Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पृथ्वी उवाच

श — श्रेयासन्जय, गुरुवार, 07/04/2019 - 06:36
पृथ्वी उवाच.... तलखी ने कासावीस हा जीव, दाह घेई सर्वांगाचा ठाव, उदरात घुसमटे बीजांचा जीव, निलाकाशीच्या देवा घे तूच आता धाव. आक्रमू दे आकाश हे जलदांनी, येऊ दे रे आभाळ हे भरूनी, लखलखत्या विद्युल्लतानी, रणसंगर होऊ दे ह्या गगनी. घननीळ बरसता बेधुंद, मेदिनीस कस्तुरी सुगंध, जीवनामृत शोषितील ही रंध्र, भारून टाकेल पावसाचा संतृप्त गंध डोळ्यात आणोनि प्राण, विनविती माझे पंचप्राण, मेघराजा तुजला माझी आण, दे ह्या वसुधेला सृजनाचे वाण. © श्रेया राजवाडे, जुन 2019

प्रतिक्रिया द्या
4639 वाचन

💬 प्रतिसाद (9)
श
श्वेता२४ गुरुवार, 07/04/2019 - 07:48 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 07/04/2019 - 08:41 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 07/04/2019 - 08:54 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 07/04/2019 - 14:54 नवीन
अर्थवाही पुलेशु
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 07/04/2019 - 20:45 नवीन
पृथ्वी शॉ उगाच काहीतरी बोलतोय पण ये तो कविताच निकली. ;) असो, चांगला प्रयत्न. पुलेशु! Sandy
  • Log in or register to post comments
इ
इरामयी Sun, 07/07/2019 - 08:58 नवीन
छान आहे. तलखी - खासच!
  • Log in or register to post comments
अ
अधाशी Tue, 07/09/2019 - 15:18 नवीन
फारच छान कविता आहे. कशी सुचते तुम्हाला काय माहित. दैवी देणगीच आहे ही..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/09/2019 - 15:31 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Tue, 07/09/2019 - 22:27 नवीन
एक एक ओळ म्हणजे दागिना आहे नुसता दागिना.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा