Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हाटेल साठी नावे सुचवा

न
निशांत_खाडे
Mon, 05/20/2019 - 21:42
🗣 116 प्रतिसाद
सर्व मिपाकरांना नमस्कार! मी औरंगाबादेत २०-२५ ची सीटिंग असणारे एक नाश्ता व ज्यूस सेंटर सुरु करत आहे. दुकानाची जागा अंदाजे २८० स्क्वेअर फीट आहे. लोकेशन कॉलेज आणि शिकवण्याच्या परिसरात असल्याने कमीत कमी किमतीत पोटभर(Filling) आणि उत्तम दर्जाचे पदार्थ ठेवण्याचा विचार आहे. चहा, पोहे-जलेबी, शिरा, उपमा, उसळ, मिसळ पाव, बटाटे वडा,समोसे, पालक वडा, दही धपाटे, दोन तीन प्रकारचे पराठे, छोले भटुरे, पुरी भाजी, मसाले भात, पुलाव, डाळ खिचडी, राजमा चावल, छोले चावल व चार-पाच प्रकारचे ताज्या फळांचे ज्युसेस आणि शेक्स, लस्सी, ताक, रबडी, बासुंदी, होममेड श्रीखंड, होम मेड कुल्फी, असा मेन्यू करण्याचा विचार आहे. माझ्या या छोटेखानी उपक्रमासाठी नावे सुचवावेत तसेच काही सल्ला किंवा आयडीयाज असतील तर त्याही शेयर करावयात. या धाग्यास प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक मिपाकराला आभार म्हणून आपल्या हॉटेल चे एक कुपन व्य.नि. द्वारे दिले जाईल. तसेच जर हॉटेलचे नाव या धाग्यावर सुचवलेल्या पैकी ठेवले गेले तर ते नाव सुचवणाऱ्या मिपाकराला आमच्याकडून भेट म्हणून ३० कुपन दिले जातील. औरंगाबादकर मिपाकरांनी जरूर व्य.नि. करा तसेच वेळ काढून भेटायला या. हॉटेल आपलेच आहे. प्रतिसादांच्या प्रतीक्षेत!

प्रतिक्रिया द्या
112374 वाचन

💬 प्रतिसाद (116)
ग
गवि Wed, 05/22/2019 - 11:03 नवीन
वरील दोन्ही प्रतिसादात अत्यंत योग्य निरीक्षण मांडलेलं आहे. अर्थात इतकं सरळ साधं नसतं गणित, पण स्थूलमनाने बरोबर आहे. खूप लिहिता येईल. नावाने दीर्घकाळ फार फरक पडत नाही हे खरं, पण अमुक टाईपचं नाव ठेवल्याने नक्की फेल होईल असंही नसतं. जिथे चटक लागेल अशी चव असते तिथे लोक नुसते रस्त्यावर उभे राहून झुंबड करून बटाटेवड्याचा पुढचा घाणा किंवा भेळेचं पुढचं पातेलं बनून निघण्याची वाट बघत तिष्ठत असतात. वडे ट्रेमध्ये पडताच डेसपरेट होऊन नोटा नाचवत "ए मला दे रे पार्सल, ए अण्णा रांगेत घे रे , ओ साईडला व्हा" वगैरे भांडणे, ढकलाढकली इत्यादि करुन चार सहा वडापाव ज्यादाच मागून घेऊन ते मिळालेलं पार्सल पारितोषिक असल्याप्रमाणे नाचवत आनंदित मुद्रेने गर्दीतून बाहेर पडतात. अशा जागेला नाव नसलं तरी लोक ते बनवून घेतात. चव हा सिंगलमोस्ट लॉंग टर्म फॅक्टर.. बाकी सर्व दुय्यम. एमबियन्स, पाश्चात्य वळणाचं नाव, आरामदायक स्वच्छ जागा हे सर्व गुड टु हॅव.. पण व्यवसाय जिवंत ठेवण्यास पुरेसं नाही, त्या त्या भागातल्या क्राऊडला भावतील असे पदार्थ (पोहे उपमा पासून लजान्या, चीज फोंडयुपर्यंत) निवडक आणि सदैव उपलब्ध ठेवता येतील इतकेच.. मेनू तीन फूट लांब आणि आवडीने काहीही मागवलं की मात्र: ते सकाळीच मिळतं, थालीपीठ अभी नही है, चायनीज पुरा बंद है.. डोसा को टाईम लगेगा (म्हणजे = मिळणार नाही) आत्ता फक्त पोहे उपमा आणि मिसळच मिळेल इत्यादि वाक्ये ही अत्यंत घातक असतात. निवडक पदार्थ , सदैव उपलब्ध आणि अत्यंत चविष्ट बनतील अशी पद्धत. बस्स .. बाकी सर्व ऑप्शनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
M
mrcoolguynice Wed, 05/22/2019 - 12:26 नवीन
(१५-२० साल पुरानी बात है ... म्हणजे अगदी परवा परवा ) विश्वाच्या मध्यवर्ती शहरातील, मध्यवर्ती पेठेत माझे निवासस्थान होते. तेथील बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, यांच्या जुन्या वाड्यापुढे, एक लांब दाढी वाले सद्गृस्थ, संध्याकाळी अंडा भुरजीची हातगाडी लावून व्यवसाय करायचे. मार्केट मधे हातगाडीवरची अंडाभुरजी समजा १५ ला आहे, यांच्याकडे ती २० ला असायची. परंतु संध्याकाळी यांच्या हातगाडीवर तुफान गर्दी असायची.... कारण काय ? सिम्पल मेनू अंडा व पाव संबंधित सर्व प्रकार भुर्जी , ऑम्लेट इ इ रोजच्या रोज गाडी अत्यंत स्वच्छ , घासून पुसून लखलखीत ... सर्व बाजुने काचेची पारदर्शक तावदाने .. स्वच्छ . सुवाच्य अक्षरातील बोर्ड. (मेन्यू ) कुकिंगचे तेल सुद्धा पारदर्शक बेल्जीयम काचेच्या चंबूत ... तेल सुद्धा नितळ... निवांत स्थिर ... एक सुई एवढा सुद्धा कण (any foreign object ) त्यात दिसायचा नाही. गाडीच्या वर कुठेही पडलेला कांदा टमाटा यांचा एक कण , तेलाचा शिंतोडा नाही. कांदे टमाटे मोगर्यासारखे बारीक कापून एका भांड्यात व्ययस्थित, त्या भांडयांना बाहेरून कुठेही बरबटलेले हात उमटलेले नाही ... अभिप्रायासाठी एक A५ साईज ची वही , रेनॉल्ड्स चे पांढरे निळे एक पेन. मानेत व कमरेत हलणारी भरतनाट्यम नर्तिकेची मातीची मूर्ती , भुर्जी करताना हातगाडीला मंद धक्का लागल्यामुळे होणारी, मूर्तीची हालचाल ... वेगळाच अँबियन्स ... भुर्जी खायला जाताना असंच म्हणून जाताना मनात गिल्टी वाटायचं .. वाटायचं की छान शुभ्र ड्रायक्लिन बंडी पायजमा असा वेष करून आलं पाहिजे होत इथे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
च
चौथा कोनाडा Fri, 05/24/2019 - 09:31 नवीन
... भुर्जी खायला जाताना असंच म्हणून जाताना मनात गिल्टी वाटायचं .. वाटायचं की छान शुभ्र ड्रायक्लिन बंडी पायजमा असा वेष करून आलं पाहिजे होत इथे ...
+१ :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
अ
अभ्या.. Fri, 05/24/2019 - 09:33 नवीन
दणकट पायजमा, मुलायम बंडी, शालगर भुर्जी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
M
mrcoolguynice Fri, 05/24/2019 - 09:43 नवीन
पुण्यात / पुण्याचे जे जे काही असतं , ते अखिल भारतीय लेव्हलवरच असतं.... त्यामुळे "पुण्याचा" आणि "राष्ट्रीय" द्विरुक्ती आहे... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Wed, 05/22/2019 - 13:43 नवीन
परफेक्ट, नावात काही नसतं. अ‍ॅक्चुअली काही नसतं. आमच्या इथं गुंडाची भेळ नामक हॉटेल(त्याचे नाव दुसरेच आहे कैतरी जे मालकाला तरी माहिते का कुणास ठाऊक) धोधो चालत असते. शेजारचे हायफाय सेलिब्रेशन कॅफे कायम ओस पडलेले असते, त्याचे आत्तापर्यंत चार मालक बदलले. धंद्यात सेलिब्रेशन नाहीच. सोलापुरातील भैय्याची भेळ सेम तसेच. ठेंगील, हाक्के, नसले अशा इतर गावातील लोकांना ऑड वाटतील अशा आडनावानी, नावानी ब्रॅन्ड बनवला. आज त्यांचे नुसते नाव असले तरी हॉटेल धोधो चालते. सोलापुरातील डब्ल्युआयटी समोरचा बनकचोरी, बनसमोसासाठी फेमस अरविंद ह्याचे नाव तर शेजारील अरविंद स्टेशनरीवरुन ओळखले जाई. ब्रॅन्ड हा आपण बनवायचा असतो. आपण वाढवायचा असतो. त्यासाठी आवश्यक गोष्टी म्हणजे युनिक चव, कन्सिस्टन्सी, दरफलकाचे संशोधन(इतर ठिकाणचा रेट, सुटे द्यायला सोपे, कॉम्बो करायला सोपे म्हणजे वीस रुपयात मोठावडापाव आणि एक कटींग, पन्नास रुपयात मिसळ आणि ताक अशा ट्रिक्स) महाराज किंवा वस्ताद ला जपणे, चांगले वेटर नोकरीला ठेवणे, त्यांच्यावर सतत लक्ष राहु देणे. कुठे रेंगाळू देणे नाही, पैशाचा हिशोब एकवेळ अगदी चोख नसु दे पण असु देणे. जी सिस्टिम तुमच्या गावात रुळलीय आणि व्यवहाराला, मनुष्यबळाला सोपीय ती वापरणे (उगीच हायफाय करायचे म्हणून बिलिंग कम्प्युटराइज्डच कर, प्लेटा उचलायला पोरे ठेवायची पण सेल्फ सर्व्हिस असले काहीतरी करु नका, ज्याटाईपचे कस्टमर येतात किंवा अपेक्षित आहेत त्यानुसार करा.) सुरुवातीलाच मोठमोठे फ्लेक्स किंवा बॅक्लिट बॉक्स, डिस्प्ले, लायटिंग अशा गोष्टींवर खर्च करु नकात. त्यात थोडासा जरी चेंज करायचा असला तरी महागात जाते. आधी फक्त आणि फक्त इन्फ्रास्ट्रक्चरच बघा. स्पॉट, टेस्ट, रेट आणि सर्व्हिस हेच चार खांब मजबूत करा. ते एकदा दणकट झाले की मग डिस्प्ले, डिझाईन(जे काही ब्रॅन्ड तयार होईल त्याचे) थीम, स्टाईल, कॅम्पेनिंग अशा गोष्टी बघा. वस्ताद किंवा महाराज हा लै महत्त्वाचा फॅक्टर आहे, हॉटेल लाईन मध्ये कर्मचार्‍यांना उचल किंवा अ‍ॅडव्हान्स मोठ्या अमाउंटची पध्दत आहे. चाम्गला हुन्नरी वस्ताद मिळाला कि हळूच एक घरचा उत्साही मेंबर किचनमध्ये वावरु द्या. कुणीच नसले तरीही एकदोन आयटेम तरी आपल्याला बनवता आले पाहिजेत. किचनमध्ये लक्षही राहते. उधळमाधळ जपुन केली जाते. एक छोटा बर्नर काउंटर सकाळी पोहे, थोड्या वेळाने वडापाव आणि भजी आणि संध्याकाळी तोच बर्नर दाबेली किंवा पावभाजीसाठी युटिलाईज करा. मिसळ (किंवा औरंगाबादेत जे दिवसभर चालु शकेल ते आयटम) अशांना सेपरेट ठेवा. खूप सारे भरगच्च मेनुकार्ड करण्याएवजी हळूहळू वाढवत न्या. भरगच्च मेनु साठी प्रिपरेशनही तेवढीच दांडगी असावी लागते. आणि दररोज ते उरणं परवडणारे नसते. वेटर लोकांवर कम्पलसरी लक्ष ठेवा. किचनपाशी किंवा एकाच जागी रेंगाळू द्यायचे नाही. एका कोपर्‍यात मोबाईल घेऊन बसु द्यायचे नाही. एकदा सवय लागली की सोडविणे फार अवघड. मग मालकाला चोरुन कोपरे हुडकले जातात. उधारीत वेटरला डायरेक्ट साक्ष ठेवायचे पण कस्टमर पोरासोबत जास्त खिदळू द्यायचे नाही, अशा मैत्रीतून हॉटेलमालकाला गंडवले जाते. बिहारी नेपाळी मुले ठेवणार असताल तर त्यांचे कार्ड, पुरावा घेउन ठेवा. त्यांची वये कन्फर्म करुन घ्या. नेपाळी लोक त्यांच्या कार्डवर शक साल वेगळे लावतात. तिकडचे वर्षगणना वेगळी असते. बालकामगार इश्शु येऊ शकतो. त्यांच्या नातेवाईक वेटराचा जामीन घेऊन ठेवा. मालकालाच स्वच्छतेची आवड आणि सवड आहे हे कळले कि साफसफाई राहते हॉटेलात. दररोज रात्री फिनाईलने फरशी पुसुन घ्यायचा राबता ठेवायचा. अशा जबाबदार्या वेटराना कशा वाटून देता येतात ते बघा. ह्या बाबतीत प्रभाकर पेठकर काकांचे अनुभव रेफर करा. त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. पार्सल सिस्टिम चांगली ठेवा, प्लास्टिक किंवा पॅकिंग मटेरिअल साधेच वापरा पण सरकारी नियमात बसणारे आणि स्वच्छ वापरा. पेपरनॅपकीन च्या वापरावर लक्ष ठेवा. कॉलेजपरिसरात तो प्रचंड वाया घालवायचे प्रमाण असते आणि ते पर्यावरण आणि आर्थिक डृश्ट्याही परवडत नाही. डिशेस आणि बोल्स सर्विंगला असतात ते सुरुवातीलाच चांगल्या दर्जाचे, वापरण्यास सुलभ आणि रोटेशनला पुरेसे इतके घ्या. रिपिट येणार्‍या, त्या एरीयातील यंग कस्टमरांचे मोबाईल नंबर घेऊन ठेवा, त्यांना व्हाटसप वरुन मेसेज किंवा इमेजेसमधुन संपर्कात राव्हा, तेवढीच जाहिरात होत राहते. त्यासाठी काही स्कीम्स आणि क्रियेटिव्ह्ज बनवुन घ्या, मुलांमध्ये अशी पब्लिसिटी झाली कि अपोआप रिमाईंडस मिळत जातात. हॉटेल धंद्यात शेवटचा पॉइट म्हणजे पेशन्स. आज हॉटेल किंवा स्नॅक्स सेंटर टाकले की फुल्ल पब्लिक सुरु झाले असेही नसते. त्यासाठी पैशाचा बॅ़कअप ठेवा. कन्सिस्टंटली काम केले, प्रयोग केले आणि पूर्ण श्रध्देने धंद्यात उतरलात तरच या धंद्यात यश आहे. लैच टायपेगिरी केली पण धंद्यात अपयश आणि नुकसानीचा इतका अनुभव पाठीशी आहे की कुणी धंदा करतोय म्हणले की आवर्जुन बोलावेसे वाटते, त्याला यश मिळावेसे वाटते. त्याच्यातरी उदाहरणाने अजुन दोघे तिघे धंद्यात उतरावेसे वाटले तरी ती मोठी अचिव्हमेंट आहे. सो. जास्त काही झाले असेल तर क्षमस्व आणि आपल्या नवीन व्हेंचरासाठी लाखो करोडो अब्जो शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
अ
अभ्या.. Wed, 05/22/2019 - 14:23 नवीन
आणि एक राहिलेच की, तुमच्या स्कीमचे कुपन देऊ नका मला. देवदयेने आमच्या आदरणीय बिरुटे सरांनी कधी बोलावलेच औरंगाबादेला तर अवश्य येऊ आणि त्यांच्याच पैशाने तुमच्या हाटेलात मनसोक्त खादाडी करु हे प्रॉमिस. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ग
गवि Wed, 05/22/2019 - 14:31 नवीन
हो हो. मी पण. सर म्हणजे दरियादिल मनुष्य.. बाकी कसे का असेनात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ब
बबन ताम्बे Tue, 05/21/2019 - 15:10 नवीन
जरा वेगळे नाव - झुंबड
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 05/25/2019 - 18:58 नवीन
झुंबड
मस्त हटके नाव ! +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
स
सुखी Tue, 05/21/2019 - 16:15 नवीन
खावा sssकी
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 05/21/2019 - 16:16 नवीन
हटके -नेटके "चवदार तरी दमदार" इंग्रजी माध्यमातून लिहीताना के सुट्टा लिहा तुमचे आडनाव म्हणून सुद्धा बोधीत होईल.
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Tue, 05/21/2019 - 16:23 नवीन
स्वतः च्या नावाचा ब्रांड करता आला तर बघा ते जास्ती फायद्याचे आणि लोकांना आपल्यातील वाटेल.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Tue, 05/21/2019 - 16:29 नवीन
या धाग्यास प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक मिपाकराला आभार म्हणून आपल्या हॉटेल चे एक कुपन व्य.नि. द्वारे दिले जाईल.
कुपन मिळालं नाही :(.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 05/21/2019 - 16:37 नवीन
बंक-कर, Bunk-karr बंकर Bunk कर बंकर्स कॉलेज, क्लासला दांडी मारण्याच्या सवयीला प्रोत्साहन दिल्यासारखं वाटेल खरं.. सिरीयसली घेतलं तर.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 05/21/2019 - 17:34 नवीन
डेलिकसी द निशां
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/21/2019 - 17:43 नवीन
नाश्ता डॉट कॉम ठेवा. नाव नै आवडलं तरी औरंगाबादचा म्हणून कूपन पाठवालच मला माहिती आहे. नाही पाठवलं तरी नाश्त्याला तुमच्या हॉटेलात येईनच. :) बाय द वे कोणत्या कॉलेजजवळ सुरु करताय ? माझ्याच कॉलेजशेजारी तर नाय ना ? :) -दिलीप बिरुटे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 05/21/2019 - 17:48 नवीन
अर्धे कूपन फाडून मला द्या. लक्ष असू द्या. फक्त औरंगाबादकर असं शेवटी लिहिलंय त्याकडे लक्ष गेलं नव्हतं नीटसं. आशा मावळली. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/21/2019 - 17:56 नवीन
आदरणीय गविसेठ. आपण सुचवलेली नावे उत्तम आहेत, समजा त्यांना त्यापैकी एखादं नाव आवड़लं तर औरंगाबादकर म्हणून ती कुपन्स मला देण्यात यावी असे तुम्ही त्यांना सांगावे ही नम्र विनंती. आभार. -दिलीप बिरुटे (आपला नवशिष्य)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
निशांत_खाडे Tue, 05/21/2019 - 19:12 नवीन
फक्त औरंगाबादकर असे काही नाही. तुम्ही कधीही या. कुपन्स लवकरच पाठवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
निशांत_खाडे Tue, 05/21/2019 - 19:17 नवीन
उस्मानपुऱ्यात, उत्सव मंगल कार्यालयाच्या समोर. आयसीडी, बंसोड्स, सायन्स अकादमी, गायकवाड, गुरुकुल असे सर्वच क्लासेस २०० मीटर च्या आत आहेत. तुमचे कॉलेज एक-सव्वा किलोमीटर असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कोण Tue, 05/21/2019 - 17:55 नवीन
#ZeroPeriod BreakPeChai FoodForThought #HungryKya Hunger-Games ChaiPeCharcha Chit Chat
  • Log in or register to post comments
न
निशांत_खाडे Tue, 05/21/2019 - 19:06 नवीन
सर्वांचे आभार, प्रतिसाद येत राहूद्या. सर्वच नावे एक से बढकर एक आहेत. अजून हॉटेल चे काम चालू आहे, उदघाटनाची तारीख नक्की झाली कि सर्वांना व्य.नि द्वारे कुपन्स पाठवतो.
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Wed, 06/05/2019 - 05:07 नवीन
माझ्या घरापासून लांब नाहीये.. फुटूवाला (लगनसराई आटोपल्याने आता रिकामटेकडाच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशांत_खाडे
स
स्वप्नीलदमाळवे Tue, 05/21/2019 - 20:47 नवीन
१)उदरभरण 2)Headquarter ( काँलेज जवळ असल्याने codeword मध्ये बोलायला सोपे )
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Tue, 05/21/2019 - 21:05 नवीन
फुकुंनपी.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 05/22/2019 - 06:48 नवीन
अशा नावाचं एक चायनीज सेंटर होतं चिंचवडात. बंद झालं ते नंतर. Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जालिम लोशन
र
रमेश आठवले Tue, 05/21/2019 - 22:19 नवीन
जोश
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 05/21/2019 - 23:46 नवीन
Healthy n' Spicy असे काहीतरी नाव देऊन तुमचे पदार्थ चटपटीत असूनही आरोग्यासाठी उत्तम आहेत, असे वाटू द्या आणि प्रत्यक्षातही असू द्या. विविध प्रकारच्या Smoothies अवश्य ठेवा. https://www.indiatimes.com/health/recipes/14-smoothie-recipes-for-a-quick-and-superhealthy-breakfast-244608.html https://www.vegrecipesofindia.com/smoothie-recipes/ Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 05/22/2019 - 08:04 नवीन
