Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कविता: आज्जी माझी…

B — bhagwatblog, Tue, 07/30/2019 - 12:14
आभाळभर माया, आठवणींच्या सुरकुत्या प्रखर बुद्धीची प्रभा, अंगी विशिष्ट कला आज्जी माझी... मायेची पाखर, उडून गेली दूरवर परी आठवण नाही पुसली कदापि आज्जी माझी... संवादातून प्रेमाचे ऋणानुबंध जोडले भेटीत स्नेहच जपले, हेच संचित साधले आज्जी माझी... कधी प्रसंगातून शब्दाविनाच सुटले, डोळ्यातून अश्रु अर्धवट ओघळले, प्रयत्नांत कधी धडपडले, घडले परी मी किंचित नाही घाबरले आज्जी माझी... आप्तांना भेटण्यास जीव कासावीस दिसताच पाणावले डोळे आठवणीने आज्जी माझी... आत्ता शरीर थकले, आणि कृश झाले इच्छा संपल्या, उरल्या फक्त स्मृती आज्जी माझी... पानगळ सुरू झाली आणि फक्त खोडच उरले वसंताची चाहुल लागेल, पुन्हा पालवी फुटेल आज्जी माझी...

प्रतिक्रिया द्या
3241 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
पद्मावति Tue, 07/30/2019 - 12:18 नवीन
आज्जी लोक गोडच असतात. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/31/2019 - 09:48 नवीन
खरंच, आज्जी लोक गोड असतात. खूप छान कविता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
र
राजे १०७ Tue, 07/30/2019 - 12:31 नवीन
सुंदर कविता
  • Log in or register to post comments
B
bhagwatblog Wed, 07/31/2019 - 09:42 नवीन
धन्यवाद पद्मावति, राजे १०७ !!! आज्जी लोक गोडच असतात. >> +१
  • Log in or register to post comments
इ
इरामयी Wed, 07/31/2019 - 11:46 नवीन
छान आहे!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा