मागासवर्गीयाची मते फिरवायला आंबेडकर आले आहेत. शिंदे साहेबांची हक्काची व्होट बँक मुस्लीम, धनगर आणि संख्येने अल्पसंख्य असणारा उच्च्वर्णीय समाज ऐनवेळी काय निर्णय घेते त्यावरच सोलापूर लोकसभेचा निर्णय अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज
ढ
ढब्ब्या Mon, 04/22/2019 - 16:04 नवीन
वर एक मुद्दा दिसला नाही तो म्हणजे स्मार्ट सिटी. सोलापूरात स्मार्ट सिटी मधुन बरीच कामे झाली/चालू आहेत. उमेदवार बदलून भाजपानी कोणताही उमेदवार दिला असता तरी त्यांचाच विजय निश्चित वाटतोय. शिंदे आणी आंबेड्कर यांच्यात मतविभागणी होउन भाजपा सरळ विजयी होइल वाट्टय. पण ऐनवेळी शरद बनसोडेंची काटलेली उमेदवारी ही बौध्द आणि शहराबाहेरील मते फिरवू शकते => उमेदवारी ऐनवेळी कापली नाही, साधारण २-२.५ महिन्यापासुन महाराजांचे नाव फिक्स असल्याचा विडीओ वॉट्सअ‍ॅप वर फिरत होता ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
शाम भागवत Fri, 04/19/2019 - 11:00 नवीन
नांदेडला अंदाजे १लाख मतदान जास्त झालंय. ही मते कुठे जातील? काही अंदाज? २०१४ च्या मोदी लाटेतही टिकलेले अशोक चव्हाणसाहेबांचे काय होईल?
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Fri, 04/19/2019 - 11:09 नवीन
अपडेट : काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या आणि रिशतो के भी रूप बदलते है या गाण्याच्या नवगायिका प्रियांका चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश. प्रियांका चतुर्वेदीयांच्या रूपाने शिवसेनेने भाजपाच्या गायिकांना जोरदार टक्कर देण्याची तयारी केलीये
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/19/2019 - 15:15 नवीन
लोकसभा निवडणूक २०१९. अंदाज अपना अपना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
श
शाम भागवत Fri, 04/19/2019 - 11:11 नवीन
मागल्या वेळेस ८१००० मतांनी जिंकले होते. बसपाची जवळपास ६०००० मते त्यांच्याकडे सरकली होती. यावेळेस ही मते कुठे जातील? बसपा व वंचित आघाडीने एकत्रीत १ लाख मते मिळवल्यास चव्हाणांना पराभवाचा सामना करायला लागेल. २००९ साली बसपा व आंबेडकरवादी यांनी जवळपास १ लाख मते एकत्रीत मिळवली होती. कुणाला काही अचूक माहिती?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 04/19/2019 - 12:07 नवीन
क्लिंटनशिवाय निवडणूकीच्या धाग्याला मजा नाही
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 04/19/2019 - 14:53 नवीन
ते कुठे लिहीतात? ते कळले तर तिथे जाता येईल. काय काय माहिती त्यांनी डोक्यात साठवलेली असते. बापरे. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Fri, 04/19/2019 - 12:11 नवीन
मी यावेळेस निवडणूक फॉलो करत नाहीये.. अमच्याकडे प्रचाराने पण जोर पकडला नाहीये.. भाजपावाले एकदा येऊन गेले, काँग्रेसवाले फिरकले पन नाहीयेत. बापट उभे राहिले म्हणून दोघेही थंडावले की काय कळेना. पण ही सीट भाजपाची कन्फर्म वाटतेय.. शिरोळेंबद्दल थोडा असंतोष होता लोकांमध्ये, त्यापेक्शा बापट चालतील असे म्हणत होते..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 04/19/2019 - 13:17 नवीन
हो, ह्यावेळी म्हणावा तसा अटीतटीचा प्रचार होतोय, असं वाटत नाही. आमच्या इथेही फारशी हालचाल दिसत नाही. म्हणायला, 2-3 दिवस वंचित आघाडीची रिक्षा फिरली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
व
विजुभाऊ Fri, 04/19/2019 - 12:12 नवीन
राज ठाकरेंच्या सभांमुळे बारामतीच्या काकांची मते किती वाढतात याचे औत्सुक्य आहे
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 04/19/2019 - 14:34 नवीन
अमेरिकेतून निवडूण येणार आहेत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत याबद्दल आव्हाडांनी खात्री दिली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मराठी कथालेखक Fri, 04/19/2019 - 14:52 नवीन
आकडेवारीचा अंदाज करत नाही पण भाजप / रालोआला स्पष्ट बहूमत न मिळाल्याने काही इतर पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागेल आणि अशा पक्षांची अट असेल की नितीन गडकरी हे पंतप्रधान व्हावेत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 04/19/2019 - 15:14 नवीन
मलाही असंच वाटत होतं. पण अशी गोंधळाची स्थिती जेव्हा होते तेव्हा मतदानाची टक्केवारी घसरते. कोणाला मत द्यायचे? हे न समजल्याने मतदार घरीच बसायचे प्रयत्न करतो. २०१४ ला सुरवातीला कमी व नंतर जास्त असं मतदान झाले. त्याची जी सरासरी होती तिथूनच या वर्षी सुरवात झालीय. त्यामुळे आघाड्यांचे किंवा कडबोळी सरकार नक्कीच नसणारेय असं वाटतंय. जनादेश निश्चीत स्वरूपाचा किंवा कोणत्यातरी एका पक्षाला हुकमी बहुमत देणारा असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
व
वामन देशमुख Fri, 04/19/2019 - 15:54 नवीन
रालोआ : ३७५ ते ३९० (भाजपा ३००+, शिवसेना : १६ ते १९) संपुआ : ९० ते ११० (काँग्रेस : ५० ते ६०) इतर : ५० ते ६५ एकूण : ५४३
  • Log in or register to post comments
स
सुधीरन Fri, 04/19/2019 - 18:49 नवीन
एनडीए-170-190 (पैकी भाजप 130-150) युपीए- 270-290 (पैकी काँग्रेस 200-220) आतापर्यंत जे वातावरण आहे त्यानुसार हा अंदाज. भाजप हिंदी पट्ट्यात आणि महाराष्ट्रात खूप जागा गमावेल. काँग्रेससोबत त्याच्या मित्रपक्षांची कामगिरी उंचावेल.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 04/19/2019 - 20:26 नवीन
वामन देशमुख, माझाही अंदाज तुमच्या जवळपास आहे. माझ्या मते मोदी ४००+ मारताहेत. भाजप कुठवर जाईल याची उत्सुकता आहे. मोदींनी उदासीन मतदार घराबाहेर काढला हे स्पष्ट आहे. मतांची टक्केवारी पाहता मोदीशहांची व्यूहरचना चांगलीच फलदायी ठरली आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Fri, 04/19/2019 - 20:43 नवीन
माझा अंदाज एकटा भाजप बहुमत मिळवण्यापासुन बराच दुर. मित्रपक्षांसोबत सर्वात मोठा पक्ष , पण बहुमतासाठी इतरांचा पाठिंबा आवश्यक. युपीमद्धे जागा मोठ्या प्रमाणात गमावणार. महाराष्ट्रात मात्र बहुमत मिळणार एनडीए २४३ (२२३+२० , भाजप+ मित्रपक्ष) युपीए १९१ (१५८+३३ , कांग्रेस + मित्रपक्ष) इतर १०९ एनडीए इतर पक्षांसोबत सत्तास्थान ग्रहण करणार. मोदीच पंतप्रधान , गडकरींची संधी हुकणार.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 04/20/2019 - 06:42 नवीन
भाजपा 230 ते 240 शिवसेना 12 ते 13 कोंग्रेस 60 ते 70 बाकी वंचित वेगेरे अंधश्रद्धा आहेत असे मानतो मी बारामतीच्या काकाचा सूपड़ा साफ झाला पाहिजे या वेळी बाकी इतर पक्षाच्या कामगिरीबद्दल काही अंदाज नाही व्यक्त करु शकत. रागा वायनाडमधे काठावर पास होतील बहुतेक उत्तरप्रदेशमधे कोंग्रेसचे पानीपत होईल कदाचित, तसे ते झालेच होते. पण टक्केवारी वाढूंन देखील कोंग्रेसला काही फायदा होणार नाही. हिंदू मताच्या ध्रुवीकरणाचा भाजपला नक्कीच फायदा होईल. उत्तरप्रदेशमधे मात्र यादव स्वतःला हिंदू समजतात की नाही हा मोठा प्रश्न आहे. पण तसे ते दलितानाही जवळ करत नाहीत. याचा फटका मायावतीला बसेल व फायदा अखिलेशला होईल. दिल्लीत अजूनही बोलणी चालू आहेत. कॉंग्रेस व आप मिळाले तर दिल्लीत निवडणूक जड जाईल भाजपला
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 04/20/2019 - 08:00 नवीन
बारामतीकर काका, पुतण्या आणि कंपनीबद्दल अगदी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
ब
बबन ताम्बे Sat, 04/20/2019 - 10:32 नवीन
सध्या देशात मिक्स सेंटिमेंट दिसते आहे. रा गांचे मोदींवरचे सततचे बेछूट आरोप आणि 72000 ची भुरळ जर ग्रामीण भागात पडली तर काँग्रेसच्या सीट वाढण्याची शक्यता आहे. आत्ता तरी हंग पार्लमेंटची दाट शक्यता आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
इ
इरामयी Mon, 04/29/2019 - 16:21 नवीन
Hung Parliament असेल असं वाटत नाही. कारण यावेळी विरोधी पक्षांची अस्तित्वाची लढाई सुरू आहे. १) काँग्रेसच्या जागा वाढतील परंतु काँग्रेस प्रमुख पक्ष म्हणून स्वतःचा पंतप्रधान देऊ शकणार नाही. Congress जागा जास्त येऊनही अजूनच कमजोर झालेली दिसेल. २) भाजपच्या जागा कमी होतील. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भाजपविरोधी युत्या यावेळी भाजपला सरकार बनवता येणार नाही इतपत यश मिळवतील. ३) निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व भाजपविरोधी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील. ते पाच वर्ष टिकेल. २०२४ मध्ये भाजप पूर्ण बहुमत मिळवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा