Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सोनसंध्या

इ — इरामयी, Sun, 05/12/2019 - 13:46
नाजूक, हळूवार गुलाब पाकळ्या संथ, शांत, तरंगत येतात जवळ, हलकेच् माझी सुन्दर रेशमी त्वचा नितळ, मऊशार, निरागस दुधासारखी छोटं का असतं सौदर्य? का बोलावं लटीकं फुकाफुकी? सुन्दर क्षण नाहीत निसटत कधीच गळून पडतात त्या आठवणी आणि ध्यास भाबड्या स्वप्नांचे मी बसूनच असते पाय सोडून पाण्यात, माश्यांशी खेळत ओंजळी ओंजळीने त्याच्या बांसुरीचे स्वर का बरं खुणावतात? आणि काय बरं सांगत असतात... हळूवार - ओठाओठी? मग पाणी होत जातं सोनेरी आणि आकाश होतं वही चित्रकलेची पावलं परतत असतात, वाळू उडत असते मी डुंबत असते, स्तब्ध नि:शब्द आनंदी तंद्रीप्रदेशात लांब कुठूनची मंद वार्‍याची झुळूक सुखावते सर्व जाणिवा मी रहाते तशीच - पहुडलेली !

प्रतिक्रिया द्या
1333 वाचन

💬 प्रतिसाद (1)
च
चांदणे संदीप Mon, 05/13/2019 - 04:59 नवीन
मुक्तक म्हणजे डेंजरस काव्याप्रकार. दुधारी. जमला तर कातिल, फसला तर आत्मघातकी. शांत निवांत सोनेरी संध्यासमय आणि तिला जाणीवेत उतरवून घेतानाचा भाव शब्दांत छान उतरलाय. छंदबद्ध असती तर अजून मजा आली असती. Sandy
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा