Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(धागा काढण्याची तल्लफ)

न — नाखु, Fri, 05/03/2019 - 13:11
स्वामी चरणी समर्पित ... डोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला वाचण्यातील साधेपणा संपू लागला तेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच.... तर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा आशयाची पातळी इतकी खोल इतकी खोल.... कि आतला हेतूच दिसेनासा झाला ! धागा काढल्यावर चर्चा होईलच हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले? डोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा उगाचच हसे होताना, होउ द्यावे मुळातच धागा बदबदा काढू नये वाचकांना कष्ट देऊ नयेत ..... इतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये आता, डोक्यातील जळमटांना तसेच ठेउ नये जाउ पाहणाऱ्या शब्दकचर्याला थोपून ठेवू नये..... धागा काढण्याची तल्लफ मात्र.....?? तल्लफ काही माझ्या आधीन नाही...... वाचकांचीही पत्रेवाला नाखु

प्रतिक्रिया द्या
12680 वाचन

💬 प्रतिसाद (15)
श
श्वेता२४ Fri, 05/03/2019 - 13:39 नवीन
जबराट लिवलंय
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 05/03/2019 - 13:50 नवीन
पेरणा वाचतानाच तुम्ही आता असे काहीतरी लिहाल असे मनात आले होते पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/03/2019 - 14:40 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 05/04/2019 - 11:54 नवीन
धाग्यांचे जिथेतिथे मळे फुलवायचेय मला लवकरच कोटीवीर व्हायचेय दिवसाला दळायचेय दहा किलो कमीतकमी ओळखलं नाहीत मला , मी येक नंबर स्वामी किती लिहू आणि काय लिहू नकोनकोसे होते प्रतिसाद आले रे आले कि अजून स्फुरण चढते वाचकांना काय वाटते याचे मला काय त्याचे मी तर धागे काढत जाणार जरी असले कन्टेन्टचे लोचे गोंगाट, गदारोळ माजतो या मंचावर धागा येता माझा ओळखाल का कुणी खरे मला ? शोधून दाखवा आंजावर
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sat, 05/04/2019 - 17:22 नवीन
हे पण १ नंबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
झ
झेन Sun, 05/05/2019 - 13:04 नवीन
आता थांबणे नाही, नुसते धागे काढून होणाऱ्या टींगलटवाळी ला मराठी माणूस घाबरणार नाही, आता कवितेचा मळाही फुलवावा लागणार हे तो स्वामिंची १ नंबर ईच्छा
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 05/05/2019 - 13:35 नवीन
स्वामि कृपा असू द्या! :)
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sun, 05/05/2019 - 13:41 नवीन
घाबरु नका स्वामि ! मी तुमच्या पाठीशी आहेच. मराठी माणसाचे हीत न बगवनारे असल्या दुत्त दुत्त नाखुचाचांकडे तुम्हि लक्ष देउ नका. तुमची धाग्यांची कुरपा अखंडित राहु देत. आणखी असेच धागे निगावेत हि तो स्वामींची, चुकले श्रींची ईच्छा. ;-)
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 05/05/2019 - 14:10 नवीन
खैर समज होतोय,हे पुष्प स्वामीचरणी समर्पित केले आहे,तुम्ही आणंदावर वीरझण टाकले नाही आणि सांभासिकी दिली तर अजून मोठा पुच्छगुच्छ स्वामींना अर्पण करीन. शुद्धलेखन आणि वाक्यरचना फाट्यावर मारणे हेच मराठी माणसाचे आद्यकर्तव्य हीच स्वामिशिकरण स्वामिशिकवण अज्ञ बालक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
स
सोन्या बागलाणकर Mon, 05/06/2019 - 00:11 नवीन
लय भारी नाखुमामा!
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 05/06/2019 - 04:33 नवीन
आता मराटी मानुष, अमानुष खवळून उठेल. नाखु तुम्ही हे बरोबर केले नाही. आता ' नाखुच्या अन्यायकारी टिंगलटवाळीपासून वाचण्यासाठी क़ाय करावे?' असा धागा निघाला तर जबाबदार कोण?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 05/06/2019 - 04:33 नवीन
आता मराटी मानुष, अमानुष खवळून उठेल. नाखु तुम्ही हे बरोबर केले नाही. आता ' नाखुच्या अन्यायकारी टिंगलटवाळीपासून वाचण्यासाठी क़ाय करावे?' असा धागा निघाला तर जबाबदार कोण?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 05/06/2019 - 06:14 नवीन
काय न काय सुरु राहीलं पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 05/06/2019 - 07:06 नवीन
कविता वाचनात फारसे स्वारस्य नसलेल्या माझ्या सारख्या वाचकांच्या मनात कवितेबद्दल रुची निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे तुमच्या लेखणीत. मजा आली वाचायला!
  • Log in or register to post comments
व
वकील साहेब Mon, 05/06/2019 - 09:36 नवीन
नाखू आणि खिलजी दोघांच्याही कविता एकच नंबर. मजा आली वाचतांना. तुमच्या कवितेचे प्रेरणास्त्रोतांनी यातून काही अर्थबोध घेतला तर कवितेचे व्रत सुफळ संपूर्ण झाले म्हणायचे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा