चालू घडामोडी : ऑगस्ट २०१९
राजकीय वार्ता :
राष्ट्रवादीतून भाजपात इनकमिंग मोठ्या प्रमाणवर सुरु झाल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहिल की काय असे वाटू लागले आहे. या निवडणूकीचे निकाल लागल्यावर राष्ट्रवादी, मनसे या पक्षांचे भवितव्य काय असेल याची स्थिती स्पष्ट होईल. भाजपात आता आनंदाचे वातावरण असले तरी एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येला खायला काय घालायचे यावरुन भविष्यात संकटे उभी राहू शकतील असे वाटते. शिवाय पोटच्या पोरांच्या तोंडचा घास काढून घेऊन दत्तक घेतलेल्या पोरांचे पोट भरावे लागणार आहे की देवाने चोच दिली आहे तर चाराही तोच देईल याचाही निकाल काय लागतो ते बघणे रोचक ठरेल. भाजप मधे आता जागा फुल झाली आहे, आता भरती नाही असे मुख्यमंत्री म्हणाले तरी माझी त्यांना विनंती आहे की थोडं थोडं सरकून घ्यायला सांगा नेत्यांना. अजून थोडी जागा होऊ शकते गाडीत. फक्त येणार्या काळात कार्यकर्ते व्यासपीठावर बसतील आणि नेते समोरच्या खुर्च्यांवर बसतील एवढे होणार नाही याची काळजी घ्या.
शिवसेनेचे आदित्य ठाकरे सक्रीय राजकारणात उतरले आहेत, बहुतेक वरळी मधून निवडणूक लढवतील अशी चिन्हे आहेत. तसे झाले तर ठाकरे घराण्यात निवडणूक लढविणारा पहिली व्यक्ती म्हणून त्यांची इतिहासात नोंद होईल. किंगमेकर ते किंग असा प्रवास होणार काय हे तर आनेवाला वक्त ही बतायेगा ! भाजपाच्या वाढीचा शिवसेनेवर काय परिणाम होईल हे पाहणे देखील रोचक ठरेल. साहेबांच्या आवाजसरशी रस्त्यावर उतरणार्या कार्यकर्त्यांची पिढी आता अस्तंगत होत चालली आहे.
आदित्य ठाकरेंच्या काळात बहुतेक अफजलखानाचा कोथळा, पाठीत खंजीर खुपसणे, लखोबा लोखंडे सारखे वाक्प्रचार अस्तंगत होतील अशी चिन्हे आहे.
दलित मंडळींच्या वेगळ्या चुली एकत्र येऊन काही चमत्कार घडेल हे बहुधा येत्या ५० वर्षात तरी शक्य दिसत नाही.
काँग्रेस मधे आता महाराष्ट्रात कोणता मोठा नेता राहिला आहे काय हे आठवून पाहण्यासाठी मेंदूला खुप चालना द्यावी लागेल.
तीन तलाक कायद्यामुळे मुस्लीम मते कशी व्यक्त होतात हे देखील या निवडणूकीत पहायला मिळेल.
भाजपा वाढली तर शिवसेना या निवडणूकीत तर बरोबर राहिल मात्र भविष्यात हेच दोन एकमेकांचे विरोधी पक्ष म्हणून समोर येतील काय ?
अर्थात राजकारणात काहीही शक्य असते, एखादी मोठी घटना होत्याचे नव्हते करते आणि कोणाच्या खिजगणतीत नसलेला पक्ष पुन्हा वर चढू लागतो असेही अनुभवास येऊ शकते. पिढ्यान पिढ्या जनतेची सेवा करणार्या घराण्यांना रिकाम्या हाताने बसणे शक्य होत नाही त्यामुळे ते एका पक्षातून दुसर्या पक्षात जातच राहणार. नोकरी मधे जसे आजकाल लोक २-३ वर्षात नोकरी बदलतात तसेच समजायचे हे !
दिल्ली मधे महिलांना मेट्रोत फुकट प्रवास या घोषणेनंतर (ही योजना प्रत्यक्षात आली की अजून अभ्यास चालू आहे ?) आज केजरीवाल सरांनी २०० युनिट पर्यंत वीजबिल नाही अशी एक अफलातून योजना काढली आहे. आता महाराष्ट्र सोडून दिल्लीत राहयला गेले तर बरे पडेल की काय याचा विचार करतोय :)
फक्त भविष्यात रोज ऑक्सीजनचा सिलींडर विकत घ्यावा लागेल श्वसनासाठी. तोही बहुतेक सरकार फुकट देऊ शकेल.
धाग्याचे नाव चालू घडामोडी आहे आणि मजकूर सगळा राजकारणाविषयी आहे त्याबद्द्ल माफी मागतो. वाचक / प्रतिसादक हळूहळू इतर गोष्टींची भर घालतीलच.
हाता सरशी त्या चीन ला दोन कानामागे टाकल्या जाव्यात ही ईच्छा त्यामुळे झालीहे व्हायला हवे, अशीच इच्छा आहे... पण ते करताना वस्तूस्थितीचा विसर पडला तर आपल्यालाच खूप महागात पडेल, नाही का ? वरचा उद्येश तर सफल व्हायलाच हवा पण बाजू तडक आपल्यावर उलटायला नको, असे हवे असल्यास (आपण नेहमी ज्यांचे नाव आदराने व भक्तीभावाने घेत असतो त्या शिवराय आणि चाण्यक्य यांना आठवून), अनेक गनिमी काव्याच्या रणनिती वापरता येतात, उदाहरणार्थ... १. पाहुण्याच्या चपलेने विंचू मारावा. २. तडक चपलेने मारण्याऐवजी शालजोडीतले (चपलेचे फटके) द्यावे. इत्यादी, इत्यादी. =)) ;)INX Media case: P Chidambaram moves SC for relief, asked to mention appeal tomorrow
भूतपूर्व अर्थमंत्री चिदंबरमना दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला.
या अभूतपूर्व निकालानंतर कॉन्ग्रेसच्या गोटात शांतता पसरली आहे. या निकालाला रद्द करून अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जान्यामान्या कॉन्ग्रेसी नेते-कम-वकिलांच्या (सिब्बल, संघवी, सलमान खुर्शिद, इ) फौजेची लगबग सुरु झाली आहे आणि अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी उद्या सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
आपल्या भारतात सोइ प्रमाणे कागदी घोडे नाचविण्यात भाजप ही कमी नाही असे मला वाटत आहे , त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे INX MEDIA CASE . 2014 ला भाजप सत्तेत आली असताना सीबीआय ने जुलै 2018 ला चार्जशीट दाखल केले आहे , इतका उशीर का व्हावा ? हे न उलगडणारे कोडे आहे . कदाचीत त्यांच्या अडचणी समजण्याची कुवत माझ्यासारख्या सामान्यात नाही : ) माझ्यासारखा अतीसामान्य माणसाने जर कुठला फ्रॉड केला तर तिसऱ्या दिवशी मला रिमांड मध्ये घेतील आणि दोन तीन महिन्यांत माझ्यावर चार्जशीट ठोकली जाईल : )जेव्हा माणसाला नितिमत्तेचा झटका येतो, तेव्हा त्याला लोकशाही सुचते आणि जेव्हा हवे असलेले घडून येत नाही असे दिसते, तेव्हा हुकुमशाही कारवाई हवी असते. ;) :) हा विरोधाभास बाजूला ठेऊन जरासा विचार करू शकलो तर, हे जग गुंतागुंतीचे असले तरी, समजायला तितकेसे कठीण नाही ! ;) मानवी मानसिकता आणि व्यवहार यांचा जरा खोलवर विचार केला तर जगभर साधारणपणे खालील परिस्थिती दिसेल. राजेशाहीत आणि/किंवा इतर प्रकारच्या हुकुमशाहीत किंवा राज्यक्रांतीने सर्वोच्च नेता बदलला गेला की तो नवा सर्वेसर्वा होतो. तो ताबडतोप हाताखालच्या सर्व अधिकार्यांत आणि व्यवस्थेत हवे तसे बदल घडवून आणू शकतो. त्याला विरोध करायचा पर्याय कोणाला नसतो... जर आपले मुंडके धडावर रहावे असे वाटत असले, तर ! :) त्याविरुद्ध, लोकशाहीत सरकार बदलले (पक्षी : दुसर्या नेत्याला सर्वोच्च पद मिळाले) तरी तो सर्वेसर्वा बनू शकत नाही. जुन्या प्रशासनात असलेली बाबूशाही (पक्षी : अर्थ, गृह, इत्यादी महत्वाच्या पदांवरचे सेक्रेटरीज आणि त्यांची कामे सावरणारे कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी) व इतर वैधानिक आणि अर्धवैधानिक संस्था (उदा: सिबीआय, ईडी, इ) यातले वरिष्ठ-कनिष्ठ अधिकारी पूर्वीप्रमाणेच आपल्या पदावर असतात. हुकुमशाहीप्रमाणे, त्यांना लगेच बदलून, त्यांच्याजागी आपल्या तत्वांप्रमाने काम करणार्या लोकांची नेमणूक करता येत नाही (सिबीआयच्या मुख्याच्या बदलाच्या वेळचे नाटक आठवत असेलच) किंवा सगळे कायदे-नियम आपल्या मनाप्रमाणे बदलता येत नाहीत. योग्य आणि देशाच्या भल्यासाठीचे बदलही लोकशाही आणि सद्य कायदाप्रक्रियेप्रमाणेच करावे लागतात... आणि ही प्रक्रिया वेळकाढू असते, हे सांगायला नकोच. या जुन्या अधिकार्यांनी जुन्या राजकारण्यांबरोबर हातात हात घालून (बरे-वाईट) काम केलेले असते. किंबहुना, राजकारण्यांबरोबरच अनेक संशयास्पद कामांत त्यांचे हात अडकलेले असतात. जुनी व्यवस्था जेवढी जास्त काळ असेल आणि ती जेवढी जास्त भ्रष्ट असेल, तेवढे शासन आणि ते चालवणारे बाबूलोकही जास्त भ्रष्ट असतात, हे आलेच. कारण, भ्रष्ट व्यवस्थेत, नीतीमान अधिकारी नसतातच असे नव्हे, पण, नितीमत्ता गुंडाळुन ठेऊन, नेत्यांना त्यांच्या कारवायांत मदत करणारे लोकच बहुसंखेने भरभर वर जातात, हे सांगायला नकोच. असे अधिकारी, सत्तापालट झाला तरी, पडद्याआडून जुन्या राजकारण्यांना मदत करतात. सद्या गाजत असलेल्या चिदंबरम प्रकरणात, काही महिन्यांपूर्वी, भारताच्या अॅटर्नी जनरलने सर्वोच्च न्यायालयात, "पुराव्यांची अनेक कागदपत्रे आम्ही कोर्टाला देण्याअगोदर माध्यमांना मिळत आहेत आणि त्यातली काही श्री चिदंबरम यांच्यावर घातलेल्या धाडीत सापडली आहेत" असे विधान केले होते, हे आठवत असेलच. असे का होते याची अनेक कारणे असू शकतात, त्यातली काही महत्वाची अशी... (अ) लोकशाहीत ५ वर्षानी सत्तापालट होऊ शकतो. तेव्हा, हुशार बाबू (उच्च्पदस्थ बाबूलोक आणि बाबूगिरी मुरलेले सर्व प्रकारचे बाबू हुशारच असतात, त्याशिवाय ते इतके यशस्वी होऊ शकले नसते) लोकांचे असे मत असणे आश्चर्यकारक नाही की :"नेते दर पाच वर्षांनी बदलतात पण त्यांची सगळी कामे करणारे आणि त्यांना सल्ला देणार्या आमची खुर्ची इथे ३०-३५ वर्षे कायम असते". (आ) सत्तापालट झाल्यावर छत्रछाया गमावल्यामुळे अनेक भ्रष्ट बाबूलोकांची दुकाने बंद झालेली असतात... त्यामुळे ते नाराज असणे स्वाभाविक आहे. तेव्हा भ्रष्टाचाराविरुद्ध काम करणार्या नवीन प्रशासनाला त्यांची मदत जरासा हात राखूनच आणि/किंवा जेवढ्यास तेवढी राहणे शक्य आहे. (इ) एखाद्या प्रकरणात जुन्या राजकारण्यांवर कारवाई झाली तर, (१) त्या प्रकरणात मदतनीस असलेल्या बाबू लोकांनाही ते धोकादायक असते आणि (२) रिपल इफेक्ट्स होऊन, जुन्या नेत्याच्या छत्रांखाली, बाबू लोकांनी केलेले इतर अनेक गैरव्यवहार उघड होण्याचाही धोका असतो. (ई) जुन्या नेत्याला अडचणीत आणण्यापेक्षा त्याला पडद्याआडून मदत करून ५ वर्षे वेळ मारून नेणे आणि तो परत सत्तेवर आल्यावर आपले दुकान परत सुरु करणे, हा विचार सोयीचा वाटला तर आश्चर्य ते काय? (उ) जुन्या नेत्याशी तात्विक पायावर समिकरण जुळलेल्या अधिकार्याला बदल पचविणे कठीण जाणारच आणि त्याने आपली हुशारी नवीन व्यवस्थेला पडद्यामागून सुरुंग लावण्यास व जुन्या नेत्याला परत सत्तेवर आणण्यास, कामी आणणे, फार जगावेगळे होणार नाही. (ऊ) याशिवाय, जुन्या राजकारण्यांनी स्वतःचे हितसंबंध राखण्यासाठी अनेक नेताभिमुख (पक्षी : स्वतःचा भ्रष्टाचार पचवता येईल असे) कायदे केलेले असतात. ते बाद करून नवीन जनताभिमुख कायदे करणे ही प्रक्रिया लोकशाहीत गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असते. इतर अनेक कारणे असू शकतात, पण वरील काही मुख्य कारणे मुद्दा समजून घ्यायला पुरेशी आहेत. यामुळे, अनेक दशके घट्ट पाय रोऊन बसलेली आणि अनेक हितसंबंध निर्माण झालेल्या प्रशासनात, सर्व महत्वाच्या प्रशासकिय, संवैधानिक आणि अर्धवैधानिक संस्थांत (सेक्रेटरीएट, सिबीआय, ईडी, इ), नवे सरकार आले तरी, पहिल्या दहापैकी बहुसंख्य अधिकारी जुन्या सरकारची 'बाळे' असतात... हे कटू असले तरी सत्य आहे. म्हणूनच, लोकशाहीत अमुलाग्र प्रशासनिय बदल घडवून आणण्यास ३ (तीन) कार्यकाल लागतात असे म्हणतात... १. पहिली ५ वर्षे बस्तान बसलेल्या अधिकार्यांना ताब्यात आणणे आणि त्यांचा उघड/गुप्त विरोध मोडून काढत, शक्य तेवढे काम करवून घेण्यात जातो. २. दुसर्या ५ वर्षांत, बहुतेक अधिकार्यांना, "नवीन व्यवस्था पाय रोऊन उभी राहिली आहे, तेव्हा आपण सुधारून नवीन व्यवस्थेशी जुळवून घेणे बरे" असे वाटते. त्याचबरोबर, प्रत्येक महत्वाच्या खात्यातील १० पैकी ३ ते ५ वरिष्ट अधिकारी निवृत्त झालेले असतात किंवा नवीन व्यवस्थेने बदलले असतात. अर्थातच, नवीन बदलांचा जोर आणि वेग वाढू लागतो. ३. तिसर्या ५ वर्षांत भल्याभल्या (एन्ट्रेंच्ड) अधिकार्यांचा धीर सुटतो आणि बहुतेक सर्व उच्च अधिकारी नवीन व्यवस्थेशी जुळवून घेण्यास शिकलेले असतात. जे तसे करू शकत नाहीत, ते इथपर्यंत (कार्यकाल संपून किंवा त्यापूर्वी स्वेच्छेने) निवृत्त झालेले असतात किंवा बिनकामाच्या/बिनमहत्वाच्या जागी बदली झालेले असतात. अर्थातच, नवीन बदलांचा जोर आणि वेग जनतेच्या अपेक्षा जास्ती जास्ती पूर्ण करू लागतो. वरील प्रक्रिया, काही सरकारे जास्त जोमाने आणि कमी वेळात करू शकतात, तर काही सरकारे कमी जोमाने आणि जास्त वेळात करू शकतात... पण लोकशाही व्यवस्थेत ही प्रक्रिया अनिवार्य असते.चिदंबरम सिबिआयच्या ताब्यात. राममनोहर लोहिया रुग्णालयात वैद्यकिय तपासणीसाठी नेण्यात आले, जी अटकपूर्व आवश्यकता आहे.