महाराष्ट्रातील चालू घडामोडी
आज निवडणुकीचे वातावरण सर्वत्र असताना निवडणूकीच्या निकालानंतर महाराष्ट्राला व मराठी समाजाला काय मिळेल हा महत्त्वाचा विषय आहे. ह्या आधी लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला काय मिळाले होते? आपल्या महाराष्ट्रातून चार पाच खासदार मंत्री झाले म्हणून महाराष्ट्र व मराठी माणसाची प्रगती झाली असा काही ईतीहास आहे का? महाराष्ट्रातून तीनचार मंत्री मध्ये दोन ते तीन हमखास अमराठी असल्याने त्यांना महाराष्ट्र व मराठी बद्दल किती आपुलकी असेल हे शंकास्पद आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून उभ्या असलेल्या उमेदवाराला आपण महाराष्ट्रासाठी व मराठी समाजाला काय मिळवून देणार हे विचारले पाहिजे किंबहुना महाराष्ट्र व मराठी साठीच काम करेल अशा उमेदवाराला निवडून देउ असे खडसावले पाहिजे
असे एकच शहर भारता मधील सांगा आणि नंतर बिनबुडाचे कमेंट ध्यासंदर्भ : https://www.misalpav.com/user/32316 हे तुम्ही लिहिले होते ना ? त्यानंतर मी काही शहरांची नावे सुचविली तेव्हा तुम्हीच...ह्या शहरांची आणि मुंबई ची तुलना खालील पॉइंट वर गूगल वर शोधतो आणि रिझल्ट copy pest Karun इथे कमेंट देतोसंदर्भ : https://www.misalpav.com/comment/1032220#comment-1032220 असे लिहिले होते ना ? म्हणजे आतापर्यंत सगळे मुद्द्याला धरूनच चालले होते. मग आता घुमजाव कशाला ? गुगलवरची माहिती तुमच्या सोईची नाही हे अगोदरच माहीत होते. :) ते काहीही असो. तुमच्याशी चर्चा करण्यात "फायदा/वेळेचा व्यय" यांचे प्रमाण अत्यंत व्यस्त होत आहे. तेव्हा, तुम्ही तुमचे चालू द्या. यापुढे मी प्रतिसाद दिला नाही तर, मला या चर्चेत अजिबात रस नाही, असेच समजा. शुभेच्छा !