(प्रार्थना!)
(मनमेघ यांची क्षमा मागून)
स्वामि भेटो वा न भेटो येऊ दे हे मागता
आतला मराठी माणूस माझ्या नित्य राहो जागता ।
लिहितो कुठल्या दिशेला हे न उमगे ज्या क्षणी
एक ही साधी कसोटी नं आठवो लिहिताक्षणी
दुःख वाचका देउनी सुख नं लाभे लेखका।।
हासता यावे मला पाहून मिपाकरांना सुखी
भावना माझी नसो सहवेदनेला पारखी
या विचारांना कृतीही येऊ दे मज जोडता ।।
कोण मी? हा प्रश्न राहो सारखा माझ्या मनी
काय नाते या मिपाशी? हे असावे चिंतनी
आरसा बघतो तसे जग येऊ दे मज पाहता ।।
प्रेरना-प्रार्थना!
💬 प्रतिसाद
(2)
उ
उपयोजक
Tue, 05/14/2019 - 10:25
नवीन
दु:खातून बाहेर येण्यासाठी हा सामी(स्वामी)मधला तरतरीत डायलॉग बघा!
https://youtu.be/Y4v4mil0C84
- Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू
Tue, 05/14/2019 - 15:05
नवीन
दुखः संपले आता आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे :-))
- Log in or register to post comments