Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अज्ञाताच्या काठावर

अ — अनन्त्_यात्री, Tue, 06/11/2019 - 07:41
अज्ञाताच्या काठावर शब्द होताना धूसर अर्थ निरर्थाचे द्वैत कल्लोळून झाले शांत अदृष्टाच्या नजरेला दिठी भिडविण्या आलो अज्ञेयाच्या अनुल्लंघ्य उंबर्‍याशी थबकलो अथांगाच्या डोहावर अनाहताचे तरंग नश्वराच्या ओठावर चिरंतनाचे अभंग

प्रतिक्रिया द्या
3423 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ख
खिलजि Tue, 06/11/2019 - 08:15 नवीन
सुंदर, नितांत सुंदर कडवं झालेलं आहे "" अथांगाच्या डोहावर अनाहताचे तरंग नश्वराच्या ओठावर चिरंतनाचे अभंग "" सारेच नश्वर इथे ईश्वर शोधू पाहे अस्तिकाला द्वैताचे वेड नास्तिक ते मोडू पाहे
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Tue, 06/11/2019 - 08:50 नवीन
मस्त मस्त मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
न
नंदू Tue, 06/11/2019 - 13:23 नवीन
नितांत सुंदर कविता!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 06/11/2019 - 13:26 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Tue, 06/11/2019 - 13:57 नवीन
या कवीच्या कविता उत्तम आहेत. हा कवी शब्दांशी खूप खेळतो. गरजेचे स्कील. तरीही... (तीन डॉट्स बद्दल जाहीर माफी) या कवितांना अनुभवाचा स्पर्श जाणवत नाही. अशी बौद्धिक कविता वाचणार्‍याच्या मनात खोलवर रुजत नाही कारण - १. त्यातलं बुद्धिगम्य आणि चमत्कृति संपली की शब्दांच्या करामतीचा सांगाडा दिसू लागतो. २. त्यातलं अगम्याला अनुभवाचा पदरच नसतो त्यामुळे ती 'या हृदयीचे त्या हृदयी' होत नाही. अशा कवितेला चंप्र देशपांडे विचार कविता म्हणायचे. तुमची कविता- भावकवितेच्या आणि विचारकवितेच्या मध्येच कुठेतरी रेंगाळत राहते. शब्दनिवडीचं सामर्थ्य इथवरच तुमची कविता मर्यादित राहते.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 06/15/2019 - 15:34 नवीन
देणार्‍या सर्व कविता रसिकांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 06/19/2019 - 08:29 नवीन
सुरेख, आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा