Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रावण आला गं सखे

ब — बिपीन सुरेश सांगळे, Sun, 08/04/2019 - 17:15
श्रावण आला गं सखे ---------------------------- श्रावण आला गं सखे माहेराची सय आली हाती जरी किती कामं त्या साऱ्याला लय आली परसात एक आड अंगणात किती झाडं त्या झोक्यांची याद आली प्रेमळ गं भाऊराया वहिनी करिते माया भेटायची इच्छा झाली देवासमान गं पिता देवासमान गं माता पानं गळायला आली आताच जायला हवं त्यांना पहायला हवं चिंता इथे भय घाली ------------------------ बिपीन

प्रतिक्रिया द्या
3938 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
पद्मावति Sun, 08/04/2019 - 17:49 नवीन
सहज साधी शब्दरचना. आवडली.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 08/04/2019 - 20:33 नवीन
बस काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या... 1995 पूर्वीचा भारत.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 08/06/2019 - 16:41 नवीन
हिच्या मामाच्या घरी अजूनही आहे , हे सारं. सध्या साताऱ्याला राहतात ते .. मस्त मज्जा येते .. जेव्हापण हि तिथे जायला निघते मी मुद्दाम सुट्टी घेऊन तिला सोडायचा बहाणा करतो आणि तिला परत आणेपर्यंत तिथेच तळ ठोकून बसतो .. सुंदर जागा आहे .. कण्हेर धरणाशेजारी .. अहाहा .. हि कविता वाचून आणितुझा प्रतिसाद वाचून त्या कैक आठवणी जाग्या झाल्या .. अरे पाऊस असला तरी चालेल आणि नसला तरी काही गम नाही त्या बंदिस्त अंगणात झोपण्याची तारे मोजण्याची नशाच काही और आहे कधी बघितलाय मनसोक्त निखळताना तारा तुम्ही कधी घेतलाय , कुठेही बाहेर ना जाता अंगावर गारेगार वारा तुम्ही साताऱ्याला या .. सर्व काही फ्री फ्री फ्री मोकळी जागा , बाहेर तो उंच वाढलेला औदुंबर जणूकाही झुला झुलवण्यासाठीच त्याने जन्म घेतला आहे घरातच असलेला आड आणि त्याला रांधण्यासाठी घुंगरू बांधलेला राहाट आणि ती अंगणात झोपण्याची व्यवस्था , जणूकाही उभं मोकळं आकाश तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे आणि ती सुंदर नयनरम्य पहाट, पक्ष्यांचं किलबिलाट घराचे माननीय जावई म्हणून , तोंड धुण्याअगोदरच आलेला चहा .. अहाहा अहाहा आई गं ,, नको त्या आठवणी ,, परत परत तिथे जावेसे वाटते अरे इतकं सुंदर आहे सर्व तिथे , कि पंचतारांकित हॉटेलसुध्दा झक मारते
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Tue, 08/06/2019 - 18:41 नवीन
पद्मावति जॉनविक्क आभारी आहे मी खूप आपला
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Tue, 08/06/2019 - 18:43 नवीन
खिलजी वावा ! किती सुंदर प्रतिसाद ! मुख्य म्ह्णजे तुमची प्रतिक्रिया हीच एक कविता आहे
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 08/06/2019 - 19:10 नवीन
छान. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sat, 08/10/2019 - 11:46 नवीन
राघव , आभारी आहे .
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 08/10/2019 - 15:01 नवीन
सुरेख. साधी, सहज, सुंदर.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा