Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कधीकधी मी हळवा होतो , बघुनी देव दानवांत

ख — खिलजि, गुरुवार, 07/11/2019 - 11:51
कधीकधी मी हळवा होतो बघुनी देव दानवांत का उगविली हि बीजे तू ? अर्धपोटी मानवात कधीकधी मी कठोर होतो बघून साऱ्या वेदनांना भळभळ त्या वाहत असतात पण पुन्हा करतो सुरुवात कधीकधी मी हळहळतो कोमेजल्या कळ्या बघुनी नव्या उमलताना बघून त्याला करतो कुर्निसात कधीकधी मी बिथरतो भविष्यकाळ चिंतूनि कल्पनांच्या माध्यमातून पेटवतो नवी वात कधीकधी मी शोधतो हरवलेली जुनी वाट मिट्ट काळोख दूरदूर आता हीच माझी वहिवाट हीच माझी वहिवाट .... {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

प्रतिक्रिया द्या
2393 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ज
जॉनविक्क गुरुवार, 07/11/2019 - 12:00 नवीन
नैराश्य तर मला मी निराश असतानाही आवडलं नाही म्हणून...
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 07/11/2019 - 14:04 नवीन
मित्रा, नैराश्य कधी कधी दिशा दाखवतं काही प्रश्न अनुत्तरित असतात तरीही शोधतो उत्तरे त्यांची त्यांच्याच शोधात ते जगायचं शिकवतं काही जवळ येतात , काही दूर जातात कधी मिळतात कुणाला तर कुठे झोळी रिकामी नैराश्यच तारते , ठरवते किंमत जगण्याची हे भौतिक सुख मात्र लय हरामी , लय हरामी
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क गुरुवार, 07/11/2019 - 14:27 नवीन
नैराश्यच तारते , ठरवते किंमत जगण्याची
हि किमंत म्हणजे अजून नवे नैराश्य असाच बहुतेकांचा सूर असतो, म्हणून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ख
खिलजि गुरुवार, 07/11/2019 - 14:44 नवीन
हे त्यांच्यासाठी लागू आहे , जे त्यात डुंबत राहतात .. जर माणसाच्या जवळची माणसे , त्याला यथायोग्य सोबत देणार असतील तर मला वाटत इतर गोष्टी गौण आहेत .. मी त्या वर बसलेल्याकडे फक्त एकच मागणे मागतो ते म्हणजे माझ्या कुटुंबाला सुखरूप ठेव आणि त्यांना निरोगी उदंड आयुष्य दे .. बाकी मी कुठल्याही समस्येवर चुकूनही बघत नाही रे .. मुळात समस्या हि कधी नसतेच .. मानवी मनाची कीड आहे ती . मुंगीच्या पावलाने शिरते आणि आत जाऊन हत्ती बनते .. अगदी त्या नालायक संशयाप्रमाणे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा