रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य ?
रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य? किती कार्यक्षम?
एखाद्या ठिकाणचे पर्जन्यमान/ पाऊस मिलिमिटर्स अथवा सेंटिमिटर्स यांमध्ये मोजतात. रोजचा पाऊस किती झाला हे मिलिमिटर्समध्ये सांगणे सोयीचे असले तरी एखाद्या भागातला वर्षभरांत एकूण पाऊस किती हे सेंटिमिटर्स मापात सांगितल्यास तुलना करणे सोपे जाते.
उदाहरणार्थ -
ठिकाण - पाऊस - माप
जैसलमेर - २० सेंटिमिटर्स
पुणे - ४० सेंटिमिटर्स
बंगळुरू - ८० सेंटिमिटर्स
चेन्नई - १०० सेंटिमिटर्स
कोलकाता - १५० सेंटिमिटर्स
तिरुवनंथपुरम १६० सेंटिमिटर्स
मुंबई - २०० सेंटिमिटर्स
गोवा - २०० सेंटिमिटर्स
कोची - ३५० सेंटिमिटर्स
((महाबळेश्वर - ८०० सेंटिमिटर्स
मेघालय - १२०० सेंटिमिटर्स))
एक सेंमि पाऊस म्हणजे १२.५ मिलिलिटरस पाणी १२.५ चौ सेंमि (square cms area) क्षेत्रफळावर जमा होते.
एका प्लॉटवर एक छोटे घर
एक फुट बाइ एक फुट जागेवर साधारण नउशेतीस मिलिलिटर्स पाणी गोळा होईल.
घरची गच्ची ५०० चौ फुट असेल तर एक सेंमि पावसाने ४५० लिटर्स पाणी मिळेल. वर्षभराच्या ४० सेंमि पाऊस होणाऱ्या पावसाचे सर्व पाणी गोळा केल्यास १८००० लिटर्स पाणी मिळेल.
वापर
एका कुटुंबात चार जण धरून रोजचा पाण्याचा खप ५०० लिटर्स धरुया. हे १८००० लिटर्स पाणी त्या कुटुंबास ३६ दिवस पुरेल. म्हणजे वर्षभराच्या वापराच्या दहा टक्के पाणी रेन हार्वेस्टिंगने मिळाले. हे एक मध्यम पावसाच्या ठिकाणाचे उदाहरण झाले. जिथे यापेक्षाही कमी पाऊस पडतो तिथेच खरी गरज आहे. पण तेवढा पाऊस पडत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे रोजचा वापर २५० लिटर्सही केला जाईल तर तर दोन महिने पुरेल.
साठवण
८ फुट बाइ ८ फुट लांब रुंद आणि ६ फुट खोल टाकी बांधल्यास त्यात ९ ते १० हजार लिटर्स पाणी साठवता येईल. अशा दोन टाक्या लागतील.
प्लॉट जमिनीचा आकार
७५ फुट बाइ ६० फुट प्लॉटमध्ये १०/१०/१०/१५ फुट जागा सोडून २५ बाइ २०फुटी घर (५०० चौ फुट) ही एक आदर्श स्थिती झाली. त्यात कडेला या दोन टाक्या व एक संडासची टाकी बांधावी लागेल.
मोठ्या इमारती , हौझिंग सोसायटीतील गरज
तळ मजला अधिक त्यावर तीन मजले आहेत असे धरल्यास गच्चीवरच्या प्रत्येक पाचशे चौ फुट भागातील गोळा झालेले पाणी खालच्या चार रहिवाशांत वाटायचे आहे. वरच्या उदाहरणातील पाणी अर्थातच एका ब्लॉकला आठ दिवस पुरेल. अधिक मजले असतील तर आणखी वाटप कमी होईल. बाकी त्या टाक्या बांधणार कुठे हा एक प्रश्नच ठरतो. टाक्या बांधण्याचा खर्चही आहेच. केवळ टाक्या बांधणे, पाऊसपाणी साठवणे बंधनकारक केले म्हणून नागरीक ते करतीलच.
गावागावांत जी पाणी अडवा जिरवा/ साठवा मोहिम अमलात आणत आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे कारण ते सर्वच उघड्या जमिनीवरचे पावसाचे पाणी गोळा करून साठवतात. तसे सोसायटीच्या/इमारतीच्या आवारातील गोळा केले जाईल असे नाही वाटत.
तुमचे अंदाज आणि सूचना मांडा.
भूजलावर आपल्या सर्वांचा अधिकार आहेच पण त्याचे संवर्धन करणे देखील प्रत्येकाचे कर्तव्य आहे.+१००० माझ्या सोसायटीने जमिनीत जिरवलेले पाणी फक्त माझ्याच सोसायटीला मिळाले पाहिजे. तसे होत नाही म्हणून जमिनीत पाण्याचे पुनर्भरण करण्यात अर्थ नाही, असे म्हणणे योग्य नाही. जेव्हा एखाद्या विभागातील सर्वजण आपापल्या सोसायटीत असे उपक्रम करत असतात, तेव्हा त्या सर्व विभागातील भूजलाची पातळी वर येते आणी सर्वांनाच त्याचा फायदा होतो. त्यात विचाराची सीमा केवळ, "माझा फायदा काय", इथपर्यंतच मर्यादीत करू नये. भूजलस्तर वाढविण्यासारख्या सगळ्या उपक्रम-प्रकल्पांकडे, "सार्वजनिक फायदा (कॉमन गुड)", असेच पाहिले पाहिजे आणि "एकमेका करू सहाय्य" अशी भावना मनात धरून कारवाई केली पाहिजे. ****** जरा पुढे जाऊन असे म्हणता येईल की, जरी केवळ स्वार्थी विचार करायचा झाला तर... विभागातल्या सगळ्या / बहुसंख्य सोसायट्यांनी स्वार्थी विचार करून भूजलसंवर्धन प्रकल्प करण्याचे टाळले तर, त्या विभागातल्या भूजलाचा स्तर खूप खाली जाऊन पाण्याची चणचण/अभाव निर्माण होऊन... अ) त्या विभागातील सगळ्यांनाच त्रासदायक परिस्थिती निर्माण होईल आणि आ) त्या विभागातील सगळ्याच सोसायट्यांतील सदनिकांची किंमत कमी होईल. इतर काही नाही तरी, केवळ वरचा स्वार्थी विचार करून तरी प्रत्येकाने हा उपक्रम करायला हवा, नाही का? :)आमच्या सोसायटीत एक विहीर आहे. त्याचे पाणी फिल्टर करून पिण्यासाठी योग्य होईल या क्षमतेचे आहे. आमच्या गच्चीत पडलेले पाणी आम्ही या विहिरीत सोडत आलो आहोत. हे पाणी आम्ही बाथरूम संडास मध्ये फ्लश साठी वापरतो. एका घरातील चार माणसे दिवसात पाच वेळेस लघवी आणि एकदा शौचास जातात हे गृहीत धरले तर रोज साधारण एका घरात ४५० लिटर पाणी नुसतेच वाया जाते. सोसायटीत ५६ फ्लॅट आहेत तेंव्हा रोजचे २५००० लिटर पाणी नुसतेच सांडपाणी म्हणून वापरले जात असे.+१०० महानगर पालिकेने शुद्धीकरण केलेले 'तुलनेने किमती पाणी' वाचवण्याचा हा पर्याय जास्त व्यवहार्य, कमी खर्चाचा, प्रकल्प म्हणून सोपा आणि आरोग्याच्या दृष्टीने पूर्ण निर्धोक आहे.