Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्रातील चालू घडामोडी १

स
स्वामि १
Wed, 05/01/2019 - 05:53
🗣 105 प्रतिसाद
भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का? प्रतेक जनतेला प्राथमिक गरजा, आरोग्य व पायाभूत सुविधा मिळत आहेत का? तरूणांना शिक्षणा नंतर योग्य नोकरी ची शाश्वती आहे का? वृद्धांना आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानाने जगता येइल का?
वर्गीकरण
मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती

प्रतिक्रिया द्या
35468 वाचन

💬 प्रतिसाद (105)
ध
धर्मराजमुटके Wed, 05/01/2019 - 06:40 नवीन
भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का?
होय
प्रतेक जनतेला प्राथमिक गरजा, आरोग्य व पायाभूत सुविधा मिळत आहेत का?
होय
तरूणांना शिक्षणा नंतर योग्य नोकरी ची शाश्वती आहे का?
होय
वृद्धांना आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानाने जगता येइल का?
होय
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 05/01/2019 - 07:30 नवीन
+१ इतकेच म्हणेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
उ
उगा काहितरीच Wed, 05/01/2019 - 11:13 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 05/01/2019 - 08:06 नवीन
महाराष्ट्रात मानवी मुल्ले मग इतर ठिकाणी काय अमानवी "मुल्ले" असतात काय?! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 05/01/2019 - 10:01 नवीन
नेमका हाच शब्द वाचून मि.पा. च्या भाषेत सांगायचे तर डोळे पाणावले. ;-) बाकी बुंदी पाडल्यासारखे धागे पाडणे सुरु आहे, ते चालु देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पाषाणभेद Wed, 05/01/2019 - 08:51 नवीन
दोनोळी धागा उडवावा ही विनंती. अन त्यातही "१" असे लिहीले असल्याने स्वामींना विनंती आहे की त्यांनीच हा धागा उडवण्याची विनंती संपादकांना करावी अन या पुढे मोठा धागा काढावा. आपले या वरील प्रश्नांबाबत काय मत आहे ते लिहावे, विवेचन करावे. ट्विटर प्रमाणे धागे काढू नयेत हि अपेक्षा.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 05/01/2019 - 10:32 नवीन
शिर्षकाचा आणि धाग्यात विचारलेल्या प्रश्नांचा काय संबंध आहे? तुम्ही विचारलेले प्रश्न हे महाराष्ट्रातील चालू घडामोडी ह्या सदरात मोडतात का?
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 05/01/2019 - 11:34 नवीन
लेखणीचा विनोदी बहर काही संपत नाही बुवा.
  • Log in or register to post comments
N
nishapari Wed, 05/01/2019 - 12:26 नवीन
10 वर्षे महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत 10 वर्षे मराठी विषय शिकून 10 पेपर दिल्यानंतरही तुम्हाला मराठी धड लिहिता येत नसेल तर तुम्ही मराठीचा अभ्यास नीट केला नाही असं सिद्ध होतं . मग इतिहास आणि नागरिकशास्त्राचा अभ्यास त्यापेक्षा अधिक चांगला असेल अशी काही शक्यता वाटत नाही , तो असता तर मुळातच वर जे प्रश्न विचारले आहेत ते पडले नसते. एरवी लेखकाने व्यक्त होणं महत्वाचं ; भाषा शुद्ध अशुद्ध याला फार महत्व नाही असं माझं मत आहे पण मराठी भाषा , मराठी भाषिक आणि महाराष्ट्र वगैरेच्या कळवळ्याच्या पोस्टी लिहिताना भाषा प्रमाण शुद्ध अशी अपेक्षा फार गैर नसावी . पोस्ट साधी दोनदा वाचायची तसदी घेतली असतीत तर 2 - 4 चुका सहज दिसल्या असत्या ... मिपा स्वतःहून सुचवतं - पोस्ट करण्यासाठी पोस्ट पूर्ण तयार आहे का की काही दुरुस्ती करायची आहे ... पण तुम्हाला डोक्यात आलं ते भराभरा खरडून पोस्टायचीच घाई ... महाराष्ट्र सुधारणं आणि वाचवणं खूप मोठी गोष्ट आहे , स्वतःची भाषा सुधारणं ही जरा जमण्यासारखी गोष्ट आहे , थोड्या प्रयत्नांनी ... राज्य सुधारण्याचे प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांना आपली भाषा सुधारण्याचे प्रयत्न करणं जड वाटू नये . आधी ही एवढीशी गोष्ट होते आहे का बघा तुमच्याच्याने ... मग राज्य सुधारण्याचं पाहू ... टप्प्याटप्प्याने जा , कसं ?
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Wed, 05/01/2019 - 23:57 नवीन
एक नंबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nishapari
स
स्वामि १ गुरुवार, 05/02/2019 - 07:16 नवीन
मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती आड कीतीही अडचणी आल्या तरी त्या फार करण्याची जिद्द मराठी रक्तात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nishapari
स
सुबोध खरे गुरुवार, 05/02/2019 - 15:27 नवीन
मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती आड कीतीही अडचणी आल्या तरी त्या

फार

करण्याची जिद्द मराठी रक्तात आहे. अडचणी फार करणे म्हणजे वाढवणे असा अर्थ होतोय म्हणजेच मराठी रक्त अडचणी वाढवणार आहे असं आपल्याला लिहायचंय का? एकदा नीट वाचून तरी पाहायचं अन्यथा शिवरायांवरील नाटकात झालेली स्थिती होईल. सिंहगडावर स्वारी करण्यापूर्वी शिवाजी राजे हताश झाले होते तेंव्हा नरवीर तानाजीनी म्हणायचे होते कि महाराज तुम्हीच असा धीर सोडू लागलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? या ऐवजी तानाजी म्हणाले महाराज तुम्हीच असा धूर सोडू लागलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? निदान प्रतिसाद प्रकाशित करण्यापूर्वी नीट वाचून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि १
श
श्वेता२४ Wed, 05/01/2019 - 12:52 नवीन
राज्य सुधारण्याचे प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांना आपली भाषा सुधारण्याचे प्रयत्न करणं जड वाटू नये . आधी ही एवढीशी गोष्ट होते आहे का बघा तुमच्याच्याने ... मग राज्य सुधारण्याचं पाहू ... टप्प्याटप्प्याने जा , कसं ? १ नंबर
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 05/02/2019 - 06:05 नवीन
भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का? ह्या para मध्ये दोन पॉइंट आहेत १) लोकशाही. ह्या मध्ये सर्वांना मतदानाचा हक्क असतो आणि तो देशाच्या कोणत्या कोण्यातील व्यक्ती देशाच्या कोणत्याही ही भागात राहत असेल तर वापरू शकतो परिणाम रोजगार असेल किंवा दुसऱ्या कोणत्या कारणाने देशातील काही राज्यातील लोकांचे प्रमाण इथे वाढले आहे ह्या मतदानाच्या हक्का मुळे ते महाराष्ट्र मध्ये राजकीय वातावरण गढूळ करतात .आणि हे राज्य सुधा आपल्याच मालकीचे आहे असे वर्तन करतात. २)कथित कायदा म्हणजे देशाची राज्य घटना जी राज्याच्या हिताला जपत नाही उलट कुठे ही राहण्याच्या हक्क देवून राज्य हिताला नख लावते . नोकरी मिळवण्ासाठी साठी मराठी लोकांना संघर्ष करावा लागतो विशिष्ट मनोवृत्ती वले परप्रांतीय स्थानिक लोकांच्या नोकरीच्या हक्का ल बाधा पोचवतात. लोकसंख्या वाढली की शहर बकाल होतात .पाणी ,वीज,ह्या साधन संपतीवर तान येतो. शहरांच्या प्रदूषण मुळे महाराष्ट्र मध्ये नद्या न चे पाणी प्रदूषित होते. एकंदरीत पाणी प्रदूषण ,हवा प्रधूषण ,सामाजिक प्रधुषण ,भाषेचे प्रदूषण दीर्घकालीन प्रदूषणाचे प्रकार आहेत ते सर्व आणि हे सर्व लोकशाही आणि घटना ह्या मुळे महाराष्ट्राचे मध्ये होत आहे
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ गुरुवार, 05/02/2019 - 07:09 नवीन
मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत ८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत. अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत ह्या विविध कारणांनी महाराष्ट्रात परप्रातीयांचे स्थलांतर होत आहे. काही ही झाले तरी छत्रपती शिवबा चे मावळे शांत राहणार नाहीत.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 05/02/2019 - 07:59 नवीन
मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत --- मुंबईची लोकसंख्या आहे साधरण २ करोड. व तुम्ही म्हणताय बेरोजगार लोकांची संख्या आहे ४०० लाख (४ करोड) हे कसे काय शक्य आहे ? -- ८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत. -- मुंबईची एकुण लोकसंख्या जर दोन करोड असेल तर ८ करोड लहान मुले आली कुठून ? -- तुम्ही जवळच्या काळात राहुल गांधीचे भाषण ऐकले आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि १
ट
टर्मीनेटर गुरुवार, 05/02/2019 - 08:32 नवीन
बहुतेक स्वामीजींनी राज ठाकरेंची भाषणे जास्त ऐकली असावीत... मुंबई राहुद्यात बाजूला... महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी देखील ताळमेळ नसलेली ही आकडेवारी त्यांनी कुठून मिळवली हा संशोधनाचा विषय आहे. स्वामीजी आपण महान आहात _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
व
विजुभाऊ गुरुवार, 05/02/2019 - 09:52 नवीन
मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत ८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत. अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत ह्या विविध कारणांनी महाराष्ट्रात परप्रातीयांचे स्थलांतर होत आहे.
ह्या कारणामुळे स्थलांतर कसे कय होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि १
ट
टर्मीनेटर गुरुवार, 05/02/2019 - 10:00 नवीन
असे प्रश्न धागाकर्त्यांना विचारायचे नसतात... :) ते नवीन धागा काढतील... उत्तरात नविन प्रश्न का विचारले जातात ह्या संबंधी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
स्वामि १ गुरुवार, 05/02/2019 - 14:57 नवीन
विविध कारणांनी महाराष्ट्रात परप्रातीयांचे स्थलांतर होत आहे हे आपण रोजच बघतच आहात. आपण बेसावध न राहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/02/2019 - 10:46 नवीन
आख्ख्या महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटीच्या आसपास आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे, त्यापैकी, एकट्या मुंबईत... मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत ८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत. ...हे इतके सगळे आहे ! म्हणजे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे, केवळ "मुंबईतील बेरोजगार आणि शाळेत न जाणारी लहान मुले" यांचीच बेरीज १२ कोटी होते. मग, (अ) ते सोडून मुंबईतले इतर लोक आणि (आ) मुंबईव्यतिरिक्त महाराष्ट्रातले लोक, कुठे गायब झाले आहेत... डार्क मॅटरमध्ये ?! =))

म्हणजे, कमालच आहे, नाही का ?!

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि १
R
Rajesh188 गुरुवार, 05/02/2019 - 08:29 नवीन
८ करोड लहान मुले पूर्ण महाराष्ट्र मध्ये सुधा नाहीत . काही वाटेल ते लिहू नका
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ गुरुवार, 05/02/2019 - 09:11 नवीन
भारतातील ८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत .(महाराष्ट्रात नव्हे भारतात) 400लाख बेरोजगार हा ही भारतातील आकडा आहे महाराष्ट्रातील नव्हे. Google search मधून आकडे घेतले आहेत चुकी बद्दल माफी असावी
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 05/02/2019 - 10:13 नवीन
चुकीला माफी नाही !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि १
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/02/2019 - 10:55 नवीन
=)) =)) =)) ते जरा... चुकीsssला माsssफी नाsssही !!!!!!!!!!!!!!!!!!!!!... असं अजून मस्तं दिसेल ! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
ट
टर्मीनेटर गुरुवार, 05/02/2019 - 11:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
इ
इरसाल गुरुवार, 05/02/2019 - 12:23 नवीन
भावना कळली बास्स्स्स्स्स्स्स........................
  • Log in or register to post comments
झ
झेन गुरुवार, 05/02/2019 - 18:21 नवीन
काय चाललयं काय ? एकदा मराठी माणूस, मराठी रक्त, महाराजांचे मावळे लिहिल्यानंतर तूम्ही लोक टींगलटवाळी थांबवायलाच तयार नाही. कायतर म्हणे मराठी शुध्दलेखन, मुंबईची- महाराष्ट्राची लोकसंख्या. आता मराठी माणूस थांबू शकत नाही. अजून धागे काढतच राहील.
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Fri, 05/03/2019 - 08:12 नवीन
धन्यवाद झेन, तुम्ही, राजेश 118 व इतर मराठी प्रेमी एकत्र आल्यास मराठी व महाराष्ट्रा द्वेषीचा नायनाट करू शकतो कोणी ही कितीही गोंधळ घातला तरी आपण मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी प्रयत्न करतच राहायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
प
प्रसाद_१९८२ Fri, 05/03/2019 - 08:28 नवीन
आप आगे बढो, हम आपके साथ है !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि १
य
यशोधरा Sat, 05/04/2019 - 05:19 नवीन
देवनागरी वापरलीत तरी मराठीत लिहा, स्वामी१ ना हिंदी सहन होणार नाही! काय समजलेंत!!! ( किंवा कदाचित त्यांना पाठिंबा देताय म्हणून दुर्लक्ष करतील म्हणा. काही सांगता येत नाय! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
म
महासंग्राम Wed, 05/08/2019 - 09:04 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
स्वामि १ Wed, 05/08/2019 - 03:54 नवीन
प्रसाद आपण एकत्र येणे गरजेचे आहे. चुका आपल्या कडून भरपूर झाल्या आहेत, मान्य आहे पण चुकीची सुधारणा होउ शकत नाही का? हार मानुन चालणार नाही. आपल्या मराठी माणसाकडे कर्तबगारी होती म्हणून १०० वर्षे भारतावर मराठ्यांनी राज्य केले पण आज मराठी माणसाची नेमकी कुचंबणा कोठे होत आहे हे शोधायला पाहिजेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
भ
भंकस बाबा Fri, 05/03/2019 - 09:52 नवीन
तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे मराठी मावळ्याचे बाहू( आय मीन बोटे) स्फुरण पावू लागले आहे. आता भविष्यात मिनिटाला एक धागा या गतीने जिल्ब्या पडल्या तर पहिल्यांदा तुमचा शालश्रीफळ देऊन जाहिर सत्कार करण्यात येईल हलकेच घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
स
स्वामि १ Sat, 05/04/2019 - 04:16 नवीन
मराठी व महाराष्ट्राची प्रगती चा ध्यास घेतलेले मावळे आपली लेखणी कधीच थांबणार नाहीत. आपण किती ही त्रास दिला तरी मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी वेगवेगळे धागे टाकले जाणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
उ
उगा काहितरीच Sat, 05/04/2019 - 06:03 नवीन
स्वामिजी साष्टांग दंडवत, तुमचा ध्यास वगैरे पाहून मी तर पुरता प्रभावित झालेलो आहे. आता माझे हात पण मराठीच्या व महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी शिवशिवत आहेत. मला मार्गदर्शन करण्याची कृपा करा. मी , एक सामान्य मराठी माणूस म्हणून मराठीच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी माझं घर-दार, नोकरी वगैरे सांभाळून काय काय करू शकतो ? आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत उका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि १
स
स्वामि १ Sun, 05/05/2019 - 05:25 नवीन
आपण नोकरी सांभाळून मराठी माणसासाठी व महाराष्ट्रा साठी लहान लहान सवई अमलात आणू शकतात. आपल्या घरासाठी व कुटूंबासाठी सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत आपण अनेक व्यहवार व खरेदी करत असतो व ह्यात बरीच लहानमोठी पैशाची उलाढालु होत असते हे पैसे किंवा व्यहवार आपल्या मराठी माणसा कडेच किंवा महाराष्ट्रातच होत राहीले तर आपल्याच माणसांची व महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती सुधारणा होत राहील. उदाहरण म्हणजे आपणास सूर्यफूलाचे (Sunflower oil) तेल विकत घ्यायचे असल्यास आपण ते मराठी दुकानदाराकडूनच घ्यायचे पुन्हा ते तेल महाराष्ट्रातील Product आहे का तपासून घ्यायचे. महाराष्ट्रातील उत्पादन घेतल्या ने महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे सूर्यफूलांची विक्री वाढेल व अर्थातच मराठी व महाराष्ट्राला आर्थिक मदत होईल. आता आपण म्हणाल मी नोकरी करतो मला काय फायदा? पण उदाहरण म्हणून महाराष्ट्रात राहात असलेले गुजराती, KGN, मुसलमान व केरळ मघिल नागरिक आपापसात संपूर्ण खरेदी व व्यहवार आपापसातच करतात व आज ते मराठी माणसा पेक्षा आर्थिक परिस्थितीत मजबूत आहेत. व त्यांना खरेदी करताना सवलत देतात व अर्थात फायदा आपणा सर्वांना होतो. सर्वत्र महाराष्ट्रात मराठी बोलायचे, जर गरज पडली तर इग्रजीत बोला. पण हिंदी ला विरोध करा. हिंदी ने मराठी वर प्रतक्षात व अप्रत्यश्यात आक्रमक केले आहे व त्यामुळे मराठी भाषा नष्ट होत आहे. आपण ही प्रगती साठी उपाय सुचवावेत. अनेक विषय अजून पुढे सांगितले जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
श
श्री गावसेना प्रमुख Sun, 05/05/2019 - 06:04 नवीन
तुमची कल्पना ही मराठा उद्योजक महासंघाची ढापलेली आहे. ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि १
स
स्वामि १ Sun, 05/05/2019 - 08:02 नवीन
मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती साठी कोणाही कडून प्रेरणा घेतली तरी चालेल पण मराठी माणूस महाराष्ट्रात दिल्ली व परप्रातीयांच्या गुलामगिरीत राहीला नाही पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
अ
अभ्या.. Sun, 05/05/2019 - 06:43 नवीन
KGN मधले नागरिक म्हणजे कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि १
स
स्वामि १ Sun, 05/05/2019 - 07:39 नवीन
कच्छ समाजातील एक जात असून ह्यांचे सर्व व्यवहार त्यांच्या समाजातच होतात व एकमेकांना सहकार्य करतात. जैन समाजाची संपूर्ण भारत भर syndicate व्यहवार होतात व आज भारतातील तो श्रीमंत समाज आहे. ह्या दोन्हीनी समाजाचे आपापले गुप्त planning आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sun, 05/05/2019 - 07:57 नवीन
काहीतरी बिनबुडाचे लिहू नका, KGN म्हणजे अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज सलीम चिष्टीना मानणारे मुस्लिम त्यांच्या दुकानावर आपण कसे श्री लिहितो तसे लिहितात. त्यात सिंडिकेट वगैरे काही नसते. कच्छी गुर्जर क्षत्रिय व्यवसायात असतात पण त्यांच्या फक्त आपापसात रोटीबेटी साठी केजीके समाज असतो. जरा खऱ्या व्यवसायाची अन निदान आवश्यक ज्ञानाची पूर्ण माहिती करून घ्या, स्वतः एखादा लहानसा का होईना व्यवसाय करून दाखवा अन मग मराठी लोकांनी कसे व्यवसाय करावेत ह्यावरचे दिवे पाजळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि १
म
महासंग्राम Wed, 05/08/2019 - 09:05 नवीन
मी KGF वाचलं चुकून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
इ
इरसाल Fri, 05/03/2019 - 09:33 नवीन
कोणी ही कितीही गोंधळ घातला तरी आपण मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी प्रयत्न करतच राहायचे. नक्की काय करणार आहात जरा सांगाल का म्हणजे जमलं तर आम्हीपण हातभार लावु.
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Sat, 05/04/2019 - 06:40 नवीन
धन्यवाद इरसाल, आपण सकारात्मक प्रतिसाद दिलात. मराठी माणसे हुषार, कर्तबगार व जाणकार आहेत, होती व भविष्यात ही ती कर्तबगार राहणारच. पण आजची मराठी माणसाची स्थिती पाहून वाइट वाटते. आज महाराष्ट्रातच मोठ मोठय़ा पदावर सदनी अधिकारी मराठी नाहीत. मग हे असे का? महाराष्ट्रात मराठी अधिकारी मिळत नसतील तर ते निर्माण झाले पाहिजेत ही तळमळ व तरतूद सरकार व घटणेत पाहिजे. मराठी माणूस माघे पडत असेल किंवा चुकत असेल किंवा आळशी होत असेल तर त्याला समज व शिक्षणाची तरतूद महाराष्ट्राच्या घटणेत नाही आहे. दिल्लीतील राज्यकर्ते व परप्रातीय महाराष्ट्रातून भरपूर पैसा कमावतात पर मराठी माणूस पोरका आहे. मुंबईत व महाराष्ट्रात भरपूर पैसा आहे पण मराठी माणसा कडे नाही आहे. आपण काय करायचे विचारलेत, आपले स्वगत. प्रथम आपण एकमेकांशी कधीच भांडयचे नाही, मतभेद चर्चेने सोडले जातात लोकजागृती करणे हा ही प्रथम कारेक्रम होउ शकतो मराठी संस्कृती जपली पाहिजे अजून ही बरेच आहे. आपण प्रतिसाद दिला बरे वाटले एक एक ऊपाय व मात्रा हळूहळू पुठे येत जातील व आपणही मार्ग सुचवू शकता धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
स
स्वामि १ Sun, 05/05/2019 - 06:32 नवीन
१)सर्व मराठी माणसांनी एकत्र या. २)आपापसात वैर ठेवू नका व भांडू नका. काही वेळेस आपल्या मघे मुद्दामहून भांडणे लावली जातात ३)सर्वत्र मराठीतूनच बोला, गरज पडल्यास इंग्रजीतून संवाद करा. इंग्रजी ही अंतरराष्टीय भाषा आहे व ती शिकलीच पाहिजे. हिंदी ला विरोध करा हिंदी भाषा हळूहळू मराठी भाषेवर आक्रमक करीत आहे. ४)महाराष्ट्रातील उत्पादने खरेदी करा त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याची व महाराष्ट्राची अर्थ वेवस्था सुधारेल. ५)आपली खरेदी व आर्थिक व्यवहार मराठी दुकानदार /ठेकेदार कडून करा अजून अनेक मार्ग सांगला येतील. आपणही मराठी च्या प्रगती चे मार्ग सुचवू शकता. परप्रातीयांच्या आक्रमणा पासुन सावध राहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
भ
भंकस बाबा Sun, 05/05/2019 - 13:50 नवीन
एक छोटीशी शंका मांजराच्या (आय मीन राजसाहेब, बारामतीचे काका-पुतणे, झालेच तर आपले वंचित आंबेडकर) गळ्यात घण्टा कोण बांधणार? हे सर्व तयार झाले तर मराठीचे झेंडे अटकेपार लावले जातील याची खात्री बाळगा. स्वामी तुम्ही या लोकांना भेटण्याचे कष्ट घ्याच. तुमच्यातली तळमळ का मळमळ या लोकांना दाखवून द्याच. करणार ना तुम्ही महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि १
श
श्वेता२४ Fri, 05/03/2019 - 09:37 नवीन
ते एकाच विषयावर निरनिराळे धागे काढत राहतील तुम्ही (शक्य झाल्यास टिंगलटवाळी न करता) प्रतिसाद देत राहा. ;D:D:D
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Sat, 05/04/2019 - 06:54 नवीन
कोणीही कितीही अडचणी आणल्या, शुद्ध लेखनाच्या चुका काढल्या, कितीही टिंगलटवाळी केली तरी मराठी माणसाचा प्रगती चा ध्यास घेतलेले मराठी केव्हाच थांबणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
च
चांदणे संदीप Sat, 05/04/2019 - 07:10 नवीन
आमच्या भागात, म्हणजे जिथे मी सध्या राहतो तिथे, साधारण दुर्लक्ष करण्यासाठीचे इक्सप्रेशन असे आहे, "याssडंय ते!" =)) Sandy
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा