Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बिल देऊन आलो..

ग — गवि, Mon, 07/01/2019 - 07:08
सांगावयास गेलो, ऐकून काय आलो? सुनावलेस तू, मी बिल देऊन आलो.. सैराट पावसाने पुरता.. भिजून आलो. त्या गोठल्या दुपारी बिल देऊन आलो.. हात होता तुझा अन कानशील माझे लोकां उमजण्याआधी बिल देऊन आलो. चालते होणे त्वरे सोपे गेले तुला वेटराने हटकले, मी बिल देऊन आलो. डोळे भरून आले.. पावसाच्या भरवशावर ना रोखले तयांना, अन बिल देऊन आलो.

प्रतिक्रिया द्या
24613 वाचन

💬 प्रतिसाद (32)
ट
टर्मीनेटर Mon, 07/01/2019 - 07:36 नवीन
चार दिवसांत चार कवींना विडंबन करण्यास प्रवृत्त करणारी प्रेरणा जबरदस्तच म्हणायला पाहिजे :) मजा आली वाचायला.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 07/01/2019 - 07:41 नवीन
भावना सखोल पोचल्या, अर्थात या नंतर निराश न होता तुम्ही नव्या दमाने कामाला लागला असाल याची खात्री आहेच. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 07/01/2019 - 07:42 नवीन
बिले भरायची तर काम केलेच पाहिजे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
न
नाखु Mon, 07/01/2019 - 09:02 नवीन
तो बिल पचास ही म्हण त्यावरुनच अस्तित्वात आली आहे. विडंबन झकास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/01/2019 - 09:13 नवीन
आवडले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 07/01/2019 - 09:15 नवीन
देता का मग बिल? कुठे फाडूया बिल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रशांत Mon, 07/01/2019 - 09:24 नवीन
+१ + गविशेठ असेच लिहत रहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/01/2019 - 09:24 नवीन
पावसाळा कट्टा करू आमच्या औरंगाबादला या तुम्ही तुमचे मित्र घेऊन.बील देण्यात येईल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रचेतस Mon, 07/01/2019 - 10:22 नवीन
गविंच्या मित्रांमध्ये आमचा समावेश असला तर आम्हीही येउ. (वेरूळला जाउ).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गवि Mon, 07/01/2019 - 10:25 नवीन
उगीच माझ्या नावावर बिल फाडू नको. त्यांना डायरेक विचार फ्रेंडशिप देतात का ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 07/01/2019 - 10:54 नवीन
ओळखलंत का सर मला मिपावर आला कोणी द्याल का हो फ्रेंडशिप मला लावून तूप लोणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
य
यशोधरा Mon, 07/01/2019 - 10:59 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/01/2019 - 09:51 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 07/01/2019 - 10:18 नवीन
आता खुदकन हसू आलं नाही
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Mon, 07/01/2019 - 14:15 नवीन
+ १ बाडिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
य
यशोधरा Mon, 07/01/2019 - 11:43 नवीन
तुम्ही, ज्ञापै, नाखु, गड्डा झब्बू सगळ्यांनी प्राचीतैला रॉयल्टी द्यायला हवीये खरतर! वर्षभराचा तिच्या आवडीच्या कॉफीचा पुरवठा करा तिला! =))
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 07/01/2019 - 11:47 नवीन
नको. कॉफीत ट्यानिन नावाचं विष असतं. -गवि मास्तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Mon, 07/01/2019 - 11:53 नवीन
असूदे. त्या डोळ्यांतून टिपं गाळता, भांबावल्या दुपारी पितील कॉफी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
य
यशोधरा Mon, 07/01/2019 - 11:54 नवीन
टिपं ना गाळता हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
न
नाखु Mon, 07/01/2019 - 18:57 नवीन
कुठले कुठले आजार उद्भवतात याची यादी शोधायला घेतली आहे. तरीही आपल्या जबाबदारीवर कॉफी घेणे कॉपीराइट बाहेरचा वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
प्राची अश्विनी Wed, 07/03/2019 - 07:30 नवीन
अर्रर्रर्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
च
चंद्र.शेखर Mon, 07/01/2019 - 12:22 नवीन
ओरिजिनल पेक्षा जास्त वास्तववादी वाटलं.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Mon, 07/01/2019 - 12:44 नवीन
+1
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 07/01/2019 - 13:44 नवीन
बिल व टिपही दिलीच असणार
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 07/01/2019 - 18:56 नवीन
दासता-ए-दिलसे दर्दभरी है ...दासता-ए-बिल =))
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 07/03/2019 - 07:31 नवीन
बिल शेट झालात की हो.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 07/03/2019 - 09:45 नवीन
लय भारी गवि षेठ तुम्ही कवितेच्या प्रांतात पण चौकर षटकार हाणता
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 07/03/2019 - 12:59 नवीन
आवडली गेलेली आहे ,, भारी..... दुसरी एक भयानक सुचत आहे ...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/03/2019 - 14:01 नवीन
लेखनावर किती प्रतिसाद आले ते बघायला आलो होतो, किती अवांतर. आमच्या वेळी असं नव्हतं. अशा अवांतर प्रतिसादामुळे लेखकाला खुप त्रास होतो. रात्री अपरात्री आपल्या लेखनावर कोणी छान छान म्हटलंय, कौतुक केलंय हे बघायला यावं आणि अवांतरमुळे लेखकाचा लिहिण्याचा मूड जातो. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 07/03/2019 - 14:04 नवीन
आमच्या वेळी असं नव्हतं.
म्हणजे साठ सत्तर वर्षांपूर्वी ना? कसं होतं तेव्हा, ? सांगा ना सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
य
यशोधरा Wed, 07/03/2019 - 14:16 नवीन
म्हणजे सर सत्तर वर्षांचे आहेत तर. आय सी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/03/2019 - 17:31 नवीन
जन्मल्यापासून मिपा वाचत असल्यास सत्तर वर्षांचे, नाहीतर अधिक काही (?दहा-पंधरा) वर्षे वाढवावी लागतील. यु सी. ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा