Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कावळा..

प — प्राची अश्विनी, Wed, 07/31/2019 - 08:47
बैसला फांदीवरी हा चिंब भिजुनी कावळा मेघांपरी आभाळीच्या, रंग त्याचा सावळा. तीक्ष्ण त्याची नजर आणि बुद्धी तर तिच्याहुनी, ना धजे कोणी म्हणाया पक्षी दिसतो बावळा. व्यर्थ शोधी भक्ष्य अपुले, ना फळेही दृष्टीला निवडले जे झाड त्याने ते निघावे आवळा? कर्ण जरी नसती, शिरी...आर्त काही घुमतसे थांबला जो थेंब नयनी, काक अश्रू सावळा? या अशा ओल्या दिनी काय भरवावे पिलां आजही नाही कुणाचा पिंड पुजला राऊळा? ( मीटरमध्ये खूप चुका आहेत. पण बिचा-या कावळ्यावरची बिचारी कविता.. मानून घ्या. :))

प्रतिक्रिया द्या
5485 वाचन

💬 प्रतिसाद (8)
र
राघव Wed, 07/31/2019 - 10:56 नवीन
चांगलंय.. पण प्रयोजन समजले नाही. रूपक म्हणून तर नाही ना वापरले असा विचार मनाला चाटून गेला एवढंच! ;-)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 08/04/2019 - 18:33 नवीन
नाही, अगदी सहज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
इ
इरामयी Wed, 07/31/2019 - 11:41 नवीन
मानली. घेतली. थोडीशी आवडली. थोडीशी गंडल्यासारखी वाटली. "आवळा" केवळ यमकासाठी टाकल्यासारखा वाटतो. (काव्यनिर्मितीच्या वेळी "यमक" हे जर जाचक बंधन होत असेल तर ते झुगारून द्यायचं. मुक्तछंद सुद्धा छानच वाटतो.) गोळाबेरीजः छान!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 08/04/2019 - 18:34 नवीन
हो. म्हणूनच आधीच माफी मागितली.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरामयी
च
चौथा कोनाडा Wed, 08/21/2019 - 09:23 नवीन
छान आहे !
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 08/23/2019 - 08:36 नवीन
धन्यवाद.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ग
गणेशा Wed, 08/21/2019 - 09:26 नवीन
बैसला फांदीवरी हा चिंब भिजुनी कावळा मेघांपरी आभाळीच्या, रंग त्याचा सावळा. मस्त एकदम
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 08/23/2019 - 08:35 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा