Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रार्थना!

म — मनमेघ, Tue, 05/07/2019 - 14:45
देव भेटो वा न भेटो येऊ दे हे मागता आतला माणूस माझ्या नित्य राहो जागता । चाललो कुठल्या दिशेला हे न उमगे ज्या क्षणी एक ही साधी कसोटी आठवो त्या त्या क्षणी दुःख दुसऱ्या देउनी सुख येत नाही भोगता ।। हासता यावे मला पाहून इतरांना सुखी भावना माझी नसो सहवेदनेला पारखी या विचारांना कृतीही येऊ दे मज जोडता ।। कोण मी? हा प्रश्न राहो सारखा माझ्या मनी काय नाते या जगाशी? हे असावे चिंतनी आरसा बघतो तसे जग येऊ दे मज पाहता ।। ~ मनमेघ

प्रतिक्रिया द्या
3982 वाचन

💬 प्रतिसाद (9)
र
राघव Tue, 05/07/2019 - 17:31 नवीन
वाह! खूप खूप दिवसांनी एकदम अंतर्मुख करणारी कविता वाचायला मिळाली!! बंधो, "आतला माणूस माझ्या नित्य राहो जागता " ही ओळच सगळं व्यापून आहे. __/\__
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Tue, 05/07/2019 - 17:57 नवीन
छान
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे Tue, 05/07/2019 - 20:08 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Tue, 05/07/2019 - 21:39 नवीन
आतला माणूस माझ्या नित्य राहो जागता .... सुंदर. आवडली.
  • Log in or register to post comments
म
मनमेघ Wed, 05/08/2019 - 04:00 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 05/08/2019 - 06:47 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 05/08/2019 - 08:01 नवीन
खूप आवडली
  • Log in or register to post comments
म
मनमेघ Mon, 05/13/2019 - 12:02 नवीन
आपल्या प्रतिसादांबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Mon, 05/13/2019 - 14:49 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा