तंत्रजगत
वारंवार लिहावी लागणारी वाक्ये
Primary tabs
*Texpand App*
बर्याच वेळा आपल्याला तीच तीच वाक्ये वारंवार वापरावी लागतात.दरवेळी टंकायचा कंटाळा येतो.अशावेळी ही वारंवार टायपावी लागणारी वाक्ये कोणीतरी टाईप करुन दिली तर?
अशी सोय असणारी ही छोटीशी अॅप.
१. या अॅपला इतर अॅपवर वापरण्यास परवानगी द्या.
२. वारंवार वापराव्या लागणार्या वाक्याचा शॉर्टकट बनवून सोबतच त्याचं विस्तारवाक्य साठवून ठेवा.
आता जेव्हा जेव्हा हा शॉर्टकट फोनवर कुठेही टाईप कराल त्यावेळी या अॅपचा सेवक लगेच हजर होईल.त्यावर टॅप करताच ते पूर्ण वाक्य टाईपलं जाईल.समजा ते नको असेल तर तिथेच Undo ची पण सोय आहे.ही Offline अॅप आहे.म्हणजे यासाठी इंटरनेटही सुरु असायला लागत नाही.
*अॅपची लिंक*
https://play.google.com/store/apps/details?id=com.isaiasmatewos.texpand
ट्राय करतो.
अॅप ची कल्पना छान आहे पण अगोदरच स्मार्ट फोन मुळे लोकांचे टायपिंग कमी झाले आहे. एक दिवस लोक शब्दाचे संपूर्ण स्पेलींग ही विसरतील की काय असे मला वाटायला लागले आहे. त्यामुळे होता होईल तोवर मराठीची तरी टंकनाची सवय कायम ठेवावी. शुद्धलेखन सुधारण्यासाठी नियमित टंकनाने मदत होईल. मात्र मराठीची ऐशी ची तैशी करणार्यांनी नक्कीच या अॅपचा उपयोग करुन चुका टाळाव्यात.
त्यापेक्षा एक पॅकेट ए४ कागद आणून रोज एका बाजूने (एका कागदावर दोन दिवस निघतील) मनात येतील ते उस्फुर्त विचार मांडले तर शुद्धलेखन पण उत्तम होईल अन सुलेखन सुद्धा, एक पॅकेट कागद १८०-२२०₹ ला मिळेल त्यात ५०० पाने म्हणजे २२० रुपये अधिक पेनाचे पैसे बघता किफायतशीर रित्या शुद्ध अन सु अशी दोन्ही लेखने होतील.
android मध्ये text shortcuts हा पर्याय उपलब्ध आहे (कोणत्याही इतर अॅपची गरज नाही). मी माझ्या घराचा पत्ता, इमेल पत्ता आणि इतर काही महत्वाच्या गोष्टी ज्या वारंवार एखाद्याला पाठवाव्या लागतात त्यांचे text shortcuts करुन ठेवले आहे ते सहज वापरता येते.
हे करून पाहिलं. शॉर्टकट्स दाखल करता आले पण ते वापरायचे कसे ते काही कळत नाही.
जेव्हा तुम्ही शॉर्टकट टाईप कराल तेव्हा सजेशनमध्ये ज्या शब्दाचा शॉर्टकट केला आहे तो दिसेल.
उदा. तुम्ही "मिसळपाव.कॉम" साठी "मिपा" असा शॉर्टकट केला असेल तर तुम्ही मिपा टाईपल्यावर वरती "मिसळपाव.कॉम" असे सजेशन दिसेल त्यावर टिचकी मारा.
हा का ना का :)
अर्थात तुमचा कीबोर्ड कुठला आहे यावर ते अवलंबून आहे. हि सुविधा फक्त गूगल कीबोर्डमध्ये चालते. उदा. sony xperia मध्ये xperia कीबोर्डच चालतो त्यात ही सुविधा नाही. तुमचा फोन जर प्युर अँड्रॉइड असेल (उदा. मोटो जी), तर ही सुविधा चालेल.
माफ करा मी आपला प्रतिसाद बघितला नव्हता त्यामुळे उत्तर दिले नाही. खाली 'सोन्या' यांनी विस्ताराने लिहिले आहेच. तरी काही अडचण वाटल्यास व्यनि करा.
आदिआजा !
तुम्ही अँड्रॉइडचा व्हॉईस रेकग्निशन वापरला आहे का ?
ते छान आहे मराठी किंवा इंग्लिश मध्ये देखील वापरू शकता उदाहरणादाखल मी आत्ता हा प्रतिसाद अँड्रॉइड वोईस रेकॉग्निशन वापरून देत आहे आणि मला यात कोणतीही सुधारणा करावी लागली नाही फक्त विरामचिन्हे मात्र स्वतः टाकतो.
शब्दांचा संग्रह व्हायला पाहिजे होता असे वाटले. तरीही माहितीबद्दल आभारी आहे.
-दिलीप बिरुटे