निखारा मिसळ| तंदूर मिसळ |झणझणीत कट /सँपल by Namrata's CookBook
Primary tabs
लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
2 कप मटकी
2 मोठे चिरलेला कांदा
12-15 कढीपत्ता
20-25 लसूण
अदरक
2 चमचे मिसळ मसाला (सुहाना)
1/2 चमचे हळद पावडर
1 चमचा लाल तिखट
1 चमचा काळ तिखट
जिरे
मोहरी
2 बारीक चिरलेला कांदा
कोथिंबीर
फरसाण
तेल
लिंबाचा रस
गूळ
क्रमवार पाककृती:
१. मटकी संपूर्ण रात्री ७ ते ८ तासात भिजवून घ्या
२. एका कॉटन च्या कपड्यामध्ये मटकी मोड येण्यासाठी 5 ते 6 तास बांधून ठेवा
३. आता मटकी एका भांड्यामध्ये घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी , हळद , चवीनुसार मीठ घालून मिक्स करुन घ्या
४. मध्यम गॅसवर शिजवून घ्या (4 शिट्ट्या ) .(मटकी जास्त शिजवू नका )
- आता मिसळ कट / तर्री तयार करुन घेऊ
५. गॅसवर पॅन गरम करावे त्यामध्ये तेल घालावे
६. तेल गरम होत आले की त्यात जिरे,, मोहोरी घाला नंतर लसूण ,आल, कढीपत्ता मंद आचेवर 3 मिनिटे परतून द्यावे
७. चिरलेला कांदा घाला आणि नंतर ते रंग बदलेपर्यंत परतून घ्यावे
८. आता गॅस बंद करा आणि लसूण ,आलं , कढीपत्ता ,कांदा मिश्रण थंड करा
९. मिक्सर मध्ये एकदम बारीक करुन घ्या (पाणी वापरू नका)
१०. आता एक पॅन घ्या,४ ते ५ मोठे चमचे तेल घ्या (त्याला जास्त तेल घ्यावे )
११. तेल गरम झाल्यावर मिक्सर मधले मिश्रण घाला
१२. मिश्रण (१० ते १२ मिनिटांपेक्षा जास्त)शिजवून घ्यावे .मध्ये मध्ये परतावे
१३. आता हळद, लाल तिखट, काळ तिखट, मिसळ मसाला घालून 5 मिनीटे परतावे (मध्ये मध्ये परतावे)
१४. आता पाणी आणि चवीनुसार मीठ घालावे
आणि ते १० ते १५ मिनिटे मस्त उकळून घ्यावे
१५. १५ मिनिटांनंतर लिंबाचा रस घाला आणि गॅस बंद करा (तुम्हाला आवडत असेलतर तुम्ही गूळ/साखर घालू शकता)
१६. मिसळ सँपल / कट / तर्री तयार आहे
१७. आता कोळसा गॅसवर गरम करायला ठेवू , त्या दरम्यान प्लेटिंग सुरू करु
१८. आता मातीचे भांडे घ्या, प्रथम फरसाण घाला, नंतर मटकी , बारीक चिरलेली कांदा, कोथिंबीरआणि फरसाण घाला.
कोळसा गरम झाल्यावर तो स्टील वाटीत / लहान मातीच्या पणतीमध्ये घ्या . आत कोळसा ठेवून त्यात 2 चमचे तेल घालावे.
झाकण बंद करा
१९. 2 मिनिटांत झाकण काढा . कोळसा बाहेर काढून त्यामध्ये मिसळ सँपल / कट / तर्री घाला आणि निखारा / तंदूर मिसळ तयार आहे
.
**नमस्कार नम्रताज् कूकबुक हे माझ नवीन चॅनेल आहे युटूब वर .
https://www.youtube.com/channel/UCjsh6KtuWdhxlOjL5nqH6HQ
Namrata's CookBook या चॅनेलला सबस्क्राईब करा हि विनंती . बेल आयकॉन दाबा म्हणजे जेव्हा मी रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुम्हला नोटिफीकेशन येईल .
रेसिपी आवडलीतर नक्की लाइक करा,शेअर करा . जर काही प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा.
अधिक टिपा:
मटकी शिजवताना जास्त पाणी वापरु नये
रेसिपीचा पूर्ण विडिओ : https://youtu.be/EdGJ3gl36LY
धन्यवाद
मस्तं पाककृती आणि व्हिडीओ पण आवडला.
धन्यवाद
पण रेडिमेड मसाला वापरण्यावर अडखळलो, मुख्य चव देणारे जिन्नसच जर रेडिमेड असेल तर रेसिपीला ओरिजिनल कसे मानावे, तसे तर हॉटेलवाले पण पुदीबंद मसालाच वापरतात, तुमच्या किचन मधून मसाला पण ओरिजिनल आला तर मजा येईल अजून.
आगाऊ सल्ला आहे पण जाणवलं ते बोलतोय, बाकी रेसिपी उत्तमच, जमलं तर एखाद फोटो पण एम्बेड कराल दिसायला उत्तम होतो धागा.
धन्यवाद
(आंतोन इगो) वांडो
मी नक्की प्रयत्न करेन मसाले सुद्धा घरगुती करुन दाखवण्याचा
फोटो कसा टकाव?
धन्यवाद
पाक कृती, व्हिडिओ चांगले आहेत मात्र मिसळपाव ह्या संस्थळाचा फक्त आपल्या च्यानल ची जाहिरात करण्याकरता वापर करू नका, ही मिपाकर म्हणून मनापासून विनंती. इथले लेख वाचा, प्रतिसाद द्या. तुम्हाला जसे प्रतिसाद, लाईक्स पाहून आनंद होईल, तसाच इतर लेखकांना त्यांच्या लिखाणावर आलेले प्रतिसाद पाहून होईल, तेव्हा मिपाचं जाहिरात स्थळ बनणार नाही, ह्याची काळजी तुम्हीही आता मिपाकर झालेला आहात, म्हणून नक्की घ्या. धन्यवाद!
मी मिसळपाव वर येऊन १ महिना झाला आहे .हो नक्कीच जाहिरातीसाठी नाही वापर करणार .
धन्यवाद