Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झरझर झरझर

श — शिव कन्या, Tue, 07/23/2019 - 04:44
झरझर झरझर झरणाऱ्या कातरवेळी मुलीला घेऊन मुलाने खेळायला जाऊ नये... तिचे धावते पाय थबकतात, घरातच विलांटी घेऊन मैदानाकाठचे गवत डोळ्यांनी खुडत राहतात... ..... ‘थांब थांब पळू नकोस माजलेले गवत, त्यात सापविंचू, मी आलो आलो नको नको पळू नकोस ....’ ऐकू येते इतके स्पष्ट भुडूक अंधारावर खेळगड्याचे नाव कोरत राहते ती दोन डोळ्यांवर वाकून .... खेळातले नियम मुलीला माहित नसतात मुलाला माहित असतात, पण तो ते पाळत नाही.... नियमावाचून मुक्त खेळ तो टाळ्या किती, हसू किती अंधार उजेडावर लाटा किती! घरी निघण्याची वेळ येताच मुलगी फ्रॉक झटकते, मुलगा घाम पुसतो कोवळ्या कोवळ्या अंधाराला रानफुलांचा वास येतो.... शाळेत जाताना मुलगी वेणीत अनंत माळते त्या रानफुलांचा वास वहीतल्या रेघांवर झुलवत ठेवते... ...... कातर कातर कातर वेळी मुलगी एकदम मोठी होते देवापाशी समंजस दिवा लावते.... तिला प्रार्थना जमत नाही, शुभं करोति येत नाही, पण जोडले हात स्वस्तिक होतात फ्रॉकवरच्या फुलांमध्ये मुलाच्या घामाचा गंध शोधू लागतात.... ..... खरंच, झरझर झरझर झरणाऱ्या कातरवेळी मुलीला घेऊन मुलाने खेळायला जाऊ नये Shivkanya

प्रतिक्रिया द्या
8100 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ज
जव्हेरगंज Tue, 07/23/2019 - 04:57 नवीन
विलक्षण
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/23/2019 - 06:17 नवीन
तरल, सुरेख.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Tue, 07/23/2019 - 15:05 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 07/23/2019 - 15:21 नवीन
लयबद्ध
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 07/23/2019 - 17:23 नवीन
मऊशार उबदार वाळूत लिहावं तसं लेखन आहे तुमचं. कधीतरी निवांतपणे तिथेच बाजूला बसून वाचता येतं किंवा कधी ते लगेच लाटेच्या पाण्यासोबत वाहून जातं. कधी तिथल्या वाळूचा उबदारपणा हवाहवासा वाटतो कधी गरम चटकेही बसतात. त्या वाळूचे गरम चटके बसल्यावर आम्ही उठून जाऊ शकतो पण तुम्ही तिथेच आणि तसेच लिहित रहा. Sandy
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Tue, 07/23/2019 - 19:26 नवीन
तुमच्या भावना पोहचल्या हो...:)) किती तो वाळूला त्रास!! :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
न
नाखु Tue, 07/23/2019 - 19:02 नवीन
अलगूज वाजते तशी ओढ वाटणारी कवीता. राग ताल नाही समजले तरी ऐकायला आवठते अशी अलगूज धून आकाशवाणी रसिक श्रोता वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Tue, 07/23/2019 - 19:27 नवीन
दाद दिल ले गयी... शुक्रिया..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
व
वीणा३ Tue, 07/23/2019 - 19:38 नवीन
तुमच्या कविता बरेचदा कळत नाहीत तरी वाचाव्याश्या वाटतात परत परत. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Tue, 07/23/2019 - 21:06 नवीन
मुलीला घेऊन मुलाने खेळायला जाऊ नये
का जाऊ नये समजले नाही जरा विस्तार कराल काय ?
  • Log in or register to post comments
इ
इरामयी Wed, 07/24/2019 - 08:06 नवीन
खूप छान कविता आहे. लहानपण आठवलं. लहानपणचे स्पर्धा, नियम, चाकोर्‍या नसलेले वेगवेगळे खेळ आठवले. अवांतरः आणि खरंच, आपल्या लहान मुली किती समंजस असतात आणि निवांत. मुलगे म्हणजे नुसता धांगडधिंगा आणि मारामार्‍या. बहिणीबरोबरसुद्धा सतत बरोबरी आणि भांडाभांडी. पण आपल्या बहिणीला थोडं जरी लागलं खुपलं की तितकेच भावूक होतात.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 07/24/2019 - 08:42 नवीन
बापरे! इतका निरागस भावार्थ होता का ह्या कवितेचा? मला काही भलताच अर्थ लागला होता! ह्याच कारणासाठी कविता ह्या साहित्य प्रकारापासून मी चार हात दूर राहतो. कवी/कवियत्रीला सांगायचे काही वेगळेच असते आणि वाचणारा आपापल्या परीने अर्थ लावतो. एकवेळ काहीच समजले नाही तरी ठीक पण अर्थाचा अनर्थ लावणे म्हणजे कवितेवर नकळत केलेला अत्याचारच कि!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरामयी
च
चांदणे संदीप Wed, 07/24/2019 - 09:37 नवीन
तुम्हाला समजलेला अर्थ योग्यच आहे. :( Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
इ
इरामयी Fri, 07/26/2019 - 16:31 नवीन
प्रत्येक गोष्ट काय अगदी उलगडूनच लिहायला हवी का? आणि तुम्ही अवांतरचा कवितेशी संबंध जोडला की काय? असू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
ग
गवि Wed, 07/24/2019 - 09:07 नवीन
नॉट समझींग्ड..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/24/2019 - 10:35 नवीन
तेच बरं आहे.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा