Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अमेरिकेत सारे कांही शक्य आहे ?

आ
आनंद घारे
Wed, 11/05/2008 - 18:17
🗣 30 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6607 वाचन

💬 प्रतिसाद (30)
व
विसोबा खेचर Wed, 11/05/2008 - 18:55 नवीन
आजपर्यंत सतत पाकिसानला आणि भारतात होणार्‍या पाकिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या भारतद्वेष्ट्या अमेरीकेचं आम्हाला काडीचंही कवतिक नाही..! तात्या.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 11/05/2008 - 19:34 नवीन
आजपर्यंत सतत पाकिसानला आणि भारतात होणार्‍या पाकिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या भारतद्वेष्ट्या अमेरीकेचं आम्हाला काडीचंही कवतिक नाही..! खतपाणी बाहेरून घातले जात नाही तर आतूनच घातले जाते. आपलच नाणं खोटं (नेतृत्व - सर्वपक्षीय!) म्हणून बाहेरच्यांचे चालते... भारतात काड्या करणारी मग ती कधी अमेरिका असोत तर कधी रशिया किंवा टाटाच्या जागेत सिंगूरला कॉमी बांधवांच्या पायघड्यांवरून येत असलेले चिनी... तरी देखील एक गोष्ट अनुभावने नक्कीच शिकलो आणि ते म्हणजे, हा देश आणि यातील शहाणे देशवासीय (सगळे शहाणे नाहीत) हे दुसर्‍यांच्या अनुभवाकडून शिकताना कमीपणा वाटून घेत नाहीत...दुसर्‍यांच्या ज्ञानाचा स्वतःसाठी उपयोग करून घेयला कमीपणा वाटून घेत नाहीत... त्याच्या जोरावर किंबहूना मोठेच झालेत! कौतूक वाटणारी माणसे आणि प्रसंग हे जगभर येत असतात आणि जातही असतात... ते पहाताना, अनुभवताना, त्या घडणार्‍या इतिहासात रहाताना, तेव्हढ्यापुरते कौतुक/appreciation करणे यातून आपणपण काही धडे घेऊ शकतो असे वाटते. त्यात त्या संदर्भात बाकी राष्ट्र, आंतर्राष्ट्रीय राजकारण वगैरे येण्याचा प्रश्न उद्भवू नये असे वाटते. (दूध का दूध और पानी का पानी) या संदर्भातून आज ओबामाचा विजय आणि त्याचे त्यानंतरचे केलेले संयमी भाषण नक्कीच चांगले आहे आणि म्हणून त्याच्याकडून बर्‍याच आशा आहेत. जे अमेरिकेत घडते त्याचे परीणाम आजच्या काळात तरी सार्‍या जगावर घडतात ही कितीही आवडली नाही तरी वस्तुस्थिती आहे. (हेच पहाना: SENSEX - 10,120.0, -511.11, -4.81%). उद्या जर त्याने क्लिंटनला काश्मिरसाठी मध्यस्थीला पाठवले तर त्याला जो विरोध करायचा आहे तो करायचाच... (पण आधी पाहूया तसे तो खरेच करेल का ते :-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ख
खुसपट Fri, 11/14/2008 - 19:15 नवीन
भारतातून अमेरीकेत गेलेल्या आणि स्वतःचे कर्तृत्व अनेक क्षेत्रात सिद्ध केलेल्या भारतियांचे कौतुक तरी वाटेल ना? अमेरीकेत बुद्धीवंतांना जे स्वातंत्र्य मिळाले त्यामुळेच ती ईतर देशांपेक्षा वेगळी ठरली. ही गोष्ट नाकारता येण्यासारखी नाही. मलाही अमेरीकन लोकांचे कौतुक नाही. (१००% भारतीय ) खुसपट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
आ
आनंद घारे Wed, 11/05/2008 - 19:26 नवीन
या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पाकिस्तानाबद्दल वाईट मत असलेले पण मेहदी हसन आणि गुलाम अली वगैरे कलाकारांचे असंख्य चाहते भारतात आहेत. त्याचप्रमाणे आपल्या लतादीदींचे चाहते पाकिस्तानातसुद्धा आहेत. 'भारतद्वेष'' हा कांही अमेरिकेतील सर्व जनतेचा स्थायी भाव नाही, तो त्याच्या सरकारच्या परराष्ट्रधोरणाचा भाग होता. उद्या कदाचित तो बदलेल किंवा वाढेलसुद्धा. अमेरिकन सरकारच्या भूतकाळातल्या धोरणासाठी बरॅक ओबामा यांना जबाबदार धरता येणार नाही . त्यांच्यात कांही चांगले गुण दिसले तर त्याला चांगले म्हंटल्याने कांही बिघडत नाही असे मला वाटते. "अमेरिकेत सारे कांही शक्य आहे." असा बरॅक ओबामा यांचा विश्वास आहे आणि एका बाबतीत तो खरा ठरला एवढेच मला म्हणायचे आहे. यात अमेरिकेचे कौतुक करण्याचा हेतू नव्हता. हे स्पष्ट करण्यासाठी मी मथळ्यामध्ये एक प्रश्नचिन्ह (?) जोडले आहे.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 11/05/2008 - 19:44 नवीन
"अमेरिकेत सारे कांही शक्य आहे." असा बरॅक ओबामा यांचा विश्वास आहे आणि एका बाबतीत तो खरा ठरला एवढेच मला म्हणायचे आहे. यात अमेरिकेचे कौतुक करण्याचा हेतू नव्हता. हे स्पष्ट करण्यासाठी मी मथळ्यामध्ये एक प्रश्नचिन्ह (?) जोडले आहे. अमेरिकेत जे आज शक्य आहे असे वाटले ते भारतात आधीच झालेले आहे. जातीयभेद असून देखील घटना लिहायला आंबेडकरांना मानायला आणि त्यानंतर कायम "घटनेचे शिल्पकार" म्हणताना कुठे कुणाला काही चुकीचे/कमी वाटले नाही. तिथपासून, राजकीय पटलावर अनेक असे चमत्कार घडले - स्त्री पंतप्रधान, स्त्री राष्ट्रपती, अल्पसंख्य पंतप्रधान, अल्पसंख्य राष्ट्रपती (ते तर बरेच झालेत), दलीत राष्ट्रपती, अनेक अल्पसंख्य/स्त्री/दलीत आदी मुख्यमंत्री, मंत्री आणि वरीष्ठ. अब्दुल कलामांना एका भटजीकडून बर्‍याच बाबतीत शिक्षण मिळाले आणि अतिसामान्य व्यक्ती राष्ट्रपतीपदापर्यंत पोचली. अर्थात म्हणून ओबामाच्या घटनेचे महत्व आणि मुल्य कमी नाही आहे....पण जसे जगातील मोठ्या लोकशाही असलेल्या अमेरिकेत हे घडू शकते तसेच जगातील लोकसंख्येने सर्वात मोठ्या असलेल्या भारतात पण असे घडते इतकेच म्हणत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
भ
भास्कर केन्डे Wed, 11/05/2008 - 20:09 नवीन
श्री विकास यांच्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत. तात्या, कौतुक कराच असे कोणी म्हणत नाहीये. पण ज्या चांगल्या गोष्टी त्यांच्यात आहेत त्या आपण स्विकारायाला लाजायची काय गरज? आता हेच पहा ना. आपल्याकडे एक सरकार जाऊन दुसरे आले की पहिल्या सरकारमधले कधी जेलमध्ये जातील काही सांगता येत नाही. आठवा जयललिता-करुणानिधी आखाडा. कमीत कमी जे अगोदरच्यांनी केले ते नष्ट करने हे तर आपल्याकडे निवडणुका संपल्यावरचे ब्रिदवाक्य. जसे की सेना-भाजपाने सुरु केलेल्या झुनका भाकर केंद्राचे झाले. पडत्या काळात आम्ही आधार घेतला आहे दोन वेळच्या जेवनासाठी त्या केंद्रांमध्ये. तेथे भ्रष्टाचार होतो या सबबीखाली त्यानंतर आलेल्या काँग्रेसी सरकारने ती सगळी केंद्रे बंद केली. त्यातला भ्रष्टाचार कमी करुन गरिबांना अजून दिलासा का नाही दिला? असे हे सुडाचे राजकारण अमेरिकेत होताना दिसत नाही. ओबामा म्हणतो आहे की तो विरोधी पक्षाला सोबत घेऊन त्याचे सरकार बनवणार. ही चांगली बाब आपणही घेतली तर बिघडले कुठे? आपली लोकशाही तरी कुठे परिपक्व आहे... खूप आंतर काटायचे आहे आपल्याला सुद्धा. नव्हे का? आपला, (मन आणि डोळे बंद न केलेला) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
मराठी_माणूस गुरुवार, 11/06/2008 - 04:09 नवीन
'भारतद्वेष'' हा कांही अमेरिकेतील सर्व जनतेचा स्थायी भाव नाही, तो त्याच्या सरकारच्या परराष्ट्रधोरणाचा भाग होता. दुसर्‍या राष्ट्राचा द्वेष हा परराष्ट्रधोरणाचा भाग कसा काय असु शकतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
ख
खुसपट Fri, 11/14/2008 - 19:20 नवीन
राजकीय गुगली, खरा कल व कृती कळू नये म्हणून ! चायनामन टाकणारा खुसपट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
भ
भाग्यश्री Wed, 11/05/2008 - 19:33 नवीन
येस, त्यानी भाषण सहीच केलं. वक्तृत्व चांगलंच आहे.. पण हे अमेरीकेमधे जरा उशीरा शक्य झालंय.. हिलरी आणि ओबामा उभ राहीले तेव्हा , एक बाई आणि एक न-गोरा उभा राहील्याने अमेरिकेला(प्रगत राष्ट्राला) एकदमच फार बदलाला सामोरे जावे लागले. आपल्याकडे(प्रगतशील देश) किंवा इतरही राष्ट्रात कधीच स्त्री पंतप्रधान्/राष्ट्रपती व मायनॉरिटीमधला राष्ट्रपती आले आहेत.. त्यामुळे या विरोधाभासाची थोडी मजा वाटली. :) पण तरीही बरं वाटलं ओबामा आलेला पाहून.. बुशच्या नालायक धोरणांमुळे(होती का काही धोरणं?) एकंदरीतच फार नुकसान झालंय. ओबामा इराक युद्धाच्याही विरोधात आहे. निदान विचारांनी तो चांगला वाटतो. उद्या कृती काय करतो ते पाहायचे..
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 11/05/2008 - 20:00 नवीन
अमेरिकेत सारे कांही शक्य आहे -- चूक भारतात सारे कांही शक्य आहे. भारतात लालु, पास्वान, मायवती, शिबु सोरेन असे लायकी नसलेले लोक मंत्री आहेत. इथे अशा लोकांना झाडु मारायला पन ठेवनार नाहीत. भारतात सारे सरकारी कर्मचारी बाजारातल्या भाजीपाल्यासारखे भाव लावुन लाच मागतात. लाच देनारेही देतात. भ्रष्टाचार मला इथे इतका दिसला नाही. सरकारी कर्मचारी काम कर्म म्हनुन करतात भारतात ते उपकार म्हनुन करतात. बर्‍याच गोष्टी आहेत ज्या अमेरिकेकडुन शिकण्यासारख्या आहेत. आम्ही फक्त नको ते घेतो चांगले ते सोडतो. ओबामा निवडुन आल्यावर जरा बरं वाटलं. त्याचे काही प्लन चांगले आहेत. त्यामुळेच (अन बुश च्या युद्धधार्जिन्या नितीला कंटाळुन) लोकांनी अश्वेत प्रेसिडेंट ला मते दिली. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 11/05/2008 - 23:35 नवीन
ओबामा निवडुन आल्यावर जरा बरं वाटलं. त्याचे काही प्लन चांगले आहेत. आरं पन त्ये प्लान पार पाडन्यासाटी त्यो इन्कमटॅक्स वाहाढवनार हाये, त्येचं काय? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
स
सुक्या गुरुवार, 11/06/2008 - 00:42 नवीन
त्याचे काही प्लॅन (जमलं की लिवायला) इन्कमटॅक्स वाढवनारे आहेत, काही आउटसोर्सिंग कमी करनारे आहेत. आउटसोर्सिंग वर चालनार्‍या भारतीय कंपण्यांसाठी ही चांगली गोष्ट नाही परंतु इथे टॅक्स मधे जानारा सारा (कमीत कमी ८०%) तर कामांसाठी वापरला जातो. आनी टॅक्स असतो ८ ते १० टक्के. भारतातही आम्ही देतच होतो ना टॅक्स. तो ही घसघशीत ३३ टक्के. सगळाच जातो गटारात. एक तर माजलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना अन पोट सुटलेल्या नेते लोकांच्या खिशात. बुश ने केलेली घाण साफ करायला वेळ लागेलच. बजेट एकदा सरप्लस मधे आलं की आपोआपच टॅक्स कमी करतील. ईथल्या चांगल्या इकानामी चा भारताला पन फायदा होइलच हो. हथली इकानामी बोंबलली तर सारीच इकानामी बोंबलती बगा. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 11/06/2008 - 04:26 नवीन
परंतु इथे टॅक्स मधे जानारा सारा (कमीत कमी ८०%) तर कामांसाठी वापरला जातो. सहमत!!! आनी टॅक्स असतो ८ ते १० टक्के. काय राव कुठच्या गावात रहाता? आमी पण रहायला येतो की तुमच्या गावात!!!!:) मजं म्हन्नं आसं की ह्यो आदीच टॅक्स वाडावनार!! आनी त्यात आत्ताच्या इकोनोमीची कंडिशन लक्षात घेतली तर त्याचे प्लान तरी राबवनार न्हाई किंवा डेफिसिट वाडवनार!! खरं का नाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
ए
एकलव्य गुरुवार, 11/06/2008 - 04:43 नवीन
परंतु इथे टॅक्स मधे जानारा सारा (कमीत कमी ८०%) तर कामांसाठी वापरला जातो. काय म्हणता? डेफिसिटस् पहा, युद्धावरचा आणि वॉलस्ट्रीटवरचा खर्च पहा. ८०% कसले धरून बसला आहात ८००%ची नासाडी झालेली दिसेल. (अतिश्योक्ति अलंकार आहे... भावार्थ समजून घ्या, शब्दशः पकडू नका!) आनी टॅक्स असतो ८ ते १० टक्के. > काय राव कुठच्या गावात रहाता? आमी पण रहायला येतो की तुमच्या गावात!!!! आम्हीपण येतो पहिल्या गाडीने. अमेरिकेत काहीही होऊ शकते हे मात्र खरे! लालू, सोरेन फिके पडतील असा बुश होऊन गेला ना राव? पलिनकडे बघा भ्रष्ट्राचार येथे नसतो असे म्हणण्याचे धाडस होणार नाही. चेनी पाहला तर भलेभले भ्रष्ट्रासुर अगदी भुरटे चोर वाटतील. - बराक एकलव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सुक्या गुरुवार, 11/06/2008 - 08:31 नवीन
आनी टॅक्स असतो ८ ते १० टक्के. वाइच गडबड झाली. . बगा . आताच कापला गेल्याला टॅक्स अन टॅक्स परतावा धरुन बगितलं तर टॅक्स १४ टक्केच्या आसपास आला. व्यवस्थीत चेक करावे लागेल. बाकी चुकीच्या माहीतीबद्दल क्षमस्व!! सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
ख
खुसपट Fri, 11/14/2008 - 19:34 नवीन
अमेरीका अस्तित्वात नव्हती , २५० वर्षांपूर्वी , तोपर्यंत आपली अर्थव्यवस्था संपन्नच होती. ती मोगल, तुर्की बादशहांनी , आणि नंतर ब्रिटीशांनी यथेच्छ लुटली. अमेरीकन तेल कम्पन्यांनी लुटली. आर्थिक ईतिहासाचा अभ्यासक ( खुसपट )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
ए
एकलव्य Sat, 11/15/2008 - 03:55 नवीन
अहो अभ्यासक - मोगल, तुर्की बाहेरून आले पण भारतातच राहिले... इंग्रज हे पहिले राज्यकर्ते होते की ज्यांनी मुळापासून खणले आणि जहाजांवर घालून सातासमुद्रापलिकडे नेले. (ईकॉनॉमिस्ट) एकलव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खुसपट
च
चतुरंग Wed, 11/05/2008 - 20:45 नवीन
सर्वात तरुण आणि पहिला आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान बराक ओबामा मिळवतो आहे. ४७ वर्षाचा हा तरणाबांड माणूस अस्खलित वकृत्त्व करतो. कालच्या विजयानंतर त्याने दिलेले विजय भाषण (व्हिक्टरी स्पीच) हे खरोखरच अतिशय स्फूर्तिदायक आहे. मी अमेरिकन नागरिक नसूनही त्याचे ते भाषण ऐकताना माझ्या अंगावर काहीवेळा काटा आला तर अमेरिकन नागरिकांना ते किती आपलेसे वाटले असेल ह्याची कल्पना आपण करु शकतो! अमेरिकेचे परराष्ट्र धोरण, त्यांची पाकिस्तान-भारत प्रश्नातली भूमिका ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक परिपक्व राजकीय नेता कसा असावा/कसा असू शकतो ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून ओबामाच्या प्रतिमेकडे बघता येऊ शकेल इतके ते भाषण प्रभावी होते. येणार्‍या कालखंडात भारताला सहाय्यभूत किंवा भारतद्वेष्टी भूमिका तो घेईल हे पहावे लागले. अमेरिका हा काही सर्वस्वी आदर्श देश आहे असे अजिबात नाही पण त्यांच्या ज्या गुणांमुळे आज ते जगावर राज्य करु शकताहेत त्यांचा योग्य तो अभ्यास करण्यात कमीपणा वाटायचे काही कारण आहे असे मला वाटत नाही. बाहेरच्या महासत्ता काय कुरापती करतात, काड्या घालतात ह्याच बरोबर किंबहुना ह्याहीपेक्षा, आपल्या राजकीय नेतृत्वाकडे नसलेली प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती, एकमताचा अभाव आणि एक देश म्हणून आपली प्रतिमा ठासून दुसर्‍यासमोर न मांडता येणे ह्या कमकुवत दुव्यांचाही आपल्या प्रश्नांची व्याप्ती वाढवण्यात मोठा सहभाग आहे असे मला वाटते. पक्षीय राजकारण, अंतर्गत हेवेदावे आणि संकुचित राजकीय स्वार्थ ह्या तीनही गोष्टींनी आपले राजकारण पंगु झाले आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 11/05/2008 - 21:25 नवीन
त्यांचे विजय भाषण स्फुर्तीदायक होते. फक्त मला ते एकाचे आभार मानायचे विसरले असे वाटले...ज्याच्यामुळे केवळ राष्ट्राध्यक्ष पदच नाही तर सिनेट आणि हाउस दोन्हीत डेमोक्रॅटीक बहुमत आले... कोणाचे लक्षात आले का? - अर्थात आपल्या लाडक्या जॉर्ज बुशचे! त्याने जर इतका गोंधळ घातला नसता आणि रिपब्लिकन नेतृत्वाने त्याच्या पुढे नांग टाकली नसती तर इतका मोठा विजय अशक्य वाटतो :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Wed, 11/05/2008 - 21:28 नवीन
खाजगी भेटीत मानणार असेल, तसेही बुशने त्याला आवतण धाडले आहे लवकरच भेटूया म्हणून! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Wed, 11/05/2008 - 21:36 नवीन
जाणारा राष्ट्राध्यक्ष येणार्‍या राष्ट्राध्यक्षासाठी २० जानेवारीला (सत्तांतराच्या दिवशी) ओव्हल ऑफिसमधील राष्ट्राध्यक्षाचा मेजाच्या ड्रॉवर मधे एक बंद लिफाफा ठेवतो, ज्यात त्याचे अनुभवाचे बोल आणि चार हिताच्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यात बुश काय लिहील याची उत्सुकता आहे! अर्थात ते कधीच बाहेर येत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
र
रामदास गुरुवार, 11/06/2008 - 03:36 नवीन
याचे उपाय दिले होते पहीला पेचप्रसंग-अरबांना दोष द्या दुसरा पेचप्रसंग-मंदीला दोष द्या. तीसरा पेचप्रसंग-निवडणूकीची तयारी करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास गुरुवार, 11/06/2008 - 04:06 नवीन
गुड वन! लक्षात ठेवायला चांगला आहे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/06/2008 - 15:15 नवीन
पहीला पेचप्रसंग-अरबांना दोष द्या दुसरा पेचप्रसंग-मंदीला दोष द्या. तीसरा पेचप्रसंग-निवडणूकीची तयारी करा. आवडले !!! लेख, त्यावरील प्रतिसादही वाचनीय आहेत. -दिलीप बिरुटे (वाचक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
विकास गुरुवार, 11/06/2008 - 15:21 नवीन
पहीला पेचप्रसंग-अरबांना दोष द्या दुसरा पेचप्रसंग-मंदीला दोष द्या. तीसरा पेचप्रसंग-निवडणूकीची तयारी करा. आणि या सगळ्याच पेचप्रसंगासंदर्भात अर्थातच मला (म्हणजे बुशला) दोष द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
ल
लिखाळ गुरुवार, 11/06/2008 - 18:51 नवीन
हा हा.. हे मस्त ! ओबामांचे विजयी भाषण ऐकतोच आता घरी गेल्यावर.. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
अ
अवलिया गुरुवार, 11/06/2008 - 15:29 नवीन
अमेरिका खुप चांगली आहे. तिथे जे काही होते ते दुसरीकडे होत नाही. वगैरे वगैरे अगदी सहमत आहे. अमेरिकन माणूस स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी तसेच दुस-याच्या हक्काविषयी किती सजग आहे हे सगळे जाणतात. मानवतेवर त्यांची असलेली श्रद्धा वगैरे सगळे फार छान आहे. पण ... हा पण फार महत्वाचा आहे. अमेरिकेचा (युएस ) भुभाग एकदा सोडला ना, मग अमेरिकन माणसांसारखी रानटी, हलकट, युद्धखोर अन हपापलेली मनुष्यजमात कुठेच नाही. त्यामुळे आम्हाला ना अमेरीकेचे कौतुक ना अमेरिकनांबद्दल आपुलकी. येणा-या काळात आजवर केलेल्या पापांची भरपाई ते करतीलच. कारण हिशोब हा होतच असतो. कधी लवकर कधी उशीरा. (भारतीय) नाना
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 11/15/2008 - 05:38 नवीन
नाना, मला तुमच्या घरातल्या देवावरची फुलं उचलून सांगा.... तुम्हाला आम्ही आणि श्रीकृष्ण सामंतसाहेब, आम्ही खरंच रानटी, हलकट, युद्धखोर आणि हपापलेले वाटतो का हो? दुखावलेला, तरीही आपलाच, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sun, 11/16/2008 - 09:55 नवीन
श्री.पिवळा डांबिस काका, नानाचा आपल्याला साष्टांग दंडवत. आपण मला आज्ञा केलीत की , नाना, मला तुमच्या घरातल्या देवावरची फुलं उचलून सांगा.... तुम्हाला आम्ही आणि श्रीकृष्ण सामंतसाहेब, आम्ही खरंच रानटी, हलकट, युद्धखोर आणि हपापलेले वाटतो का हो? तर हा घ्या माझा कबुली जवाब..... घरातल्या देवावरची फुले उचलुन जेजुरीच्या खंडेरायाचा भंडारा भाळी लावुन तुळजापुरच्या आई भवानीच्या पायावर टेकवलेली कवड्याची माळ गळ्यात घालुन माहुरच्या रेणुकादेवीच्या पाया पडुन अष्टविनायकाला मनोमन स्मरुन नासिकच्या रामकुंडातील तीर्थ प्राशन करुन त्र्यंबकराजा व घृष्णेश्वरावर बेल वाहुन गाणगापुराच्या दत्तपादुकांना स्पर्श करुन भस्म कपाळी लावुन नेवाश्याच्या खांबाला पाठ लावुन पंढरीच्या माउलीच्या पायाला मिठी घालुन जगतातील यच्चयावत तीर्थक्षेत्रांचे पावित्र्याला स्मरुन रायगडाच्या राजाच्या पायाचे वंदन करुन माझ्या बुद्धीने स्विकारलेल्या व मनाने मानलेल्या अद्वैतवादाला न विसरता मी हे तुम्हाला सांगतो की , माझ्या वरती दिलेल्या प्रतिसादात एकाही काना मात्रेचा फरक होवु शकत नाही, कारण मी केलेले विधान पुर्णपणे सत्यावर व अभ्यासावर आधारीतच होते. आता तुमच्याबद्दलच बोलायचे तर मी एवढेच सांगतो की, बिभीषण रावणाचा भाउ असला तरी त्यामुळे रावणाने, त्याच्या सैन्याने व प्रजेने आर्यावर्तावर केलेल्या अत्याचाराचे दुष्टत्व तसेच त्याची दाहकता कमी होत नाही. असो. आपलाच, नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
आ
आनंद घारे Fri, 11/07/2008 - 03:07 नवीन
भारतीय आणि अमेरिकन अशी वर्गवारी करून त्यातल्या कोणत्याही एकाला सरसकट चांगले आणि दुसर्‍याला वाईट म्हणणे बरोबर नाही. हे जग असे कृष्ण धवल बनलेले नाही. आदर्श पुरुषोत्तम राम जसा आपला पूर्वज होता त्याचप्रमाणे दुराचारी रावणसुद्धा आपलाच पूर्वज होता हे आपण नाकारू शकत नाही. आजसुद्धा आपल्याला स्वार्थी , दुर्गुणी तसेच निस्वार्थी , सद्गुणी अशा दोन्ही प्रकारची माणसे सगळीकडे भेटतात. एवढेच नव्हे तर एकाच माणसाचा वेगवेगळा अनुभव येतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा