Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Mon, 06/24/2019 - 07:38
जेष्ठ कविवर्य "अवधुत दादांना " विनम्र अभिवादन, आणि आमचे पेरणा स्थान श्री श्री श्री चामुंडराय यांना सादर प्रणाम, त्यांच्या काव्यप्रतिभेमुळेच आम्ही हे काव्यपुशप प्रसवू शकलो. टिप :- क्रूपया अक्षरास हसू नये मिपा हे दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे, विझलेल्या धाग्याला, डु आयडी ने फोडणी, प्रतिसादास्तव आसूसलेले, टुकार लेख अन चर्चा, मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे, लेखांच्या या बाजारातून प्रतिसांदांची दाटी, आणि म्हणावे दर्जा ठरवी शतकाच्या या गाठी, रोजच यावे, धागे चाळावे, धरुन आशा खोटी, जावे मिटूनी आशाळ भुतापरी, पुन्हा उघडण्यासाठी, मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे अर्थपूर्ण त्या, प्रतिसादाची दिवा स्वप्ने पहाताना, कुणीतरी यावे हळूच धाग्यावर, ध्यानी मनी नसताना, नकळत आपण फसून जावे, निरागस प्रष्णांना, अन मग डोळे उघडून जावे, आयडी ब्लॉक होताना, मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे भुतकाळाचा करीत उल्लेख, गोंधळ घातला त्यांनी, आणि पेटवला उगाच धागा, खोट्या अस्मितांनी, भविष्यात इथे न लिहिण्याचा, निर्णय अनेकांनी केला, गालावरती हाणत चापट्या, स्वतःच्याच हातांनी, मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
9882 वाचन

💬 प्रतिसाद (13)
न
नाखु Mon, 06/24/2019 - 07:57 नवीन
आणि बाराच्या भावात!!! जबराट आहे अखिल मिपा आशययुक्त शिवार आणि मनोरंजक फळबाग लागवड वाचक समितीचा जाहीर पाठींबा. भूतकाळाचे व्याज आयुष्यभर पुरत नाही,नव्या मुद्दलाची तजवीज करावीच लागते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 06/24/2019 - 08:28 नवीन
समर्पक वाक्य "भूतकाळाचे व्याज आयुष्भर पुरत नाही," पूर्वी मिपा वर दर्जेदार लेखन होते आणि प्रतिसाद सुद्धा दर्जेदार असायचे हे किती दिवस आठवणार . नवीन लोक लिहीत आहेत प्रतिसाद देत आहेत . चुकत असतील,दर्जा कमी असेल पण काय सांगावं ह्या मधूनच उद्या दर्जेदार लेखक तयार होतील .
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Mon, 06/24/2019 - 08:59 नवीन
१० वर्षे इतके मिपा वय असलेले अकुकाका मुद्दामहून भाषेची आयमाय करतात त्याला काय म्हणणार आपण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
ज
जॉनविक्क Mon, 06/24/2019 - 10:05 नवीन
जुनं ते सोनं असतंच असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/24/2019 - 08:44 नवीन
मस्तं ! मिपा हे, मिपाकरांचे, मिपाकरांनी, मिपाकरांसाठी, मुक्त लिखाण व संवादाचे साधन असल्याने, ते सर्व मिपाकरांचे एकत्रित प्रतिबिंब आहे. आता हेच पहाना, इतक्या चांगल्या विडंबनासारखे लिखाण असलेल्या मिपाबद्दल, "मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे", असे कसे म्हणता येईल ?! :) उत्तम गुलाबाच्या फुलात एखादी कीड दिसली, तर तिला झटकून टाकावे, आणि फुलाच्या सौंदर्य-सुगंधाचा आस्वाद घेत रहावे. ;) :)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 06/24/2019 - 15:32 नवीन
एखाद्या रसिल्या धाग्यात सुद्धा एखादा ट्रोलिंग करताना दिसतो म्हणू मिपा सोडायचं व्हय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
टर्मीनेटर Mon, 06/24/2019 - 15:45 नवीन
४५००० गद्य/काव्य पुष्पांच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मिपावरचे हे ४४७२४ वे पुष्प आवडले!
  • Log in or register to post comments
व
वकील साहेब Tue, 06/25/2019 - 10:57 नवीन
नेमके भाव ते मनीचे पकडले.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 06/25/2019 - 11:14 नवीन
दर्जेदार लेखन माझ्या मते जे सध्य परिस्थितीचे योग्य वर्णन करते .
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Tue, 06/25/2019 - 21:12 नवीन
भावना पोचली.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Tue, 06/25/2019 - 22:45 नवीन
जे वाचता क्षणी त्यासाठी घालवत असलेल्या वेळेचे सार्थक झाल्याचा भाव आपोआप निर्माण करते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 06/26/2019 - 00:18 नवीन
पैजार ज्ञानोबांच्या शोधात?
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 06/29/2019 - 12:54 नवीन
जबराव जबराव जबराव आवडेश भारी आवडेश
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा