Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी : जूलै २०१९

ध
धर्मराजमुटके
Wed, 07/03/2019 - 18:05
🗣 86 प्रतिसाद
१. भारतात शाकाहारी भोजनालये आपल्या नावामागे / पुढे वेगवेगळ्या पदव्या लावतात. उदा. प्युअर व्हेज / शुद्ध शाकाहारी / वैष्णव रसोई इ. इ. जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे ही पदवी हाय क्लास / हाय क्वालिटी व्हेज अशी बदलत जाते. एका ठिकाणी तर चक्क प्युअर व्हेज आणि नॉनव्हेज अशीही पाटी बघीतल्याचे आढळते. अशाच एका हाय क्वालिटी भोजनालयाची अखेर होणार काय ? बातमी : अर्श से फर्श तक: भारत के 'डोसा किंग' के पतन की कहानी २. अमेरीकेतील संभाव्य मंदीच्या बात म्यांनंतर सोने हा परत गुंतवणू कीचा फायदेशीर पर्याय बनणार का ?
वर्गीकरण
प्रकटन माहिती चौकशी समाज जीवनमान

प्रतिक्रिया द्या
41779 वाचन

💬 प्रतिसाद (86)
भ
भंकस बाबा Wed, 07/31/2019 - 16:32 नवीन
आठवडाबाजारला गेला तरी गांवभर होतं, इथे या कानाचा त्या कानाला पत्त्या लागत न्हाइ! वर ईचारल तर साळसुदावाणी आव आणतात. अरे बोला ना गुलाबी गल्लीत, पारिजात चाळीत, चौथ्या माळ्याच्या मैनेबरोबर गप्पा हाणायला गेलो होतो. हाय हिम्मत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Fri, 08/02/2019 - 02:36 नवीन
तो कुठं का जाईना, तो पंतप्रधान थोडीच आहे? आपले प्रिय मोदीजीसुद्धा पंतप्रधान नसताना कुठं गेले/जातील त्याच्याशी देणंघेणं नाही. आपला पंतप्रधान काय करतो ते महत्त्वाचं. असो. भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवरून सातव्या नंबरवर आलीय. कोणाकोणाचा विकास होतोय इथे पाहू आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Sat, 08/03/2019 - 18:55 नवीन
कितव्या नंबरवरुन कितीवर आली होती ते सांगितले असते तर बरे झाले असते. रच्याकने केदारनाथला , जंगलात फिरायला जाण्याला पाप म्हणतात काय तुमच्याकडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Sat, 08/03/2019 - 21:42 नवीन
१९९० मध्ये पहिल्या दहातही नसणारी अर्थव्यवस्था २०१५ पर्यंत सातव्या नंबरवर आली. इतका मोमेन्टम होता आणि तो नुसता राखला असता तरी वाढत राहिली असती. मुळात नुसता अर्थव्यवस्थेचा आकार पाहून काही उपयोग नाही हेच भक्तांच्या डोक्यात शिरत नाही. आता तर आकारही कमी करून दाखवला प्रिय मोदीजींनी. =)) तिकडे चीनवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी अमेरिकन उद्योग इतर देशांतल्या संधी शोधत आहेत आणि त्याचा फायदा व्हिएतनाम, तैवान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया उचलत आहेत. आपल्याकडे मात्र प्रत्येक सेक्टरमध्ये नोकर्‍या जायची वेळ आलीय. आणि हो,खांद्यावर संपूर्ण देशाची जबाबदारी असताना डोंगरात व जंगलात फिरून पब्लिसिटी स्टंट करण्याला आमच्याकडे पापच म्हणतात. कदाचित आपल्या कार्यसंस्कृतीत नसतील म्हणत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Sun, 08/04/2019 - 04:45 नवीन
दोन पावले मागे आली तर टिका, पुढे आली तर आळीमिळी गुपचिळी! अमेरिकन कंपन्या इतर देशात संधी शोधत असल्या तरी त्या काही जाचक अटीदेखिल टाकतात. गेल्या पाच वर्षात नमोनी कोणतीही सुट्टी न घेता काम केलेले आहे. शिवाय त्यांनी आता केलेले पर्यटन( तुमच्या मते पब्लिसिटी स्टंट) देशाला फायदा मिळवून देत आहेत. राजमाता अमेरिकेला जाऊन उपचार करून घेतात तेव्हा ते मेडिकल टूरिजम असेल नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
स
सुनील Sun, 08/04/2019 - 05:43 नवीन
गेल्या पाच वर्षात नमोनी कोणतीही सुट्टी न घेता काम केलेले आहे
भारतीय पंतप्रधानाला अधिकृतपणे सुटी घेता येत नाही. सबब, आजवरचा प्रत्येक पंतप्रधान हा सुटी न घेताच काम करीत आलेला आहे! (खात्री नसल्यास गुगलून पहावे. भरपूर माहिती उपलब्ध आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Sun, 08/04/2019 - 06:05 नवीन
जेव्हा हार्ट सर्जरीसाठी इस्पितळात भरती होते तेव्हा बेडवरुन सरकार चालवत होते नाही? अरे चुकले तेव्हा तर मैडम आणि रागाच सरकार चालवायचे! मनमोहन तर फक्त सहीसाठी होते. अगदी राफेल प्रकरणात ओलांदशी चर्चा रागाने केली होती. संसदेत बोलला हो तो! नंतर फ्रांसने खंडन केले या बातमीचे! पण जाउदे, आता आपले ठरलयं ना कि फक्त आणि फक्त मोदींची बदनामी करायची? मग बाकी पंतप्रधानाचा उल्लेख फाउल मानण्यात यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Sun, 08/04/2019 - 06:14 नवीन
भारतीय पंतप्रधानाला अधिकृतपणे सुटी घेता येत नाही
जमल्यास माझ्या या विधानाचा प्रतिवाद करा. आणि मी मोदींची बदनामी कुठल्या विधानाने केली आहे, ते दाखवून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
न
नगरीनिरंजन Sun, 08/04/2019 - 06:13 नवीन
पहिली गोष्ट म्हणजे मी काही कोणाचा व्यक्तिगत विरोधी नाही; त्यामुळे त्यांच्या फेल्युअरमुळे मला आनंद होतो असे काही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारवर टीका करणे प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे म्हणून मी करतो त्यात इतर काही हितसंबंध नाही किंवा तुमच्यासारखं भविष्यात काही मिळेल अशी आशा नाही. मुळात अर्थव्यवस्थेच्या आकारावरून केलेल्या रँकिंगला फारसा अर्थ नाही; पण इथे काही विद्वान सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उड्या मारत होते म्हणून हे लिहीणे भाग होते. मनमोहन सिंगांच्या काळातही अर्थव्यवस्था वाढत असतनाही त्यावर जॉबलेस ग्रोथ असल्याची टीका झालीच होती. इथे तर असलेल्या नोकर्‍या व उद्योग धोक्यात आहेत, सरकारला पैसा मिळवणे अवघड झाले आहे तरी टीका करायची नाही म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
स
सुबोध खरे Mon, 08/05/2019 - 06:40 नवीन
सरकारवर टीका करणे प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे फक्त ती पूर्वग्रहदूषित नसावी एवढीच अपेक्षा बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/05/2019 - 06:44 नवीन
फक्त ती पूर्वग्रहदूषित नसावी एवढीच अपेक्षा असं कसं, असं कसं. पूर्वग्रहदूषित टीका करणे हा जन्मसिद्ध हक्क आहे असे काहीजण समजतात (फक्त, उघडपणे, ते त्याला विचारस्वातंत्र्य म्हणतात, इतकेच) ! ...आणि स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीला वेसण घालून आणि मानभावीपणे जे असे करू शकतात त्यांना विचारवंत, मानवी अधिकारांचे रखवाले, बुद्धीवादी, इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
नगरीनिरंजन Wed, 08/07/2019 - 04:46 नवीन
असा त्रास होणारच. =)) मग दुसर्‍याची नजर पूर्वग्रहदूषित आहे असं जोरजोरात म्हणायचं ही सोपी परंपरागत युक्ती. चालू द्या. कोंबडं झाकून ठेवलं म्हणून तांबडं फुटायचं राहात नाही. आणि हो, “सदसद्विवेकबुद्धी” असं लिहितात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नगरीनिरंजन Wed, 08/07/2019 - 04:35 नवीन
=)) कंपन्यांच्या विक्रीचे आकडे जाहीर करताहेत तरी पूर्वग्रहदूषित म्हणायचे. सरकारतर आहेच डिनायलमध्ये पण आपल्यासारखे विद्वान नागरिकही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 08/07/2019 - 05:48 नवीन
ब्वॉर्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
उ
उपेक्षित Wed, 08/07/2019 - 16:11 नवीन
@ नगरीरंजन साहेब, लक्ष्य नका देऊ कारण हि डॉक्टर ची जोडगोळी जरा कोणी काही सरकार विरोधात लिहिलेलं बघितलं कि वसकन अंगावर येती. त्यांच्या अजूनही डोक्यात येत नाही कि मोदीला विरोध म्हणजे कोन्ग्रेस समर्थन नसते. त्यांचे चालुदे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
स
सुबोध खरे Wed, 08/07/2019 - 16:40 नवीन
खांद्यावर संपूर्ण देशाची जबाबदारी असताना डोंगरात व जंगलात फिरून पब्लिसिटी स्टंट करण्याला आमच्याकडे पापच म्हणतात. पब्लिसिटी स्टंट ? यालाच माझ्या मर्यादित आकलनामध्ये पूर्वग्रह म्हणतात. बाकी वसकन अंगावर येती हे वाचून करमणूक झाली. अजून येऊ द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
न
नगरीनिरंजन गुरुवार, 08/08/2019 - 01:44 नवीन
आपले आकलन खरंच मर्यादित आहे; कारण गुहेत जाऊन बसल्याने (कॅमेरामन घेऊन) किंवा जंगलात गेल्याने देशाचा नक्की काय फायदा झाला ह्याची कोणतीही माहिती सरकारने प्रसिद्ध केलेली नाही. किंबहुना आजवर पब्लिसिटीवर हजारो कोटी खर्च केलेत ह्याची माहिती मात्र उपलब्ध आहे. अशी माहिती पाहून मत बनवावे इतपत आकलन नसल्यास त्याला मर्यादित म्हणणे हेसुद्धा औदार्य म्हणावे लागेल. इत्यलम्.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 08/08/2019 - 06:43 नवीन
गुहेत जाऊन बसल्याने https://www.india.com/news/india/after-pms-visit-to-kedarnath-over-7-lakh-people-visited-the-shine-within-45-days-report-3697895/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 08/07/2019 - 18:51 नवीन
कोणी एक किंवा तुमची जोडी किंवा इतर कोणती जोडी, कोणते काम, करते आहे, हे स्वतःहून जाणण्याइतपत मिपाकर हुशार आहेत. मुद्दा सोडून (किंवा मुद्दा नसल्याने), असे बेजार झाल्यागत, बिनबुडाचे सरसकट दावे करण्याने, स्वतःचेच पितळ उघडे पडते ! तेव्हा, इतरांच्या डोक्यावर टीप्पणी करण्यापेक्षा स्वतःच्या डोक्याकडे, विचारांकडे आणि लिखाणाकडे लक्ष देणे, (कठीण आहे पण) जास्त चांगले होईल. तेव्हा, त्रस्त समंधा शांत हो... वगैरे, वगैरे ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
उ
उपेक्षित Fri, 08/09/2019 - 13:36 नवीन
अरे वाह जोडगोळी ला बाण वर्मी बसला बहुतेक :) असो एकच सांगणे आहे (मनापासून) वैचारिक वाद आहेत सो त्या मर्यादे पर्यंत ताणू माझ्याकडून अथवा तुमच्या (जोडगोळीकडून) कडून भान ठेवू. असो बाकी तुम्ही (जोडगोळी) चांगलेच सुज्ञ आहात सो तुमचे (जोडगोळीचे) चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/09/2019 - 15:18 नवीन
वैचारिक वाद-प्रतिवाद करायला मुद्दे मांडायचे असतात आणि त्यांना सबळ पुरावे व तर्काचा पाया द्यायचा असतो. उगाच उद्धट आणि भडकाऊ विधाने करण्याला वाद-विवाद म्हणत नाहीत, तर मुद्दे संपल्यामुळे किंवा बाजू उलटल्यामुळे निर्माण झालेली चिडचिड आहे, हे मिपाकर जाणतात, हे विसरू नये. =)) =)) =)) अन्यथा, चालू द्या करमणूक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
उ
उपेक्षित Fri, 08/09/2019 - 16:20 नवीन
हायला आम्ही करू ती वैचारिक चर्चा आणि बाकीचे करणार तो उद्धटपणा?, चांगलय कि राव आणि माझी चीड चीड ? :) :) किती ते गैरसमज करून घेता म्हात्रे सर ? बाकी ते उद्धटपणाविषय तुमच्या जोडीदाराला ४ उपदेशाचे डोस पाजले तर बरे. कसे ? ;) असो चालू दे तुमची (जोडगोळीची) वैचारिक चर्चा आंम्ही काय करमणूक करणारे हाय काय आय काय ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/09/2019 - 18:42 नवीन
तुमचे वरचे प्रतिसाद, विशेषतः डोक्याचा उल्लेख असल्यापासूनच्या पुढचे प्रतिसाद, परत वाचा आणि त्यांच्यामध्ये कोणत मुद्दे आहेत हे शोधून पहा. मग, हे विनोद तसेच पुढे चालू ठेवण्याने, तुमच्याच विश्वासार्हतेला तुम्हीच धोका निर्माण करत आहात, हे ध्यानात येईल (कदाचित्). असो. यापुढे मी प्रतिसाद दिला नाही तर तुमचे मुद्दे सिद्ध झाले असा समज करून घेउ नये. केवळ, झोपलेल्याला जागे करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची इच्छा नाही म्हणून तसे केले असे खात्रीने समजावे. राम राम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
उ
उपेक्षित Sat, 08/10/2019 - 15:22 नवीन
हल्ली हल्ली तुमच्या जोडगोळीचे अहंकारयुक्त प्रतिसाद पाहून आश्चर्य नाही वाटले. असो तुमच्या वयाचा आणि ज्ञानाचा आदर आहेच आणि राहिलच बाकी इत्यलम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रसाद_१९८२ Tue, 07/30/2019 - 09:49 नवीन
बाकी, प्रधानसेवकांनी त्या बेअर ग्रील्स बरोबर संभाषण हिंदीत केले की इंग्रजीत ! :)) -- निवडणुका जवळ आल्यावर, अश्या तर्‍हेची नौटंकी करायची जुनीच सवय प्रधान सेवकांना आहे. तेंव्हा उद्या ते सलमान खानच्या बिग बॉसमधे दिसले तरी आश्चर्य वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Tue, 07/30/2019 - 10:48 नवीन
आत्ता कोणती निवडणूक आहे?? बहुतेक तुमच्या गावाची ग्रामपंचायत निवडणूक असेल आणि त्यावर प्रभाव पाडण्यासाठी मोदींनी या शो मध्ये भाग घेतला असेल.. हो ना??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
त
तेजस आठवले Tue, 07/30/2019 - 13:11 नवीन
पब्लिसिटी स्टंट, माझ्या मते. बाकी चालू द्या. आम्ही पण आमच्या वेळी जंगलात दौरे आणि शिकार कित्येक वेळा केली पण ते जाहीर केले नाही अरे सिंह बघायला जंगलात कशाला जाता, आमच्याकडे तर नाक्यानाक्यावर आमचे ढाणे वाघ असतात आरेसेसने आता डिस्कव्हरी नेटवर्कपण ताब्यात घेतले आहे. सिंहाने गोमांस खायचे का नाही हे आता मोदी/संघ ठरवणार का ममा, मलापण शिंव्ह बगायला जायाचंय...त्याच्या पोटातल्या पिशवीत सिम्बा असतो ना...
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 07/30/2019 - 15:36 नवीन
अखेर तीन तलाक गुन्हा ठरविण्याचा कायदा पास झाला. वेगवेगळ्या चॅनेल्सवरील चर्चेत एकंदरीतच मुस्लीम स्कॉलर्स ला जबरदस्त मिरची लागलेली दिसत आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/31/2019 - 07:04 नवीन
वंशपरंपरागत चाललेली दुकाने बंद व्हायची भिती माणसाला विचित्र आणि आक्रमक बनवते... मग ती दुकाने धर्माची असो की राजकारणाची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
क
कंजूस Wed, 07/31/2019 - 11:27 नवीन
गोवा रोड बांधकाम ठेकेदारांची वंशपरंपरागत तिसरी पिढीही बांधत राहील. --
  • Log in or register to post comments
र
रविकिरण फडके Wed, 07/31/2019 - 18:38 नवीन
@कंजूस "गोवा रोड बांधकाम ठेकेदारांची वंशपरंपरागत तिसरी पिढीही बांधत राहील" नितीन गडकरी झिंदाबाद! केव्हढं मोठं काम करून राहिले ना! शिवाय नंतर टोल नाके बसवून त्यांचीही पिढीजात कमाईची सोय करून ठेवली जाईल!
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 08/10/2019 - 09:58 नवीन
असुदे की, कितीही झाले तरी पुर्वीचा गोवा रोड हा म्रुत्युचा सापळा होता. गडकरी आल्यानंतर युध्दपातळीवर काम चालू आहे. हा रस्ता म्हणजे काही मुंबै पुणे रोड नव्हे. दर्‍याखोर्‍यातुन जाणारा रस्ता आहे. आवाकाही मोठा आहे. खांग्रेस सरकारच्या वेळी काहीच झाले नाही. पण गडकरी हा रस्ता करतीलच असा विश्वास आहे. चांगली सुविधा हवी असेल तर टोल द्यावा लागेलच आणि कोकणवासीय तो आनंदाने देतील...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके
क
कंजूस Sat, 08/03/2019 - 16:54 नवीन
हा नाही होत आणि कोस्टल रोडचं भूत मानगुटीवर. कोकण रेल्वेने गोवा प्रवासी केव्हाच पळवलेत. कारवार, त्रिवेंद्रमला जाणारे वरच्या एनएचफोरनेच जातात.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 08/04/2019 - 04:49 नवीन
लष्कर वाढवल्यावर फुटिरतावादी व कोंग्रेसच्या पोटात दुखू लागले आहे. गमतीची गोष्ट ही आहे की जेव्हा 370 वा काश्मीरबद्दल सरकार शांत होते तेव्हा हेच निर्लज्जपणे विचारत होते की क्या हुवा तेरा वादा! वर्षानुवर्ष चाललेले दुकान बंद होण्याची वेळ आली बहुतेक?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 08/04/2019 - 04:50 नवीन
लष्कर वाढवल्यावर फुटिरतावादी व कोंग्रेसच्या पोटात दुखू लागले आहे. गमतीची गोष्ट ही आहे की जेव्हा 370 वा काश्मीरबद्दल सरकार शांत होते तेव्हा हेच निर्लज्जपणे विचारत होते की क्या हुवा तेरा वादा! वर्षानुवर्ष चाललेले दुकान बंद होण्याची वेळ आली बहुतेक?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 08/10/2019 - 10:04 नवीन
धागा ज्या विषयाने चालू केला आहे त्याबद्दल थोडेसे. "शाकाहारी" या शब्दाच्या बर्‍याच आव्रुत्या आल्या असल्या तरी सर्वांचे अर्थ खालीलप्रमाणेच. प्युअर व्हेज = शकाहारी शुद्ध शाकाहारी = शाकाहारी वैष्णव रसोई इ. इ. = शाकाहारी हाय क्लास = शाकाहारी हाय क्वालिटी व्हेज = शाकाहारी प्युअर नॉनव्हेज = असं काही नसतं
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा