Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तोल

अ — अन्या बुद्धे, Fri, 05/31/2019 - 19:00
विहिरीच्या बाहेर असतो आपण.. आजूबाजूचा परिसर.. उत्तुंग पर्वत, विशाल सागर, वारे, फुलं, गवत, नद्या.. अगदी वाळवंट अन बर्फाळ प्रदेशही.. या साऱ्याचा विस्तीर्ण पसारा.. त्या तुलनेत असलेलं विहिरीचं छोटेपण.. नन्तर त्याकडे पाठ फिरवत.. सामाजिकता दूर ठेवत कपडे उतरवून पाण्यात उतरतो विहीर अगदी उराऊरी भेटते.. सर्व बाजूंनी मिठीत घेते.. आपलेच किरटे पातळ आवाज वजनदार घुमारेदार असे होऊन ऐकू येतात.. स्वत्वाची जाणीव हरवते.. शरीराच वजन हरपते.. पिसासारखे हलके होतो आपण.. विहिरीचं सानपण आणि प्रेमळ आपलेपण.. दोन्ही एकाचवेळी खरं असतं.. खोटी असते आपली एकांगी मानसिकता.. वेळोवेळी बाहेरच्या जगातही फिरलं पाहिजे.. पुनः पुन्हा विहिरीत स्वतःला हरवलं पाहिजे.. तोल सावरायलाच हवा.. नव्हे का? -अनुप

प्रतिक्रिया द्या
1624 वाचन

💬 प्रतिसाद (2)
र
राघव Wed, 11/20/2019 - 02:56 नवीन
कूपमंडूक ऐकले होते. पण ज्याला बाहेरच्या जगाची ओळख आहे आणि विहिरीची नाही अशा कुणाची कल्पना केली नव्हती. :-)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 11/20/2019 - 04:01 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा