Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

घनदाट गर्द रेशमी केशकुंतल

अ — अविनाशकुलकर्णी, Fri, 07/12/2019 - 14:40
घनदाट गर्द रेशमी केशकुंतल नेत्रास कोरले काजळ कि सोमल तनुत रातराणीची मादक दरवळ गात्रात मदनाची बेफाम सळसळ * नजर, कधि लाजरी, कधि नाचरी रतिरुप,नखशीकांत तु लावण्य परी वाकलेली लज्जेने तु अबोध रमणी रुप चमके,जशी नभी शुक्रचांदणी * वसने ,गर्भ रेशमी अंगी ल्याली तव उरास काचे ,भर्जरी काचोळी देहात रानवारा,उसळे उधाण लाटा गालास खळी,अशी तु लावण्यकळी * अबोल पौर्णीमा, अन धुंद चांदणी जवळ श्रुंगार वेडी,बेधुंद रागीणी नाचति वक्षावर, चकोर मंडले बेभान मुग्ध ति कुजबुज अन चोरटे अलिंगन , * रोम रोम नशेने फुलले,श्वासात श्वास भिनले.. एक मेकाच्या सहवासात,बहरुन यौवन आले तारुण्य अन यौवनाचा प्राशितो मी कण नी कण ओंजळीत दिले मी तुजला,तृप्तिचे लक्ष लक्ष क्षण Avinash

प्रतिक्रिया द्या
2022 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ज
जेम्स वांड Fri, 07/12/2019 - 14:54 नवीन
काका तुम्ही नाश्त्यात शिलाजीत खाऊन बसता का काय राव. अभिव्यक्ती आड यायला नको कोणाच्या म्हणून इतके दिवस बोलायची भीड होती पण आता न बोलता राहवत नाहीये, जरा आवराच आता हे तुमचे अतिरेकी कामुक लिखाण. -वांडो साहित्य संपादक/मालक जरा लक्ष घातलेत तर बरे होईल ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Fri, 07/12/2019 - 14:54 नवीन
अक्कुजी आपने दिल जीत लिया !!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा