Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डॉ. पायल तडवी एक दुखःद घटना

म
माहितगार
Wed, 05/29/2019 - 14:30
🗣 51 प्रतिसाद
डॉ. पायल तडवी या तरूण डॉक्टरच्या आत्महत्या (कि संशयास्पद मृत्यू ) चे दुखःद वृत्त माध्यमात चर्चिले जाते आहे. सर्वसाधारणपणे काही क्षेत्रे सोडली तर सर्वसाधारणपणे जातीवरून हिनत्व वागणूक दिल्या जाण्याचा किमान सार्वजनिक जीवनातून बर्‍यापैकी लोप होत आहे असे आपण गृहीत धरून चालतो. किमानपक्षी मुंबईसारख्या जुन्या मेट्रॉपॉलीटन शहरातून उच्च शिक्षीत वरीष्ठ डॉक्टरांबद्दल अशी साशंकता असलेले वृत्त आश्चर्याचा धक्का आणि खरेच तसे झाले असल्यास -प्रथम दर्शनी तरी वृत्ते तशीच येत आहेत- निश्चितच काळजी आणि चिंतेची गोष्ट म्हणावी लागेल. ज्या टोपीवाला महाविद्यालय (नायर रुग्णालय) येथे डॉ.पायल स्त्री वैद्यकशास्त्रातील पदव्यूत्तर शिक्षण घेत होत्या त्या वेबसाईटवर https://www.tnmcnair.com/ भेट दिली असता कदाचित वेबसाईट कदाचित अद्ययावत नसल्यामुळे असेल ज्या वरीष्ठ डॉक्टरांवर जातीय छळाचा आरोप केला जातोय त्यांची नावे प्राध्यापक यादीत दिसली नाहीत. मुंबईतील सदर महाविद्यालय जवळपास १०० वर्षे जुने आहे किमान वेबसाईटवर दिसत असलेल्या प्राध्यापकांची आडनावे मुंबईतील बहुसांस्कृतिकतेला साजेशी अनेक जाती धर्मातून दिसताहेत. अगदी ज्या युनिट हेडकडे प्राध्यापिकांबद्दल तक्रार केली गेली तिचे नाव Y.I. Ching Ling असे दिसते आहे - त्यांनी जाहीरपणे कोणते निवेदन केलेले माझ्या वाचनात तरी आलेले नाही . सहसा वरीष्ठ डॉक्टर्स नौकरीवर एवढेही अवलंबून नसावेत की अशा तक्रारींबाबत कुणाच्या छोट्या दबावाखाली येतील. एखाद्या एमबीबीएस पूर्ण केलेल्या स्त्रीला स्ट्रेस मॅनेजमेंट आणि मानसशास्त्राचे प्राथमिक ज्ञानही नसेल असे समजणे धाडसाचे वाटते ज्या प्राध्यापिकांबद्दल जातीयता विषयक तक्रार आहे त्यांच्या हाताखालून इतरही आरक्षीत जातीतील डॉक्टर शिकुन गेले असणार आहेत त्यांच्याकडेही या प्राध्यापिकांच्या वर्तनाच्य इतिहासाची सुयोग्य चौकशी करण्यास हरकत नसावी असे वाटते. सर्वात महत्वाचे आरक्षण असावे किंवा नसावे हा तात्विक वादाचा विषय प्रत्यक्षात काम करताना बाजूला ठेवला पाहीजे आणि पटो अथवा न पटो आरक्षण मिळालेल्या व्यक्तींना सुद्धा समान आणि आदराची वागणूक मिळाली पाहीजे. या घटनेची चौकशी होईल आणि सुयोग्य कारवाई केली जाईल आणि जातीय वीषमतेची वागणूक कुणाला सहन करावी लागणर नाही अशी अपेक्षा करूया. जाता जाता आनखी एक विषय महाविद्यालयाचे डयरेक्टर कि डिन पद मागचे डायरेक्टर कुणि डॉ.सुपे म्हणून निवृत्त झाल्या नंतर कायम स्वरूपी भरण्याबाबतची कार्यवाही मुंबई महापालिकेकडून सावकाशपणे चालली असावी असे एशियन एज च्या एका वृत्तातून दिसते. त्यात हॉस्पीटलच्या जाती आधारीत कर्मचारी युनियनचा जातीय राजकारणामुळे पद भरण्यात दिरंगाईचा आरोप दिसतो आहे. आणि निवडणूक आचारसंहितेचे कारण प्रशासनाकडून दिले जाताना दिसते आहे. प्रबोधनकार ठाकरे यांची पार्श्वभूमी असलेली शिवसेना वरीष्ठ पदासाठी कट्टर जातीय रंग ठेवेल अशी शक्यता कमी वाटते.. शिवसेना नेतृत्व आणि फडणवीस सरकार सुयोग्य पावले उचलतील अशी अपेक्षा करूया *** घटना क्रमाची नोंद घेण्याचा प्रयत्न २२ मे २०१९ ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी नंतरही दोन चार दिवस सर्वांचे लक्ष मुख्यत्वे निवडणूंकांच्या बातम्यां कडे असावे त्यामुळे घटना क्रम नीटसा ध्यानात घेण्यास अवघड जाते. माझेही बातमी कडे लक्ष उशीराच गेले. त्यामुळे घटनाक्रम समजून घेणे योग्य असेल असे वाटून मला बातम्यांमध्ये दिसलेला घटना क्रम काही त्रुटी दिसल्यास खाली प्रतिसादातून नोंदवणे * मयत डॉक्टर स्त्रीचे नाव पायल तडवी वयः २२ पती डॉ. सलमान तडवी * शिक्षण एमबीबीएस पूर्ण गायनॉकॉलॉजी पदव्यूत्तर शिक्षण वर्ष दुसरे चालू होते. नायर हॉस्पीटल जॉईनींग १ मे २०१८ *** संदर्भ आणि घटनाक्रम वृत्ते*** * मिड डे १ * मिड डे २ * https://www.asianage.com/metros/mumbai/170519/director-for-medical-education-post-lies-vacant.html https://indianexpress.com/article/india/mumbai-doctor-suicide-payal-tadvi-dalit-harassed-5753556/ *** चौकशी वृत्ते *** १) महिला आयोग आणि आदिवासींसाठी असलेले अयोग यात लक्ष घालू शकतील महिला आयोगाने रिपोर्ट मागवल्याची बातमी वाचली होती २) रॅगिंग विषयक संस्था स्तरीय प्रथम स्तरीय चौकशी होऊन द्वितीय स्तरीय चौकशी चालू असावी वृत्त https://www.hindustantimes.com/mumbai-news/nair-hospital-suicide-case-state-appointed-panel-to-conduct-second-round-of-probe/story-FC7f0nzYSF45Qt5cJoRaUP.html ३) पोलीसांकडून चालू असलेली चौकशी क्राईम ब्रँचकडे वर्ग केलेली वृत्त वाचनात आहे. ४) युनिट हेड डॉ. Y.I. Ching Ling यांच्या बाजू बद्दलचे इंडियन एक्सप्रेस वृत्त ५) विभाग प्रमुखांची स्टेटमेंट्स ***अनुषंगिक *** * नायर रुग्णालय गायनाकॉलॉजी विभाग प्राध्यापक नाव यादी कितपत अद्ययावत आहे कल्पना नाही. विभाग प्राध्यापक यादीत डॉ. यि चिंगलींग व्यतरीक्त बाकी आडनावे बहुधा मराठीच पण सर्व जातीय सरमिसळ दिसते आहे. *https://www.tnmcnair.com/home/about.html नायर रुग्णालय वेबसाईट * वैद्यकीय क्षेत्रातील जातीय वीषमता विषयक दावा करणारा ऑनलाईन वायर वरील लेख दुवा * In light of Dr Payal Tadvi’s case, Nair Hospital holds discussion on workplace harassment

प्रतिक्रिया द्या
31654 वाचन

💬 प्रतिसाद (51)
स
सुबोध खरे गुरुवार, 06/13/2024 - 06:13 नवीन
अंती सत्याचा जय होतो (जय होईपर्यँत सत्याचा अंत होऊ नये एवढीच अपेक्षा). न्यायालयात न्याय मिळतो हे अर्धसत्य आहे. १) न्यायालयात आपल्याला निकाल मिळतो, न्याय मिळतोच असे नाही २) न्यायालयात जे मिळते त्याला न्याय म्हणायचे असते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा