जे न देखे रवी...

चारोळी

Primary tabs

तुझ्या प्रेमासाठी
झालो दिवाणा
तझ्या नकाराने
होइन का शहाणा?

-सुशील

सुशील

माझ्या मनाता मी
तीला जीवापाड जपलं
मला नाकारून तिनं
मनालाच बोचकारलं

-सुशील

सुशील

हे काय ७७ वाचने तरी एकही प्रतिसाद नाही?
चांगले वाईट कसलेही असोत आपल्या प्रतिसादांमधूनच मार्गदर्शन होते! ह्याचा विचार करा..

केशवसुमार

वाचणार असेल कोणी तर
चारोळ्या लिहिण्याला अर्थ आहे
मिळणार नसेल प्रतिसाद
तर इथे लिहण व्यर्थ आहे

अस नाराज नका होऊ... लिहित रहा.. सगळे वाचता आहेत..
केशवसुमार..

सुशील

माझ्या चारोळ्यांची १७६ वाचने झाली आहेत. तेव्हा तुमचा टोमणा मला कळला नाही!

टारझन

त्यातली १२५ पेक्षा जास्त वाचनं आपलीच असावीत असा अस्मादिकांना दाट संशय आहे .. असो ...

केसुरावांच्या चारोळीने फुटलोय =)) खतरनाक

विसुनाना

चारोळ्या ठीक आहेत.सुपूर्त करण्याआधी शुद्ध(टंक)लेखन तपासून पहावे. काही कविताही दिल्यात तर बरे होईल.

सुशील

धन्यवाद विजयजी!
पण मला चारोळ्या हाच प्रकार मनापासून आवडतो.

सुशील

धन्यवाद संजय!

सुशील

सोबत घालवलेला एकही क्षण

विसरणे मला शक्य नाही

तुला विसरणारे असतीलही

मला त्यात मोजने शक्य नाही !!!

-सुशिल