Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पोहे

ध
धर्मराजमुटके
Tue, 05/28/2019 - 13:43
🗣 35 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, "माझा आवडता पदार्थ" असा निबंध मला कोणी लिहायला सांगीतला तर मी अगदी परात भर लिहू शकेल. अगदी रोज तिन्ही त्रिकाळ पोहे खायला घातले तरी मी नाही म्हणणार नाही. लग्न जुळविण्या निमित्त अजून ५-२५ घरी पोहे खायला मिळतील म्हणून एकेकाळी मी कोण आनंदलो होतो पण हाय रे दैवा, १-२ प्रयत्नांतच लग्न जमले आणि ती इच्छा अपूर्णच राहिली. एवढेच काय पण पुढचा जन्म मला मानवाचा मिळाला तर साबूदाण्या सारखेच पोहे देखील उपवासाला मंजूर असावेत म्हणून मी देवाला साकडे घालणार आहे. पण हल्ली चांगले पोहे मिळणं दुर्मिळ झालयं काय ? मी आमच्या घराच्या बाजूला मिळणार्‍या दुकानातून "स्वस्तिक" ब्रॅन्ड चे पोहे घेतो. पण त्यांच्या चवीत देखील बदल झाल्यासारखा जाणवतो. डिमार्ट सारख्या ठिकाणी मिळणारे सुटे पोहे खाण्यालायकच नसतात. मध्यंतरी "बिग बजार" मधे सुरती पोहे, इंदोरी पोहे नामक काही पोहे घेऊन बघीतले पण मजा नाही आली. एकदा नाशिक वरुन पोहे आणले होते ते अप्रतिम होते. ब्रॅन्ड चे नाव आता आठवत नाहिये. डिमार्ट मधे बासमती पोहे नावाचा एक प्रकार उपलब्ध आहे तो कोणी खाऊन बघीतला आहे काय ? तर ठाण्या, मुंबईत कोठे उत्तम प्रति चे पोहे मिळत असतील तर नक्की सांगा ! अलिबाग, रोहा इकडे चांगले पोहे होतात असे ऐकून आहे, इथे त्यांची विक्री होते काय ? नक्की सांगा !

प्रतिक्रिया द्या
18794 वाचन

💬 प्रतिसाद (35)
य
यशोधरा Tue, 05/28/2019 - 14:16 नवीन
अगदी अस्साच अनुभव कोकणात मिळणाऱ्या लाल गावठी पोहयांबद्दल आला. मोठ्या कौतुकाने घरी आणले पण चव बिघडलेली आहे.. :(. हे पोहे खरे तर नुसते खायला सुद्धा चविष्ट असतात - जराशे गोडसर असे. पोहे भिजवून त्यात गूळ, किसलेले खोबरे घालून जराशी वेलची लावली की अगदी अहाहा! तिखटे करायचे असले तरी तसे करून वरून खोबरे भुरभुरवले आणि सोबत चहा! आता पोह्यांची चव राहिली नाही आणि गेले ते दिन गेले..!
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 05/29/2019 - 06:44 नवीन
लाल पोहे फक्त बघितले आहेत. अजून चव घेतली नाही. एकदा खाऊन बघावे म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
प्रमोद देर्देकर Tue, 05/28/2019 - 16:13 नवीन
आमच्या इथे 15 वर्षापूर्वी पनवेल इथून येणारे एक आजोबा आणि त्यांची मुलगी ह्यांच्याकडून आम्ही हातसडिचे पोहे घेत होतो. पण ते दोघेही वारल्यानंतर पोहे बंद. आता दुकानातून घेतो. तसेही आपल्या लहानपणी मिळणारे सगळे हाताने तयार करण्याचे पदार्थ आताशा मिळेनासे झालेत. नाचणीच्या सालींच्या वड्या, कासाळुच्या कंदाचे सांडगे , भोपळ्याचे बियांची चटणी असे अनेक पदार्थ माहिती अभावी वा वेळेअभावी दुर्मिळ झाले आहेत होतं आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प Tue, 05/28/2019 - 16:22 नवीन
डी मार्त मध्ये मिळणारे बासमती पोहे चान्गले असतात, लवकर संपुन जातात, त्यामुळे बर्याचद मिळत नाहीत, असा अनुभव आहे. असो अनिरुद्ध
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 05/29/2019 - 06:20 नवीन
आता या खेपेस डिमार्ट मधून बासमती पोहे घेऊन एकदा प्रयोग करुन पाहतो. खरे तर हे पोहे नेहमीच्या पोह्यांपेक्षा पातळ दिसत असल्यामुळे मी घ्यायला थोडासा घाबरत होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प
क
कंजूस Tue, 05/28/2019 - 16:25 नवीन
पोह्याच्या गिरणिवर मिळणारे पोहे गोडसर छान लागतात. तेच एक/दोन/तीन आठवड्याने खाऊन पाहा - चव गेलेली असते. कारण भात(फोलासह) गरम पाण्यात घालून काढतात तेव्हा किंचिंत शिजते. मग रोलरमध्ये चेपतात. शिजलेले असल्याने काळाने चव उतरत जाते.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 05/29/2019 - 06:39 नवीन
मला वाटते की तुमचा अंदाज बरोबर आहे. एकाच ब्रॅन्ड चे पोहे दरवेळी वेगळ्या चवीचे लागतात. बहुतेक बराच काळ दुकानात पडून राहिल्यामुळे चव बदलत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/28/2019 - 16:39 नवीन
लेख आणि प्रतिसादांतील पोह्यांसंबंधीचा उहापोह आवडला ! :) पोहे वापरून केलेले सर्व प्रकारचे पदार्थ आवडता हेवेसांन... पोह्यांचे पापड तर जीव की प्राण, वालाच्या बिरड्यासह तळलेले पोह्यांचे पापड एकदम वट्ट ! (स्वगत : हा लेख विडंबन असावा असा संशय मनात वारंवार उसळी का बरे घेत आहे? ;) :) )
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 05/28/2019 - 17:17 नवीन
हा लेख विडंबन असावा
अय्यो! ऐसन हय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ध
धर्मराजमुटके Tue, 05/28/2019 - 17:21 नवीन
नाही हो ! पोह्यांवर खरेचं माझं प्रेम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
केदार-मिसळपाव Tue, 05/28/2019 - 18:35 नवीन
तुळशीबागेजवळ एक दुकान आहे. तिथे विविध प्रकारचे पोहे मिळतात. तिथे प्रयत्न करा. तिथे बाजुला पाणीपुरी छान मिळते.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 05/29/2019 - 06:38 नवीन
धन्यवाद ! पण ठाण्यावरुन इतक्या लांब केवळ पोहे आणण्यास जाणे जमेलसे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव
स
सुचिता१ Tue, 05/28/2019 - 19:31 नवीन
ग्राहक संघा त मीळणार पोहे डीमार्ट , बीग बजार पेक्शा खूप चांगले असतात, पण त्यासाठी मेंबर बनायला लागेल.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 05/28/2019 - 19:54 नवीन
पोहे / चुरमुरे बनवायची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कोणी सांगेल का?
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 06/07/2019 - 15:18 नवीन
चुरमुर्‍याचे ठाऊक नाही. पण पोहे बनवण्याची घरगुती पद्धत अशी. भात सलग तीन दिवस पाण्यात भिजवून घ्यावा. पाणी दरदिवशी बदलावे. त्यानंतर तो वाळवून घ्यावा. वाळलेला भात नंतर उखळीत घेऊन कांडावा. तीन दिवस पाणी पिऊन भात टम्म फुगलेला असतो! तो लगेच चप्पट होतो. फोले पाखडून घेतलीत की पोहे तयार! गिरणीतही बहुदा हीच पद्धत असावी. अर्थात, तीन दिवस भिजवण्यात आणि एक दिवस वाळवण्यात वेळ घालवणे त्यांना परवडणारे नाही. तेव्हा गरम पाण्यात भात घालून तो नरम केला जात असावा. त्यानंतर प्रेसमध्ये घालून तो चप्पट केला जात असावा. टीप - फोलपटासहित असलेल्या तांदळालादेखिल भातच म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
पिंगू Wed, 05/29/2019 - 09:59 नवीन
पेणला चांगले पोहे मिळतील. आणि ठाण्यापासून जाऊन यायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sun, 06/09/2019 - 13:48 नवीन
+१ पेणला पोहे आणि पोह्याचे इतर पदार्थ उदा. पोह्याचे पापड, पोह्याचे पीठ, मिरगुंडे देखील चांगले मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
त
तेजस आठवले Wed, 05/29/2019 - 11:28 नवीन
जाडे हवेत का बारीक, मुंबई ग्राहक पंचायतीचे पोहे उत्तम प्रतीचे आणि स्वस्तही असतात. पण त्यासाठी मेंबर असायला हवे. ठाण्यात आर्यक्रीडा मैदानामागे शाहू मार्केट जवळ त्यांचा डेपो आहे. तिकडे शिल्लक राहिलेल्या वस्तू मिळतात(माझ्या मते फक्त मेम्बरांना, तरी पण एकदा विचारून खात्री करा) नाहीतर मला सांगा मी पुढच्या महिन्यात मागवून ठेवतो. किती हवेत? अलिबाग, रोहा, पेण, नागोठणे ह्या ठिकाणी उत्तम पोहे मिळतात. पण त्यासाठी तुम्हाला ST स्टॅन्डपासून थोडे दूर असणारा गल्लीतला टपरीवजा कळकट वाणी गाठावा लागेल. किंवा स्वतःच्या गाडीने जात असाल तर पेण-नागोठणे वाटेत पोह्यांच्या गिरण्या आहेत, तिकडून डायरेक्ट उचलायचे पोहे. मस्त ताजे असतात.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 05/29/2019 - 17:05 नवीन
अलिबाग, रोहा, पेण, नागोठणे ह्या ठिकाणी उत्तम पोहे मिळतात.
मला वाटते की हे जमविता येईल. शिवाय अधून मधून ठाण्यात कोकण बाजार ही असतात. तिथेही मिळू शकतील.
नाहीतर मला सांगा मी पुढच्या महिन्यात मागवून ठेवतो. किती हवेत?
मदतीबद्द्ल धन्यवाद ! वरील ठिकाणास भेट देण्यास जमले नाहीच तर नक्की व्यनि करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
व
वरुण मोहिते Wed, 05/29/2019 - 12:38 नवीन
जायचे नसेल तर ग्राहक संघ मधून मागवा नाहीतर पेण ला रायगड बाजार आहेच.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 05/30/2019 - 01:43 नवीन
परळी (खोपोली - पाली रस्ता, जांभूळपाडा स्टॉप अगोदर) इथून एकजण डोंबिवलीत आणतो. ४२रु/किलो . ज्या दिवशी स्टॉक येतो तेव्हाच्या आणि नंतरच्या चवीत फरक पडतो.
  • Log in or register to post comments
द
दिनेश५७ Tue, 06/04/2019 - 05:38 नवीन
मुंबई हून नाशिकला जाताना, घोटीजवळ किंवा भंडारदरा रोडवर मिळणारे पोहे चांगले असतात. मी एकदोन वेळाच तिथून घेतले होते , अलिकडे बरेच दिवसांत तिकडे गेलो नसल्याने ती चव अजून टिकून आहे का माहीत नाही.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 06/04/2019 - 05:58 नवीन
हा माझा ने हमीचा रस्ता आहे. हे जमू शकेल नक्कीच ! माहिती बद्दल धन्यवाद ! मिपावर इतके पोहेप्रेमी लोक्स आहेत हे बघून आनंद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिनेश५७
ध
धर्मराजमुटके Fri, 06/07/2019 - 10:20 नवीन
आज जागतिक पोहे दिन आहे ! पोहेप्रेमींना शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
S
Sanjay Uwach Sun, 06/09/2019 - 08:51 नवीन
देवआंनद यांच्या " हम दोनो " या जुन्या चित्रपटातील माझे एक आवडते गाणे आहे .ते असे "कभी खुदपे,कभी हलातसे ,रोना आया,बात निकली तो हर बातपे रोना आया. पण मी या पोह्यांना कंटाळून माझ्या भावना आशा व्यक्त करतो "कभी दडपे ,कभी सुजके, रोना आया. बात बदली तो ,हर बारमे उपमा खाया .
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/10/2019 - 17:28 नवीन
प्रमाणाच्या बाहेर अवांतर.... ;) कोणी गव्हाचे कुरमुरे [ मुरमुरे ] खाल्लेत का ? मस्त चव लागते त्याची. :) बादवे... माझ्या पाहण्यात आलेला कुरमुरे बनविण्याचा इडियो इथे देउन जातो :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jiyo Re Baahubali |Drums Version | Baahubali 2 The Conclusion | Prabhas & Anushka Shetty |M.M.Kreem
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 06/11/2019 - 03:45 नवीन
गव्हाचे कुरमुरे गव्हाचे कुरमुरे फार खारट असतात.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Tue, 06/11/2019 - 18:35 नवीन
तसे भिजवलेले पोहे तिखट, मीठ, कांदा, टोमॅटो आणि फोडणी टाकून मस्त बनवले जातात ते कोणी खाल्ले आहेत का ?
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Tue, 06/11/2019 - 23:23 नवीन
जसे पोहे पाण्यात भिजवून बनवले जातात तसे ते पाण्याऐवजी ताकात भिजवूनही बनवायची पध्दत आहे. छान लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
S
Sanjay Uwach Tue, 06/11/2019 - 19:43 नवीन
"पोहे" "कुरमुरे " या सारखा विषय प्रथमदर्शनी साधा वाटला तरी मराठी माणसाचे या गोष्टीशी फार जिव्हाळ्याचे सबंध आहेत ." कठीण काळात मी माझे नशीब अजमावीत होतो त्या वेळी मी रात्री फळीवर झोपत असे आणि चुरमुरे खाऊन दिवस काढले कि हो!!! अशा सारखी " विधाने आपण बऱ्याच थोर मोठ्या लोकांच्या तोंडून ऐकली असतील . महाराष्ट्रात प्रत्येक पोह्यची चव मात्र भाषे प्रमाणे बदलत जाते .या धाग्यात तशी अनेक उदाहरणे आली आहेत . माझ्या लहानपणी, माझी आई घरातच रात्री गरम पाण्यात भात भिजवत असे व सकाळी भट्टीतून पोहे तयार करून आणले जात .एक भल्या मोठ्या चुलीवर ,मोठ्या कढईत ते वाळुत भाजून घेतले जात , त्या लाल भडक कढईत ,सारी सूर्य मालिका दिसत असे आणि जळणासाठी भट्टीत कोंडा टाकणारा माणूस म्हणजे दिव्य . उघडाबंब ,घामाने डबडबलेला, त्यातूनच भट्टीत बीडी पेटवून शिलगावणारा किंव्हा भट्टी समोर बसून गरम चहा पिणारा . दिवाळीत हा व्यवसाय फारच जोरात असतो .मशीन मधून पोहे तयार करताना " ताई !! पव जाड काढू कि पाताळ ''असं आपुलकीने विचारणारा भक्त सुदामा .ज्यांनी हे अनुभवले आहे तेच सांगतील . कोल्हापुरा सारखे चुरमुरे जगात कुठेही मिळणार नाहीत .एखाद्या ढेर पोट्या माणसाने नवीन पांढराशुभ्र हाताचा बनियन घालावा ,तसे ते दिमाखदार दिसतात तर पंढरपुरी कुरमुरे मगरीच्या पाठी सारखे दिसतात . जयसिंगपूरच्या पुढे आल्यावर तिथे भडंग खूप छान मिळतो . हा चरमुरा "हवळा "ह्या विशिष्ठ भाता पासून करतात कि जे आता कालबाह्य होत आहे . याचे वाण कोल्हापुरातून केरळला पोहचले आहे व तेथून भात ,कोल्हापुरात येते . हा चुरमुऱ्याचा कारखाना पहायला, मी एकदा गेलो होतो . गुप्ततेसाठी या कारखान्याचे मालक मला आत पाहण्यास मज्जाव करतील असे मला प्रथम वाटले पण या उलट त्यानीं माझे स्वागतच केले. कुठलाही आडपडदा न ठेवता संपूर्ण कारखाना त्यांनी मला दाखवला कारण त्यांना ठाम आत्मविश्वास होता कि या माणसांना पोह्याची किव्हा भडंगाची चांगली चव कळते,याचा व्यवसाय मात्र यांना अजिबात कळत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 06/12/2019 - 07:45 नवीन
कोल्हापुरा सारखे चुरमुरे जगात कुठेही मिळणार नाहीत माझ्यासाठी हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Sanjay Uwach
न
नीलकांत Tue, 06/11/2019 - 21:46 नवीन
एक नंबर टेस्टी पोहे खायचे असल्यास इंदोर जावे. खास इंदोरी पोह्यांवर खास जाड शेव भुरभुरून खावेत ते इंदोरला. मस्त शेव पोहे खावे आणि व गरमा गरम जिलेबी. इंदोरचे पोहे हे खास चवीचे आहेत असं निरीक्षण आहे. इंदोरची चौकाचौकात मिळणारी साबुदाना खिचडी सोबत आलुचिप्स मस्तच लागतात. नागपुरात पोहे खावेत ते चनारस्सा टाकून. मस्त पोह्यांवर चना आणि तिखट रस्सा टाकून तो भुरकावा. तुमच्या मुंबई ठाण्याला पोहे कुठे मिळतील ते सांगता येणार नाही मात्र कधी या दोन्ही गावी गेलात तर पोहे खायला विसरू नका. - नीलकांत
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 06/12/2019 - 04:32 नवीन
अनुषंगिक अवंतरासाठी क्षमस्व मी पोह्यात आयर्न असते असे क्लेम्स काही वेळा वाचले ऐकले आहेत. पण तोच क्लेम तांदुळ भाता बाबत ऐकल्याचे आठवत नाही. तांदुळात नाही केवळ भिजवणे दाबणे या प्रक्रीयेतून आयर्न कसे अ‍ॅड होत असेल असा प्रश्न बर्‍याचदा डोक्यात येतो . पोह्यात आयर्न यात तथ्य आहे का ? असेल तर पालकशी तुलना केली तर किती प्रमाणात उपलब्ध होते ? तांदुळात नाही मग पोह्यात कसे येते ? कुणा जाणकारांना माहित असल्यास जाणून घेण्याची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 06/12/2019 - 08:04 नवीन
तांदूळ आणि किंवा पोह्यांत, लक्षणिय प्रमाणात, लोह दोन प्रकारे असू शकते : १. पाककृती करताना सर्वसामान्य भातापासून बनवलेले पोहे लोखंडी कढईत अथवा तव्यावर शिजवले असता त्यांच्यात लोहाचा अंश जातो. २. जेनेटिक इंजिनियरिंग : सर्वसाधारण भातात ०.२ मिग्रॅ / १०० ग्रॅ लोह असते (स्त्रोत : USDA). २.अ) सोयाबीनमधील फेरिटिन या प्रोटीनचे जनुक (soybean gene for the iron-storage protein, ferritin) भाताच्या जनुकांत संक्रमित करून बनविलेल्या भाताच्या वाणात नेहमीपेक्षा तीनपट जास्त लोह असते. https://www.researchgate.net/profile/Toshihiro_Yoshihara/publication/13195484_Iron_Fortification_of_Rice_Seed_by_Soybean_Ferritin_Gene/links/0deec5296fa661bec5000000/Iron-Fortification-of-Rice-Seed-by-Soybean-Ferritin-Gene.pdf २.आ) भातामधील nicotianamine synthase तयार करणार्‍या जनुकाला सक्रिय करणे. https://www.pnas.org/content/106/51/22014 यासंबंधी अजूनही काही प्रकारचे संशोधन चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
च
चिनार Wed, 06/12/2019 - 09:24 नवीन
आओ कभी नागपूर में.. सावजी चना पोहा खिलाते है..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा