Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज मी पुन्हा नापास झालो

ख — खिलजि, Tue, 06/18/2019 - 13:17
आज मी पुन्हा नापास झालो पुढल्या वेळेस नक्की पास होईन हीच अशा मनी बाळगून पुन्हा जोमात तयारीला लागलो मम्मी पप्पा दोघेही घरी चिंतातुर असतील मला वाईट वाटू नये म्हणून हळूच रडत असतील मी ठरवलंय मनाशी घट्ट हार मानायची नाही देत जायचं असेच पेपरवर पेपर जोपर्यंत नीट कळत नाही कधीतरी उगवेल सूर्य माझाही कधीतरी असें मीही कुणाचा तरी बाप पण सालं माझं पोर माझ्यावाणीच निघालं तर होईल नको तो ताप कितीही झालं तरी मी माझी विकेट फेकणार नाही बापाने एवढा पैसा लावलाय माझ्यावर फुक्कट घालवणार नाही माहित आहे , मुद्दल वाढत चाललीय पण एक दिवस , व्याजासकट देईन परतावा त्याआधी मला या परीक्षेत पास तरी कर,, देवा {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}} पेपरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाचून जीव घाबराघुबरा होतो . सालं हि कोवळी पोर अशी माना टाकायला लागली तर आईबापच काय होत असेल ते विचारच करायला नको .. त्यांनी अपयशाकडे दुर्लक्ष करावं हि नम्र विनंती ..

प्रतिक्रिया द्या
5115 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
पद्मावति Tue, 06/18/2019 - 13:27 नवीन
आवडली कविता आणि तळटीप टाकण्यामागचं कारणही पटलं .
पेपरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाचून जीव घाबराघुबरा होतो . सालं हि कोवळी पोर अशी माना टाकायला लागली तर आईबापच काय होत असेल ते विचारच करायला नको ..
खरंय :(
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 06/18/2019 - 13:34 नवीन
पद्मावती तै.. आमच्या इथे एक प्रकरण घडलंय असं .. पण थोडं वेगळं. त्याच्या आईने आत्महत्या केली , मुलगा सारखा नापास होतो म्हणून .. फार वाईट वाटलं .. कधी कधी हा शेजारधर्म, मित्रपरिवार आणि समाज नकोस वाटतो , तो याच कारणासाठी .. काही लोकांना चौकश्या करायचं वेड असत , पण समोरचा त्या कश्या घेईल हे माहित नसत .. त्यामुळे हे अशे प्रकार घडतात .
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 06/18/2019 - 13:37 नवीन
बापरे...फारच दु:खद आहे हे :(
काही लोकांना चौकश्या करायचं वेड असत , पण समोरचा त्या कश्या घेईल हे माहित नसत .. त्यामुळे हे अशे प्रकार घडतात .
खरे आहे.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 06/18/2019 - 13:38 नवीन
:( :( :( :(
  • Log in or register to post comments
च
चावटमेला Tue, 06/18/2019 - 16:09 नवीन
कवितेचा आशय आवडला..
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Tue, 06/18/2019 - 16:12 नवीन
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा