Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष

ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/29/2019 - 11:46
🗣 67 प्रतिसाद
"ओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष" हे अनेक अंकी दीर्घ नाटक आहे. ते जेवढे ताणणे शक्य आहे तेवढे ताणत नेले जाईल. त्या कालखंडाचा उपयोग गांधी घराण्याच्या पायाखाली आपले स्वत्व अंथरण्यासाठी थोडासाही विरोध कोणाचा आहे हे ओळखण्यासाठी केला जाईल (व त्यांचा नि:प्पात केला जाईल)... आणि सरतेशेवटी अध्यक्षपदाची माळ कोण्या एकाच्या गळ्यात घातली जाईल. त्या उमेदवारीसाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत... १. खूप मनधरणी करवून घेऊन, खुंटा हलवून हलवून बळकट करून घेऊन, सर्व लहान-मोठ्या, उघड-छुप्या विरोधकांचा आपल्या इमानी सेवकांच्या हाती पूर्ण पाडाव करून, कॉन्ग्रेसजनांवर थोर उपकार करत आहे अश्या अविर्भावात, राहून गांधी परत अध्यक्षपद स्विकारतील. २. राहूल गांधी हे तसेही राजकारणासाठी तयार असलेले/होऊ शकणारे व्यक्तिमत्व नाही, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. आपले हितसंबंध राखण्यासाठी जमा झालेल्या स्वार्थी कोंडाळ्याने जबरदस्तीने बोहोल्यावर उभे केलेले आणि त्यांच्या पढवणूकीप्रमाणे नाचणारे बाहुले बनण्याचा पुरेसा अनुभव घेतल्यावर, हे आपले काम नाही हे त्यांना समजले असावे. त्यामुळे, त्यांना अध्यक्षपदाचा खरोखरचा कंटाळा आला असणे शक्य आहे. उगा पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीचा फास सतत गळ्याभोवती ठेवण्याऐवजी; स्वच्छंद, जगभ्रमंतीचे, राजकारणतापहीन पण त्याचबरोबर पक्षामुळे मिळणारे फायदे ओरपण्याचे; सुखासिन पूर्वायुष्य त्यांना खुणावत असल्यास आश्चर्य वाटायला नको. पण तरीही, कॉन्ग्रेस पक्षामुळे मिळणार्‍या मोठेपणा, सत्ता व अर्थकारणाची चावी दुसर्‍यांच्या हाती पूर्णपणे सुपुर्द करण्याइतके ते खुळे नाहीत... आणि त्यांनी तसे करावे म्हटले तरी, त्यांच्या 'मासाहेब' त्यांना तसे करू देणार नाहीत. याशिवाय, ज्यांना स्वबळावर महापालिकेची निवडणूकही जिंकणे शक्य नाही व ज्यांचे सर्वस्व गांधी घराण्याच्या चाकरीवरच अवलंबून आहे असे, 'मासाहेबांचे+युवराचांचे जवळचे शिलेदार', त्यांनी तसे करू नये यासाठी जिवाची बाजी लावतील, हे सांगायलाच हवे काय? तर मग, युवराज नाही तर पक्षाध्यक्ष कोण होईल? याचे दोन पर्याय होऊ शकतात... ... २.अ) रागांना मनविण्याचे सर्व उपाय थकल्यावर, खुद्द मासाहेबांना गळ घातली जाईल. * या पर्यायाला रागांचा किंवा जवळच्या शिलेदारांचा विरोध असण्याचा संभवच नाही (काय हिंमत आहे शिलेदारांपैकी कोणी विरोध करण्याची?!). पक्षाध्यक्षपद खुद्द आईच्या हाती असल्यावर, पूर्वीप्रमाणेच दाराआडून पक्षाच्या सत्ता आणि अर्थकारणामध्ये रागांची पाचही बोटे बुडालेली असतीलच ! ... २.आ) मासाहेबही थकल्या असल्यास, शिलेदारांपैकी जो सर्वात इमानी, सर्वात नम्र आणि सर्वात मुका (आणि आई-बेटा सोडून इतरांसाठी बहिरासुद्धा) असेल असा एकजण निवडून, त्याला बोहोल्यावर चढवून, रिमोटकंट्रोलने चालवला जाईल. यासाठी, सचीन पायलट, मल्लीकार्जून खर्गे, सुशिलकुमार शिंदे, शीला दिक्षित, मीरा कुमार, ए के अ‍ॅथनी, इत्यादी अनेक नावे चर्चेत आहेत (पहिल्या वाक्यात दिलेल्या अटी पूर्ण करणार्‍यांची कमी कॉन्ग्रेसला कधीच भासलेली नाही ;) ) यापैकी, ए के अँथनी, मल्लीकार्जून खर्गे, सुशिलकुमार शिंदे हे तिघेही, अनेक कारणांमुळे, गांधी घराण्याशी (खुद्द गांधी परिवारपेक्षा जास्त) इमानी आहेत. त्यांच्यापैकी एक (त्याक्रमाने) निवडला जाईल अशी माझी अटकळ आहे. :) * या पर्यायालाही मासाहेबांचा किंवा रागांचा विरोध असण्याचा संभव नाही (इतर शिलेदरांच्या विरोधाला विचारतोय कोण?). पक्षाध्यक्षपद रिमोट कंट्रोलने चालणार्‍या बाहुल्याच्या हाती असल्यावर, युपिए१+२ प्रमाणेच दाराआडून, पक्षाची सत्ता आणि अर्थकारण मायलेकांच्याच ताब्यात असेल ! शिवाय, "यश तेवढे आपले आणि अपयश मात्र दुसर्‍याचे" या नेहमीच्याच यशस्वी कॉन्ग्रेसी नाटकाचे प्रयोग, भविष्यातही यशस्वीपणे चालवता येतील, हा फार मोठा फायदा नजरेआड करून चालणार नाही. :) ====== अजून काहीसा चर्चेत असलेला तिसरा पर्याय म्हणजे, प्रियांका गांधी-वाद्रा. * प्रियांकाशी निष्ठा वाहीलेल्या गटाचे जोरदार प्रयत्न चालू असले तरी, त्यांची ताकद फार कमी आहे आणि त्यांची डाळ शिजणार नाही. याशिवाय, त्या नावाला कॉन्ग्रेसमध्ये महत्व देण्यास खुद्द रागांचा विरोध असल्याचे मागील काही वर्षांच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. याशिवाय, जावयाच्या विक्रमी उपक्रमांमुळे वाद्रा या नावामागे असलेली वादग्रस्तता आड येईल, हेवेसांन. तसेच, गांधी नाव मागे पडून वाद्रा नाव पुढे येण्याची आणि पुढेमागे गांधी मायलेकांचीच गच्छंती होण्याची शक्यता, मायलेकांना (आणि त्यांच्या हुजर्‍यांनाही), परवडणारी नाही. तेव्हा माझ्या मते हा पर्याय सुरुवातीलाच बाद आहे.
वर्गीकरण
राजकारण
चर्चा
आर्थिक-राजकीय
मनोरंजन
नाटके

प्रतिक्रिया द्या
36715 वाचन

💬 प्रतिसाद (67)
न
नितिन थत्ते Wed, 06/05/2019 - 11:35 नवीन
मी नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 06/16/2019 - 14:55 नवीन
लेखात व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे घटना उलगडत आहेत... १. पक्षाला टांगणीला लावून, पक्षाध्यक्ष रागा त्यांच्या रिवाजाप्रमाणे, परदेशात निघून गेले आहेत. काँन्ग्रेसी नेते याबाबत कधीच बोलत नाहीत (काय बिशाद आहे !). परंतू, 'लोकशाहीच्या भल्यासाठी एक भक्कम विरोधी पक्ष असायलाच हवा' असा सतत गळा काढणार्‍या 'तथाकथित' विचारवंतांना किंवा इतर पक्षांच्या नेत्यांनाही त्याबद्दल काय म्हणावे हे सुचत नाही आणि ते तोंडात गुळणी धरून बसल्याचे नाटक करत आहेत. इतर कोण त्याबाबत काही बोलले तर, 'तो पक्षाचा अंतर्गत मामला आहे' हा हुकुमाचा एक्का असलेला मुद्दा आहेच ! मात्र तो मुद्दा मांडताना, (अ) कॉन्ग्रेस स्वतःला राष्टिय स्तरावरचा पक्ष आहे व (आ) सद्या लोकसभेत खासदारांच्या संखेनुसार दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे... त्यामुळे कोणत्याही भारतियाला त्या पक्षाच्या अवस्थेबद्दल (किंबहुना, दुरावस्थेबाबत) बोलायचा आणि काळजी व्यक्त करायचा हक्क आहे, हे ते महोदय (सोईस्कररित्या) डोळ्याआड करत आहेत. २. घराण्याचे महत्वाचे "विश्वासू" शिलेदार (उदा : विरप्पा मोईली, इ) 'रागां'नी कडक निर्णय घेऊन पक्षावर शस्त्रक्रिया करायला हवी" असे माध्यमांत म्हणत, स्वतंत्र विचार असलेल्या (आणि काँन्ग्रेसमध्ये उरलेल्या) नेत्यांची गळेदाबी/गच्छंती करण्याची तयारी करत आहेत. हे म्हणजे, युद्धात हारलेल्या राजाने आपल्या सरदार-सैनिकांना जबाबदार ठरवून सुळावर चढविल्या सारखे होईल, नाही का? पण, एकंदरीत, "घराण्याचा मक्तेदारी हक्क एकदम निर्वेध करणे" हा प्रकल्प चालू असल्याने, तिकडे दुर्लक्ष करणे सहाजिकच आहे ! ३. "सोनिया आणि प्रियांका गांधी, पराभवाचे मूळ "पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या क्षमतेच्या कमतरतेत आणि अपयशांत आहे", असे म्हणत आहेत... कारण, नेहमीप्रमाणेच, "The King can do no wrong" !!! प्याद्यांना दोष दिला तरी ती बिचारी काय करू शकतात? मामला थंड होईपर्यंत जनतेची नजर (जबरदस्तीने का होईना पण) दुसरीकडे वळवता आली तरी खूप झाले... तसेही, जनता हल्ली त्या सगळ्याकडे फारसे लक्ष देण्याची तसदी घेत नाही, हे पण खरे आहेच ! अश्या तर्‍हेने, पक्षाला "थंड करून खाल्ल्यावर" मग, घराण्याचाच एखादा "ठप्पाबहाद्दर पाईक" बोहोल्यावर चढवून त्याला रिमोट कंट्रोलने चालवले जाईल अशीच लक्षणे दिसत आहेत. मग असा आयता बळीचा बकरा असल्यावर, पडद्यामागून राजकारण करून, सुखेनैव मलई खाण्यास, घराणे मोकळे राहील. अर्थातच, भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची तलवार डोक्यावर सतत टांगत असेल आणि ती तशी ठेवणारे सुब्रमण्यम स्वामी रोज स्वप्नात येऊन भिती दाखवत राहतीलच... त्याला नाईलाज आहे ! :)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 06/18/2019 - 08:21 नवीन
१. पक्षाला टांगणीला लावून, पक्षाध्यक्ष रागा त्यांच्या रिवाजाप्रमाणे, परदेशात निघून गेले आहेत. -- राहूल गांधींना परदेशात जायची इतकी घाई झाली होती, की काल खासदारपदाची शपथ धेतल्यानंतर सही करायला देखील त्यांच्याकडे वेळ नव्हता. .....
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 06/18/2019 - 13:54 नवीन
काय ठरलं मग ? "पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष" ही चर्चा काही दिवस थांबवायची ? सत्ताधार्‍यांना टेन्शनच आहे, एका नामधारी विरोधकाला वारंवार झोडप पायची संधी हळूहळू क्षीण होत जाणार !
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 06/18/2019 - 14:43 नवीन
चालुद्या की वं! करमणुकीला कायत्री पायजेल ना? सारखं सुध्दलेकनाच्या मागे लागून थोडीच करमनुक व्हनार हाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 06/18/2019 - 18:04 नवीन
'लोकशाहीच्या भल्यासाठी एक भक्कम विरोधी पक्ष असायलाच हवा' असा सतत गळा काढणार्‍या 'तथाकथित' विचारवंतांना किंवा इतर पक्षांच्या नेत्यांनाही त्याबद्दल काय म्हणावे हे सुचत नाही आणि ते तोंडात गुळणी धरून बसल्याचे नाटक करत आहेत. इतर कोण त्याबाबत काही बोलले तर, 'तो पक्षाचा अंतर्गत मामला आहे' हा हुकुमाचा एक्का असलेला मुद्दा आहेच ! मात्र तो मुद्दा मांडताना, (अ) कॉन्ग्रेस स्वतःला राष्टिय स्तरावरचा पक्ष आहे व (आ) सद्या लोकसभेत खासदारांच्या संखेनुसार दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे... त्यामुळे कोणत्याही भारतियाला त्या पक्षाच्या अवस्थेबद्दल (किंबहुना, दुरावस्थेबाबत) बोलायचा आणि काळजी व्यक्त करायचा हक्क आहे, हे ते महोदय (सोईस्कररित्या) डोळ्याआड करत आहेत. हे इतक्या लौकर इथे मिपावरही सिद्ध होईल असे वाटले नव्हते. =)) सजग नागरिकांनी सरकारवर नजर ठेवून त्याला सरळ मार्गावर राहण्यास जेवढे भाग पाडायचे असते, तेवढेच विरोधी पक्षांना त्यांच्या वैधानिक जबाबदार्‍यांची जाणीव करून देण्याची गरज असते. मुख्य म्हणजे, "निवडणूक हरले म्हणून आता विरोधी राजकीय पक्ष आराम आणि मजा करायला मोकळे झाले, आता त्यांच्यावर काहीच जबाबदारी नाही. त्या बिच्च्यार्‍यांना पाच वर्षे मोकळे सोडा." असा (वेडगळपणे किंवा (विरोधी पक्षाच्या पाठिराख्यांनी) हेतुपुर्रसर चलाखपणे) विचार न करता, "विरोधी पक्षांवर आता सकारात्मक कृती करून सरकारला सरळ मार्गावर ठेवण्याची जबाबदारी आहे", हा विचार जेथे रुजलेला असतो, तेथेच उत्तम लोकशाही व्यवस्था बनते. पूर्णविराम. मात्र, ती जबाबदारी म्हणजे, केवळ "विरोधी पक्षांनी बेजबाबदार आणि खोटी विधाने/कृती करून सरकारला जेरीस आणणे" नव्हे, हे सुद्धा नागरिकांनी ध्यानात ठेवायला पाहिजे... नाहीतर देशाच्या विकासाला खीळ लावण्याचे पाप, विरोधी पक्षांइतकेच, नागरिकांच्याही माथी असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
म
महेश हतोळकर Tue, 06/18/2019 - 14:54 नवीन
बॉक्सरभाई म्हणताहेत अधीर रंजन चौधरींना लोकसभा नेतेपद दिलंय. ते ममतादिदींचे "कट्टर शत्रू" असल्याने बॉक्सरभाईंना महागठबंधनाची फारच काळजी वाटू लागली आहे. So Adhir Ranjan Chaudhary is set to be Cong leader in LS. Among his qualifications, the 5 time MP from Bengal is Mamata’s prime enemy. So much for opposition unity in parliament. Ekla chalo re seems to be the Cong motto: when down and out, stay lonely in defeat!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/03/2019 - 19:57 नवीन
नाटकाचा पुढचा अंक सुरु झाला. राहूल गांधींनी दिला दिला असे चर्चेत असलेल्या राजीनाम्याचे पत्र आज पाठवले. एका वाक्यात कॉन्ग्रेसच्या पराभवाची वरवर जबाबदारी स्वतः स्विकारून, नंतर सगळ्या चुका/चुकीच्या गोष्टींची जबाबदारी इतरांवर... आणि तीही अत्यंत उद्धट भाषेत... टाकली आहे. मुख्य म्हणजे, त्यांनी केवळ मोदी/भाजपलाच नाही तर भारतातल्या सर्व संस्थांना आणि सर्व जनतेला दोष दिलेला आहे... त्यांच्या मते, मी जगातील सगळी तत्वे बाळगून होता आणि इतर सर्व एकतर विकले गेले आहेत किंवा निव्वळ मूर्ख आहेत ! आता "पक्षाध्यक्ष कौन?" या नावाचा पुढचा (अजून एक) अंक सुरु झाला. हा अंकही दीर्घ असणार असे दिसते कारण "अंतरिम अध्यक्ष" म्हणून ९२ वर्षे तरूण असलेल्या व्होरा (ज्यांना काहीजण कॉन्ग्रेसचे "मिस्टर इंडिया" म्हणतात) यांची कॉन्ग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निवड केल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. इतर काही नाही तरी, येते अनेक दिवस विनोदी चर्चा करण्यासाठी माध्यमांना उत्तम खाद्य मिळाले आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/04/2019 - 06:35 नवीन
राजीव गांधी नी राजीनामा देणे ही एक राजकीय खेळी असू शकते .ती सुद्धा पूर्ण विचार करून . राजकीय डावपेच समजण्यासाठी सरळमार्गी विचार करून चालत नाही. जी परिस्थिती आपल्याला दिसत आहे ती तशीच आहे असे वाटत नाही . काँग्रेस च नेटवर्क पूर्ण देशात आहे किती ही नाकारले तरी त्यांच्या विचारला मानणारा समाज भारतात आहे भले कमी असेल. अध्यक्ष कोण होईल हे महत्त्वच नाही तर जो होईल तो गांधी घराण्याचं बटिक असेल हे नक्की . ह्यातून एक फायदा होईल हुकूमत गांधी घराण्याची चाललं पण घराणेशाही चा आरोप करता येणार नाही . मुलायम सिंग ची जशी जनतेवर पकड होती तशी अखिलेश ची नाही . लालू जसे जनप्रिय होते तशी त्यांची मुलं नाहीत शरद पवार जसे लोकांच्या मनात होते तसे सुप्रिया किंवा अजित नाही . बाळासाहेब ची सर उध्दव ला कधीच येणार नाही. त्याच न्यायाने इंदिराजी नी जशी हुकूमत गाजवली तशी हुकूमत गाजवणारा आता गांधी घराण्यात कोण्ही नाही.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 07/06/2019 - 14:18 नवीन
सचिन पगारे का ???????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/10/2019 - 20:28 नवीन
Sonia Gandhi named interim Congress president after day-long CWC meet घराण्याला कॉन्ग्रेसच्या अध्यक्षपदावरची पकड सोडणे आणि घराण्याच्या पाठीराख्यांना माता-पुत्राचे पाय सोडणे शक्य होणार नाही, असे म्हटले तर काही लोकांना राग येतो. मात्र, रागांनी रागारागाने राजिनामा देऊन पाच आठवडे लोटले तरी नवीन पक्षाध्यक्षाचे नाव ठरवणे कॉन्ग्रेसला अजून शक्य झालेले नाही आणि आज मातोश्रींच्या गळ्यात हंगामी पक्षाध्यक्षपदाची माळ घातली गेली... याला काय म्हणायचे ?! १२५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या आणि भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या व नंतरच्या सगळ्या (फक्त) चांगल्या गोष्टींवर जन्मजात हक्क सांगणार्‍या पक्षामध्ये एक पक्षाध्यक्ष निवडायला एवढी समस्या? काय ही अवस्था ?! :(
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 08/11/2019 - 05:16 नवीन
धागा लेख भविष्यवाणीतील पर्याय २अ चपखल ठरली, तेव्हा काँग्रेसची राजकिय नाडी परीक्षा सुयोग्य पद्धतीने केल्या बद्दल डॉक्टरांचे अभिनंदन जेवढा काळ पक्षाध्यक्ष पदाची माळ सोनीयाजींनी स्वतःच्या गळ्यात ठेवली तेवढी नेहरू आणि इंदीराजींनीही न ठेवता किमान नामधारींच्या गळ्यात ठेवण्याचे उपकार कोंग्रेस पक्षावर केले. काल वर्किंग कमिटीने पुन्हा एकदा सोनीयावर शिक्का मोर्तब केले तेव्हा 'खोदा पहाड निकली बुढीया !' हे ट्विट लगोलग आले. २ आ या आपल्या पर्यायासाठी बुलढाणा-रामटेकचे मुकुल वासनीक यांचे नाव मागचे दोन तीन दिवस नाव दिसत होते . कोण हे मुकुल वासनिक म्हणून शोध घेतला तर आपल्या पिताश्रींच्या पिढीपासून हे नेहरु-गांधी-वड्रा घराण्याच्या सेवेत आहेत आणि राहुल गांधींसाठी सारखी उठबैस करतात. बुलढाणा किंवा रामटेक मधून एक निवडनूक जिंकणे एक हरणे असा मुकुलरावांचा क्रम असतो असे कळले. मुकुलरावांची आणखी माहिती युट्यूबवर शोधली तेव्हा ते महाराष्ट्रातील मतदार संघातही आपण काय बोलतो ते गांधी घराण्यास वापस गेल्यावर दाखवता यावे म्हणून आवर्जून मराठी टाळून हिंदीतून बोलत असण्याची शक्यताही जाणवली. मुकुल वासनिकांचे हिंदी भाषण कौशल्य चांगले आहे. पॉलीटीकली राईट बोलण्याचे आणि गांधी घराणे ते स्वपक्षीय ते विरोधकांनाही न दुखावण्याचे कौशल्य अफलातून आहे पण राजकीय विचार आणि धार यांचा अभाव आहे. बहुधा डिग्गी राजांची जराशी सलगी का काय देशप्रेमी माजी उपराष्ट्रपतींच्या काळात राज्यसभा टिव्हीवर झिंग्यांची भुर्जी दाखवुन परिवाराची सेवाकरून एन्डीतीव्हवर बातम्या आनूनही काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडत नाही . स्वैपांक किती छान केला तरी हुजरेकरी स्वैपाक्या अशी हैसियत करून घेतल्यावर लुटूपुटूचेही मालक होता येत नाही हे काल मुकुल वासनिकांना समजले असावे. स्वाभिमानी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून काँग्रेसला हुजरेकरी मिळवता येतात या महाराष्ट्रीय गतीचे वाईट वाटले . सोनीयाच्या पुनश्च घोषणेपुर्वी काही मिनीटे राहुल गांधी बाहेर आल्या नंतर काँग्रेस अध्यक्ष पदा बाबत राहुल गांधी काही बोलतील म्हणून गराडा घातलेल्या पत्रकारांसमोर राहुल गांधींनी मला तर काश्मिर प्रश्ना संबंधात बोलवण्यात आले होते हे सांगुन थांबले असते तर राहुल गांधी कसले त्यांनी काश्मिर मध्ये हिंसक घटनेच्या बातम्या असल्याची पाकीस्तान्यांना शोभेलशी संतापजनक भाषा वापरली. त्या नंतर एनडी टिव्हीचा रिपोर्टर सुद्धा त्या अफवा आहेत आणि काश्मिर मध्ये आलबेल असल्याचे सांगत होता. राहुल गांधींना काश्मिरची काळजी वाटते एवढे म्हणूनही सरकारला प्रश्न विचारता आला असताच पण देशाचे काही होवो देश विरोधी बोलणे थांबवणार नाही असा पणच लांगलचलक पक्षाने घेतलेला अद्याप सोडलेला नाही आणि बुढीया आणि तिचा राजदुलारा सुद्धा :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/11/2019 - 09:03 नवीन
१. असे म्हणतात की कॉन्ग्रेस वर्किंग कमिटिच्या सभेत प्रियंका वद्राचे नाव पुढे येऊ लागल्यावर, "पुढचा पक्षाध्यक्ष गांधी नसावी" असा हट्ट धरला. कारण, प्रियांका पक्षाध्यक्ष झाल्यास, "रॉबर्ट वाद्राची पकड कॉन्ग्रेसवर बसून आपल्या 'महत्व व मलाई'ला धोका पोहोचेल", हे न समजण्याइतके रागा बुद्दू नाहीत. २. याशिवाय, जुने आणि तरूण कॉन्ग्रेसी, या दोन गटांत इतके मतभेद आहेत आणि त्यांनी एकमेकाचे पाय इतक्या वेळा ओढले आहेत की, त्यांच्यापैकी कोणा एका गटाला अध्यक्षपद मिळणे म्हणजे दुसर्‍याची गछंती नक्की, असे समीकरण बनले नक्की आहे... अर्थातच, नॉन-गांधी पक्षाध्यक्ष्याची निवड तेव्हाच होऊ शकते, जेव्हा या दोन्ही गटांत नसलेला आणि गांधी घराण्याची हुजरेगिरी करण्यात तरबेज असलेला उमेदवार पुढे येईल. त्याला अर्थातच वरच्या दोन्ही गटांचा (अंतर्गत विरोध) आहे... (रिमोट कंट्रोलच्या ताब्यातल्या का होईना, पण) राजकारणात महत्वाचे असण्याने मिळणारी मलाई हातून जाणे कोणाला परवडेल?! वरचे दोन मुद्दे पाहता, बिनविरोधी ठरू शकेल (किंबहुना, ज्याला कॉन्ग्रेस वर्किंग कमिटीमध्ये विरोध करण्याची कोणामध्येच हिंमत नसलेला) असा उमेदवार म्हणजे निर्विवादपणे, केवळ मातोश्री... दुसरा अजून कोण? कॉन्ग्रेसच्या चालीचा अंदाज लावण्यासाठी, दिवसागणिक कमी कमी बुद्धीची गरज पडत आहे. याचे मुख्य कारण, कॉन्ग्रेसच्या निर्णयप्रक्रियेत भाग घेणार्‍या लोकांची बुद्धी (अ) घराण्याची हांजीहांजी आणि (आ) व्यक्तिगत स्वार्थ, या दोनच गोष्टींवर केंद्रिभूत झालेली आहे, हेच वारंवार दिसत आहे... त्यांना पक्षाचीच पर्वा नाही, तर त्यांनी (लोकांचा विश्वास जिंकणारा सबळ विरोधी पक्ष बनूया असा विचार करून) देशाची पर्वा करणे दिवास्वप्न ठरेल. हे भारतासाठी कटू व दुर्दैवी आहे पण सत्य आहे ! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/11/2019 - 09:08 नवीन