चांगल्या हॉटेल ची काही लक्षणे १) स्वच्छता-- हॉटेलची टेबले वारंवार स्वच्छ कपड्याने साफ ठेवणे हे फार महत्त्वाचे आहे. हॉटेलातील कपडा पार कळकट होईस्तोवर बरेच हॉटेल मालक बदलत नाहीत. हि बाब मुलींना विशेषतः खटकते त्यामुळे अशा हॉटेल वर त्या नाक मुरडतात. दर आठवड्याला नवीन नॅपकिन विकत आणणे ही स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तम गुंतवणूक आहे. याच खर्च आठवड्याला २० ते ३० रुपयांपेक्षा जास्त नाही. २) बहुसंख्य हॉटेलात मेनुकार्डे कमी असतात आणि असली तरी वेटरना ती उचलण्याची घाई का असते हे समजत नाही. प्रत्येक टेबल वर २ मेनुकार्डे कायम स्वरूपी ठेवावी. १०० ग्राहकांपैकी एकाने जरी एक पदार्थ जास्त मागवला तरी त्या अतिरिक्त मेनूकार्डाचे पैसे वसूल होतात. मेनू कार्ड कुतूहलाने पाहिली असताना त्यातील एखादा पदार्थ आपण घ्यावा अशी साहजिक इच्छा ज्याचे पोट पूर्ण भरलेले नाही त्याची होते. ३) हॉटेलातील प्रत्येक कोपऱ्यात पंख्याची/वातानुकूलित यंत्राची हवा व्यवस्थित येईल हि काळजी घेणे. हॉटेलात बसणे आरामशीर असले तर नकळत ग्राहक तेथे परत येतो. ४) हॉटेलचा दर्शनी भाग प्रसन्न असावा. येणार ग्राहक बाहेरूनच "नको जायला" म्हणाला तर धंदा बसलाच समजा. ५) एखाद्या ग्राहकाने एखाद्या पदार्थाबद्दल तक्रार केली तर तो लगेच बदलून द्यावा. हॉटेलच्या धंद्यात अन्नपदार्थाची किंमत हि सर्वात कमी म्हणजे १०-२० % च्या वर जात नाही. चटणीला वास येतो आहे असे म्हटल्यावर आपल्याला येत नसेल तरी त्याजागी पर्यायि पदार्थ /केचप द्यावा. कारण मला वास येत नाही असे सांगितले तर ग्राहक मनात (किंवा उघडपणे) "आम्ही काय खोटे बोलतो आहोत का" असे म्हणतो आणि परत हॉटेलची पायरी चढत नाही. ६) श्री. पेठकर यांच्यासारख्या या व्यवसायातील अनुभवी आणि यशस्वी माणसांचा सल्ला जरूर घ्यावा आणि वेळोवेळी घेत राहावा. औरंगाबादला आलो तर आपल्या हॉटेलला जरूर भेट देईन (आणि बिल संपूर्णपणे भरेन) बाकी आपल्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Wed, 05/22/2019 - 08:33 नवीन
सुरेख प्रतिसाद! सगळे मुद्दे अगदी चोख आहेत. खूप प्रेमाने जरी नाही तरी अदबीने बोलणारे वेटर्स असतील तर ग्राहकाला चांगले वाटते. मी तर नेहमीच म्हणतो, हॉटेलच्या व्यवसायात तुम्ही काही हुकुमी गोष्टींची काळजी घ्या; ग्राहक अगदी चव बेताची आणि किंमती थोड्या चढ्या असल्या तरी पुन्हा पुन्हा येतात. स्वच्छता, प्रसन्न वातावरण, आरामदायी व्यवस्था, अदबशीर वेटर्स, माहितीपूर्ण मेनू कार्ड, तत्पर सेवा (हे खूप मह्त्वाचे; एका चांगल्या चवीच्या हॉटेलमध्ये केवळ सेवा ढिसाळ असल्याने लोकं जात नाहीत हे माझ्या पाहण्यातले उदाहरण आहे), ऐसपैस टेबले, वगैरे घटक असतील तर ग्राहक चवीकडे थोडे दुर्लक्ष करू शकतात. कुठल्याही व्यवसायात जर एकंदर अनुभव चांगला, विनाकटकटीचा, पटकन काम करून देणारा, तत्पर सेवा देणारा, ग्राहकाला आदराने वागवणारा, माहिती देणारा, निर्णय घेण्यात मदत करणारा, योग्य पर्याय सुचवणारा, ग्राहकाला बोलण्यातून आपलेसे करून घेणारा असेल तर माझ्यासारखा ग्राहक फार चिकित्सा न करता, अधिक पर्याय न तपासता, आणि किंमतीचा फार विचार न करता निर्णय घेतो असे निरीक्षण आहे. अर्थात, काहीच वस्तू किंवा सेवांच्या बाबतीत असे होते. कपडे, छोट्या-मोठ्या वस्तू, ईलेक्ट्रिक, प्लंबिंग सेवा, भाज्या, किराणा, क्वचित लागणार्‍या वस्तू, वगैरे मी वरील प्रकारचा अनुभव आल्यास पटकन घेऊन मोकळा होतो. ही कामे फारशी आवड नसल्याने ती पटकन कशी संपतील याकडे माझा कल असतो. थोड्या फार फरकाने या वस्तूंचा किंवा सेवांचा दर्जा सारखाच असतो; त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता खूप कमी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
असंका Wed, 05/22/2019 - 09:19 नवीन
बहुसंख्य हॉटेलात मेनुकार्डे कमी असतात आणि असली तरी वेटरना ती उचलण्याची घाई का असते हे समजत नाही.
माय ग्यान- १. टेबलावर मेनू कार्ड असणं म्हणजे ऑर्डर अजून दिली नाही हे ओळखायची खूण असू शकते, किंवा उलट. २. मेनूकार्ड पाण्याने किंवा अन्नपदार्थाने खराव होउ नये म्हणून, असंही असू शकतं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गड्डा झब्बू Wed, 05/22/2019 - 15:09 नवीन
कमाल झाली भौ त्यांनी हाटेल साठी नावे सुचवाला सांगितले आणि इथले लोक्स त्यांना धंदा कसा करावा कि करू नये यावर लेक्चर देऊन राहिले. आता हाटेल उघडून राहिले म्हंजी काहीतरी अनुभव असलच कि गाठीला. कि ते तुम्हाला हाटेल कसे चालवायचे असे विचारून राहिलेत? नाव सुचवा एवढाच त्येंचा प्रश्न आहे. बाकी जाऊ देत निशांत खाडे साहेब तुम्ही हाटेलाच नाव TTMM -तेरा तू मेरा मै असंच ठेवा. उधारी का धंदा खोटा हे लक्षात राहूद्या. आणी एक, हाटेलात प्रत्येक भिंतीवर घड्याळ लावा. पोराटोरांनी निवांत बसने वग्रे धंद्यासाठी मारक आहे 'आता उठा असे सांगायला लाऊ नका' अशा पाट्या लावायला हरकत नाही. बाब्बो बाकीचे प्रतिसाद वाचून मि पण अनाहूत सल्ले देऊन राहिलो कि :-)) माफी असावी.
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Wed, 05/22/2019 - 15:38 नवीन
आपण हे वाचले का?
माझ्या या छोटेखानी उपक्रमासाठी नावे सुचवावेत तसेच काही सल्ला किंवा आयडीयाज असतील तर त्याही शेयर करावयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गड्डा झब्बू
ग
गड्डा झब्बू Wed, 05/22/2019 - 16:14 नवीन
अरारारा ते वाचायचे राहूनच गेले कि. निशांत भाऊ मि पण सल्ल्या साठी जी माफी मागीतली ति परत घेतो. ते TTMM चा लक्षात राहूद्या, कुपन नाही पाठवला तरी चालेल. मुंबईसून संभाजीनगर येण्या जाण्याच्या खर्चाचा हिशेब केला तर मला इकडेच १० १५ दिवस नाष्टा केलेला परवडेल :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज
ध
धर्मराजमुटके Wed, 05/22/2019 - 15:22 नवीन
कॉलेजात आताशा वाचनाची आवड राहिली आहे की नाही ? आहे तर मराठी पुस्तके वाचतात की इंग्रजी ? असे असेल तर एखाद्या प्रसिद्ध पुस्तकाचे नाव पण देऊ शकता. उदा. "रारंगढांग" "कोसला" फा ईव्ह पॉईंट समवन" इ. इ. नवीन प्रयोग आहे, जर मला कधी हॉटेल टाकता आले तर मी नक्कीच पुस्तकाच्या नावांचा वापर करेन. राजकारणाची आवड असेल तर "चाय पे चर्चा" "कॉफी आणि बरच काही..." "निंबूज विथ निशांत" असे काही प्रयोग करता येईल.
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Wed, 05/22/2019 - 20:29 नवीन
भारी धागा आणि खत्रा प्रतिसाद. गवि, अभ्या, खरे वगैरेंना संचालक मंडळ म्हणून घेउन एखादं कुठेही हाटील सुरू केलं तर नक्कीच चालेल. ;) बाकी, कुपन्साठी एक-दोन नावं सुचवतोय. १. बघतोस काय? नाश्ता कर. २. किंवा सरळ नाश्ताचं भाषांतरीत नाव चालून जाइल. उदा. इंबीस (जर्मन), बोकादिलो (स्पॅनिश), कोलात्सिओन (फ्रेंच).
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 05/23/2019 - 04:15 नवीन
अन मांजर इलो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
S
shashu गुरुवार, 05/23/2019 - 14:42 नवीन
जब्राट It's जब्राट खा जब्राट व्हा जब्राट
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Fri, 05/24/2019 - 16:35 नवीन
आपल्या आसपासच्या सर्व यशस्वी खाद्यदुकानांची नावे तपासा. पुण्यातलं एक उदाहरण द्यायचं बावधन मधलं पीटर मोमो सेंटर. याचं "मोमोलिशियस, नॉर्थ-इस्टर्न मॅजिक, इशान्य वडा-लसूण" असलं काहीही भंपक असतं तर मी त्या दुकानात बिचकूनच पाय ठेवला नसता. मी आधी राहत होतो तेथे "चस्का चवीचा: एक भन्नाट मिसळ" की काय असलं नाव होतं.हॉटेल एव्हाना बंद पडलं असेल. बाणेरात "रॉनीज कोल्हापुरी कॅफे बिस्त्रो" नावाचं एक हॉटेल होतं. तेही बंदच पडलं. बावधनलाच आता "दि वडापाव कॅफे" असल्या नावांचे हाय-फाय कॉफी-वडापाव सेंटर आहे. थोड्याच अवधीत त्यांना गाशा गुंडाळावा लागेल यावर मी पैज लावायला तयार आहे. माझ्या थियरीनुसार नाव हे अतिसामान्य आणि कालानुषंगाने आधीच्या फॅशनचं असावं. तुमचं आडनाव अथवा भागाचं नाव अथवा गावाचं नाव. बास्स्. अजून एक उदाहरण द्यायचं तर बेंगलोरचं मावल्ली टिफिन सेंटर. बेळगावची स्वामी बेकरी. कोल्हापुरची खेमराज बेकरी. पुण्याचे मिलन, आवारे इत्यादी. यांच्यात कुठेही फॅन्सीपणा नाही. याचं कारण असं की अतिसामान्य नाव जूनपणाचे द्योतक आहे. नंतर तुम्ही किती निष्ठेने उत्तम दर्जाचे अन्न देता त्यावर तुमची पुढची मदार आहे. त्यामुळे तुमच्या भागाचे, तुमचे आडनाव/नाव दुकानाचे नाव म्हणून वापरा. पुढे ज्यूस सेंटर किंवा नाश्ता सेंटर असू द्या. उदा. "क्ष्क्षक्ष ज्यूस सेंटर". आता हे पटलं नसेल तर मी इतरत्र कुठेतरी दिलेली नावांची लिस्ट पाहा. आवडेल ते घ्या. खादाडी, मुदपाकखाना, खवय्या, बोटचाट, जिभल्याचाट, अरभाट, तर्री, वशाट, विळती, वदनी-कवळ-घेता, पोटभर, रांधण, पंगत, तडस, आग्रह, रस्सा, तोंडाला-पाणी, ढेकर, हुरडा, फोडणी, सरबराई, चव, गोग्रास, तीन दगड, आर, कालवण, फस्त, फराळ, न्याहारी, भूकलाडू-तहानलाडू, दशमी, शिदोरी, सांजोरी, आरोगण/ आरोगणा (लीळाचरित्रात खूपदा आढळतो , अर्थ: जेवण करणे) ओदन, कचक, चित्राहुती, हंडीबाग, अळका, गालदोडी, ताटशिंगार, जोग, तुंबडी, भुरका, खाणोरा, जावईजेवण
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Fri, 05/24/2019 - 16:48 नवीन
बाकी, तरुणाईला फॅन्सी नावं आवडतात असं म्हणणाऱ्यांसाठी सांगावेसे वाटते, 'पीटर मोमो सेंटर' येथे रोज शेकड्याने मोमोज फस्त केले जातात आणि खाणाऱ्यांचे सरासरी वय २५ असते. तरुणाई (फार घंताडा शब्द आहे) साठी परवडेबल असणं तरीही चवीला/दर्जाला/नगांमध्ये कोणतीही तडजोड नसणं एवढ्याच गोष्टी आकर्षित करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
P
palambar Sat, 05/25/2019 - 13:28 नवीन
"सेल्फी " पुण्यात "आम्ही पोहेकर" असे पोह्यांच्या प्रकाराचे हाॅटेल चालू झाले आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 05/25/2019 - 15:45 नवीन
शेवटी काय नाव ठेवलेत, ते सांगा नक्की.
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Sat, 05/25/2019 - 17:30 नवीन
लोकांनी हॉटेलला नावं ठेवायच्या आत तुम्हीच ठेउन मोकळे व्हा. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Sun, 05/26/2019 - 08:58 नवीन
आय डी नामाला जागताय की. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
च
चामुंडराय Sat, 05/25/2019 - 21:02 नवीन
खा डे हे नाव कसं वाटतंय ?
  • Log in or register to post comments
स
स्मिताके Mon, 05/27/2019 - 17:48 नवीन
1. Snack Shack 2. Spice 3. #कट्टा
  • Log in or register to post comments
न
नीळा Mon, 05/27/2019 - 18:59 नवीन
Khadadi katta
  • Log in or register to post comments
र
रोमन रेन्स Tue, 05/28/2019 - 00:06 नवीन
Timepass Katta
  • Log in or register to post comments
ए
एमी Tue, 05/28/2019 - 03:42 नवीन
छान. नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा प्रतिसाद वाचनीय आहेत. निशांत नाव चांगलं आहे तेच वापरा. निशांत कॅफे किंवा निशांत स्नॅक्स असं काहीतरी. वर आलेल्या सुचवणींपैकी कॉलेज कट्टा आणि झुंबड देखील आवडली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा