परप्रातीयांच्या आक्रमणा पासुन अवकाशातल्या माणसाला कोण वाचवेल का ? थॅनोस
आज अवकाशात प्रचंड संख्येने ऍव्हेंजर्स येत आहेत व ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे अवकाशातील थॅनोसचे जनजिवन विस्कळीत झाले आहे.
टायटनच्या आसपास च्या शहरात व गावात प्रचंड गर्दी वाढली असून मोकळा श्वास घेणे अशक्य झाले आहे व हे चित्र उर्वरित अवकाशात ही पसरू लागले आहे. थॅनोस संस्कृती व संस्कार नष्ट होत चालली आहे. दोन परग्रहवासी माणसे ही आपापसात हिंदी बोलताना दिसतात. हे असेच चालू राहीले तर थॅनोस अवकाशात अल्पसंख्यक होतील. ह्या ऍव्हेंजर्सच्या कायदा व घटनेत कुठलिच तरतूद नाही.
अशा वेळी थॅनोस ने काय करावे ब्रे ?
चुटकी वाजवावी कि वाजवू नये हाच प्रश्न आहे
💬 प्रतिसाद
(4)
भ
भंकस बाबा
Mon, 04/22/2019 - 18:37
नवीन
धाग्यापासून मिपाकराना कोणीतरी वाचवा हो!
हे संपादकमंडळ याना उद्देशुन आहे. भालेराव तुम्ही चालू ठेवा
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Mon, 04/22/2019 - 19:40
नवीन
कोणत्या धाग्यापासून वाचवा हे हि सांगा भंकस बाबाजी
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Sun, 04/28/2019 - 09:15
नवीन
हा .... हा .... हा .....
विडम्बन पर्फेक्ट जमलेय !
लगे रहो !
- Log in or register to post comments
ज
जालिम लोशन
Sun, 04/28/2019 - 09:32
नवीन
mast parody
- Log in or register to post comments