गराडा घातलेल्या पत्रकारांसमोर राहुल गांधींनी मला तर काश्मिर प्रश्ना संबंधात बोलवण्यात आले होते हे सांगुन थांबले असते तर राहुल गांधी कसले त्यांनी काश्मिर मध्ये हिंसक घटनेच्या बातम्या असल्याची पाकीस्तान्यांना शोभेलशी संतापजनक भाषा वापरली. हे सुद्धा नेहमीचे झाले आहे. रागांनी एखाद्या मुद्द्यावर पाकिस्तानची तळी उचलली नाही तर ती "अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट" असेल. त्यांचे हे पाकिस्तानला सोईचे बोलणे/वागणे, राजकिय विरोधाच्या सीमा ओलांदून जाणारे आहे... त्याबद्दल काही प्रवाद आहेत, पण ते बोलायची ही वेळ व स्थळ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
माहितगार Sun, 08/11/2019 - 11:32 नवीन
आपण जे पाळता ते वेळ आणि स्थळाचे भान काल रागांनी पाळले नाही. बर काश्मीरच्या जनतेबद्दल एवढे भरते आले तर भारतभारात पूरग्रस्थांनी काय घोडे मारले की अध्यक्षपदाचे निवडणे चालू असताना नेमकी काश्मीरींच्या अडचणींची चर्चा काँग्रेस वर्कींग कमिटीला करता येते पण पूर ग्रस्थांची नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/11/2019 - 13:01 नवीन
कॉन्ग्रेसला सद्या पाकिस्तानची तळी उचलायचे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे... भारताची आणि भारतिय जनतेच्या भल्याबुर्‍याची काळजी त्यांना असण्याचे कारण नाही....असेच रागा आणि त्यांचे पाठीराखे वागत आहेत. केवळ सत्तेबाहेर गेले आहेत आणि जनता विचारत नाही म्हणून इतके अधःपतन ?! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
च
चौकटराजा Sun, 08/11/2019 - 05:40 नवीन
माझ्या पत्नीस फिकेपण ( अनिमिया) याचा त्रास २०११ पासून आहे. एकदा आमचे पथोलोजिस्ट मला म्हणाले " तुम्ही ही केस एखाद्या हेमेटोलोजिस्ट ला का दाखवीत नाही ? पत्नीने ते अमान्य केले . सुमारे १८००० रूपये होमिओपाथ कडे घालवले . परिणाम शून्य. मग एकदा तिच्या पाठीत दुखू लागले. तिला अर्थो कडे नेले . त्यानेच एक्स रे काढला . एक्स रे ओ के. त्याने ८ दिवसाची औषधे लिहून दिली. मग मला शन्का आली की किडनी स्टोन असावा. सोनोग्राफी केली ३ स्टोन आढलले. अर्थो कडे जाण्यात पैसा व वेळ बरबाद.अनिमियाचा सम्बन्ध, बी १२, वेन्ट्रीक्य्लर कार्य तसेच स्टोन यान्चे शी ( पर्यायाने क्रिआटीनीन ) शी असल्याने सम्बन्धित सर्व टेस्ट झाल्या. नुकत्याच घेतलेल्या पेन किलर मुळे किडनीला त्रास होत आहे असे नेफ्रोलोजिस्ट म्हणाले. ( फक्त ६ दिवस गोळ्या ). रक्ताची बाटली, इन्जेक्टेट लोहाची ३ एपिसोडस सर्व झाले. परिणाम शून्य. मी बोन म्यारो सप्रेशन ची शन्का व्यक्त केली तर डॉक माझ्यावर सन्तापले. ३० वर्शाचा अनुभव वगरे सान्गून झाले. आता पुन्हा हेमोटोलॉजिस्ट कडे जाणे आहे. सर्कल पूर्ण झाले. वरील केस बरोबर रक्तक्षय झालेल्या कोन्ग्रेसची आहे. त्याना आप्ल्या र्‍हासाचे कारणच सापडत नाही. आता डॉ सोनिया यान्चेकडे जाणे आहे !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा