Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रियल रियल

श — शिव कन्या, Tue, 05/14/2019 - 13:46
बरे झाले मीराबिरा, राधागिधा तेव्हाच होऊन गेल्या.... मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या लिक़्विड जमान्यात प्रेमबिम, हळवेबिळवे, मनात संगत ओहो....ते काय असते आणि? आठवण बिठवण वेड्यांचा बाजार... एक कॉल मारायचा नाहीतर मेसेज धाडायचा बात करनेका मामला खतम. मनात आठवण, झुरणे बिरणे अरेरे, हाताबाहेरच्या केसेस... डिजीटल डिजीटल फिजिकल फिजिकल एवढेच काय ते रियल रियल बाकी जग तो मृगजल मृगजल... मीराबाई मीराबाई, तो तुम्हाला उन्हात भासे.... राधाबाई राधाबाई, तो तुम्हाला जलात दिसे.... भ्रम भ्रम भ्रम भ्रम भ्रम नुसते नुसते भ्रम..... बरे झाले बायांनो तुम्ही भ्रमात जगलात, भ्रमातच गेलात. छळ झाला, नाव गेले, तुमच्या प्रामाणिक भ्रमावर किमान कृष्णाने तरी प्रश्न विचारला नाही... बरे झाले थोर झाले तेव्हाच गेलात, जेव्हा प्रेम प्रेमच होते. उरल्या तुमच्या दंतकथा करू ना त्यांचे digitization फॉरवर्ड करू फटाफट, नाही कसले हेज्जीटेशन... मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या लिक़्विड जमान्यात तुमचे भ्रम नव्याने जपू पण, प्रेम म्हणताच प्रश्न विचारू.... -शिवकन्या

प्रतिक्रिया द्या
3765 वाचन

💬 प्रतिसाद (4)
M
mrcoolguynice Tue, 05/14/2019 - 14:07 नवीन
अरे मनमोहना, कळली देवा तुला, राधिका रे राधिका कळली राधिका रे कळल्या गोपिका साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही सात सुरांवर तन-मन नाचे तालावरती मधुबन नाचे एक अबोली होती फुलली तिच्याकडे नजर तुझी वळली नाही धुंद सुगंधी यमुना लहरी उजळून आली गोकुळ नगरी जीवन माझे अंधाराचे काळी काळी रात कधी टळली नाही उन्हात काया, मनात छाया कशी समजावू वेडी माया युग युग सरले, डोळे भरले आशेची कळी कधी फुलली नाही
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Tue, 05/14/2019 - 17:27 नवीन
लई झ्याक.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 05/14/2019 - 17:38 नवीन
मार्मिक !
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 05/15/2019 - 04:37 नवीन
नेहमीप्रमाणे छान कविता. आवडली
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा