Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माकडांच्या पुढे नाचली माणसे!

ग — गंगाधर मुटे, Wed, 07/24/2019 - 16:07
माकडांच्या पुढे नाचली माणसे! पाहता पाहता काय झाले असे? माकडांच्या पुढे नाचली माणसे! या हवेला कुणाची हवा लागली? चित्त कामामध्ये ना तिचे फारसे त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे मेघही वागती की पगारी जसे नित्य येणे तिचे वादळासारखे मग लपावे हृदय हे कुठे नी कसे? व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती तू अभय बोल तू, तू हवे तू तसे                  गंगाधर मुटे 'अभय' ==०==०==०= =०==०==०==

प्रतिक्रिया द्या
13665 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ज
जालिम लोशन Wed, 07/24/2019 - 18:59 नवीन
आशय कळला नाही.
  • Log in or register to post comments
आ
आंबट चिंच गुरुवार, 07/25/2019 - 18:06 नवीन
या वर्षीच्या पावसाळा ऋतू संबंधी आहे. फनीच्या वादळी वाऱ्यानं मेघांना दूर नेऊन ठेवले असा आशय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जालिम लोशन
ग
गंगाधर मुटे Fri, 07/26/2019 - 11:21 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट चिंच
ज
जालिम लोशन Fri, 07/26/2019 - 13:10 नवीन
Taste Non fictionची असल्यामुळे, अशा साध्या छान कविताही कळत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट चिंच
श
श्वेता२४ गुरुवार, 07/25/2019 - 12:16 नवीन
त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे मेघही वागती की पगारी जसे हे आवडलं
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 07/26/2019 - 11:21 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 07/25/2019 - 12:41 नवीन
आणखी लिहा.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 07/26/2019 - 11:22 नवीन
आणखी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 07/25/2019 - 17:58 नवीन
पहिल्याछुट मी तुमचे नाव वाचलेच नाही. मला वाटलं की ही "खिलजी" यांचीच कविता असणार. कारण अशी शिर्षके देण्याची जबाबदारी सध्या त्यांच्याच शिरावर आहे. असो ! बरेच दिवस मिपावर दिसला नाहीत ? जुने सभासद परत आल्यावर आनंद झाला. बाकी शेतकरी साहित्य, चळवळी बद्द्ल बरेच दिवस काही लिहिलं नाही. काहीतरी लिहित चला ना..
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 07/26/2019 - 11:23 नवीन
धन्यवाद. मी नवीन काही लिहिले इथे नक्कीच येत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
व
विनिता००२ Fri, 07/26/2019 - 08:00 नवीन
या हवेला कुणाची हवा लागली? चित्त कामामध्ये ना तिचे फारसे >> होय असे होतेय खरे!! :)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 07/26/2019 - 11:23 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनिता००२
इ
इरामयी Fri, 07/26/2019 - 08:31 नवीन
अनाकलनीय. जमल्यास सोपं करून सांगावं.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 07/26/2019 - 11:25 नवीन
गझल आहे. त्यामुळे प्रत्येक शेर वेगळ्या अर्थाचा स्वतंत्र शेर आहे. कवितेसारखी एकजिनसी नसल्याने पूर्ण गजलेचा अर्थ लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरामयी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/26/2019 - 09:01 नवीन
तू अभय बोल तू, तू हवे तू तसे.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 07/26/2019 - 11:25 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा