Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चान्द्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं!

ब
बहुगुणी
Sat, 11/08/2008 - 13:32
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3426 वाचन

💬 प्रतिसाद (12)
व
विनायक प्रभू Sat, 11/08/2008 - 13:41 नवीन
चिन्याना मलावरोध झाला आहे. कायम चूर्ण वाल्याबरोबर बोलणी चालू आहेत, इलाजासाठी. इथे इनो चालणार नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Sat, 11/08/2008 - 15:49 नवीन
चांद्रयानाच्या मोहिमेचे खालील प्रमुख टप्पे आहेत. १. पृथ्वीवरून उड्डाण २. अंतराळातून पृथ्वीचे अवलोकन करीत चंद्राकडे गमन ३.चंद्राच्या कक्षेत प्रवेश ४. चंद्राच्या कक्षेत १०० कि.मी. अंतरावर राहून सुमारे २ वर्षे चंद्राभोवती नियमितपणे घिरट्या घालणे हे मुख्य काम आहे. हे काम करतांना खालील गोष्टी करायचे योजिले आहे. १. चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्व बाजूंनी निरीक्षण करून त्याचे नकाशे तयार करणे. २. चंद्रावरील धातू, अधातू वगैरेंच्या साठ्यांचा अंदाज घेणे ३. चंद्रावर उतरणारे (धडकणारे) छोटे यान पाठवून त्याच्या कक्षेचा अभ्यास करणे ४. या यानाने चंद्रावर धडकण्यापूर्वी जवळून घेतलेली माहिती जमा करणे. या मोहिमेतले पहिले तीन टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. चौथ्याची आतुरतेने प्रतीक्षा आहे. या संपूर्ण कालावधीत चांद्रयानाकडून शक्य तेवढी माहिती पृथ्वीवरील केंद्राकडे पाठवत राहिली जाईल. येथील प्रयोगशाळांमध्ये त्याचे विश्लेषण होत राहील. यांतून नवनव्या शास्त्रीय गोष्टी समजत जातील व त्यांचा भविष्यकाळात करण्याच्या प्रयोगात उपयोग होईल. कदाचित पृथ्वीवरील जीवनात उपयोगी पडणारे शोधसुध्दा त्यावरून लागू शकतात. अंतरिक्ष संशोधनासाठी नासाने केलेल्या संशोधनातून निर्माण झालेल्या कित्याक गोष्टी आज सामान्य माणसाच्या वापरात आल्या आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी गुरुवार, 11/13/2008 - 13:55 नवीन
वरती आनंदघनांनी सांगितलेल्या टप्प्यांपैकी चवथ्या टप्प्यातील तिसर्‍या भागाची-चंद्रावर उतरणारे (धडकणारे) छोटे यान पाठवून त्याच्या कक्षेचा अभ्यास करण्याची- उद्या सुरुवात होतेय असं दिसतंय, रात्री दहा वाजता. आणि पुढच्या मानवरहित चांद्रयानाची (चांद्रयान २) उड्डाण वेळही २०१२ निश्चित झालीय. त्याआधी, २०११ च्या सुमाराला, आदित्य ही सूर्यमोहिम निघतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
अ
अनिता Sun, 11/09/2008 - 05:33 नवीन
ह्या चिनी लोका॑च्या अ॑तराळ-भ्रमणाच्या रसभरीत बातम्या त्या॑चे यान उड्ण्याआधिच प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे त्या॑ना भारताचे प्रामाणिक यश खुपत आहे..
  • Log in or register to post comments
अ
अनिता Sun, 11/09/2008 - 05:34 नवीन
ह्या चिनी लोका॑च्या अ॑तराळ-भ्रमणाच्या रसभरीत बातम्या त्या॑चे यान उड्ण्याआधिच प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे त्या॑ना भारताचे प्रामाणिक यश खुपत आहे..
  • Log in or register to post comments
श
शिशिर Sun, 11/09/2008 - 15:12 नवीन
अरे ह्यात त्यान्च्या बारीक डोळ्यान्चा दोष आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 11/09/2008 - 15:54 नवीन
इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन... ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे !!! मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Mon, 11/10/2008 - 06:17 नवीन
जाऊन त्यांच्या डोळ्याच्या फटी जरा मोठ्या करून येईन म्हणतो
  • Log in or register to post comments
श
शिशिर Fri, 11/14/2008 - 13:01 नवीन
चन्द्र यान चन्द्रा पासून १०० कि.मी. अंतरा वर आहे. आज रात्री भारता चा झेन्डा सुध्धा चन्द्रा वर पोचेल. तेव्हा चीन चा पोटात खरच दुखेल.
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Fri, 11/14/2008 - 13:28 नवीन
लय भारी राव! आता सात पंचेचाळीसला आमी बी आमचं यान चंद्रावर न्ह्येयाचा इचार करतोय! शेलिब्रेट का काय ते कराय नकू का?
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Sat, 11/15/2008 - 15:19 नवीन
मी दिलेल्या यादीमधला चौथा टप्पा (खाली दिलेला) आता सुरू झाला आहे. त्यातल्या ३ व ४ या गोष्टी झाल्या आहेत. भारताचा राष्ट्रीय ध्वज चंद्रावर पोचला आहे. १ व २ पुढील दोन वर्षे चालत राहतील. ४. चंद्राच्या कक्षेत १०० कि.मी. अंतरावर राहून सुमारे २ वर्षे चंद्राभोवती नियमितपणे घिरट्या घालणे हे मुख्य काम आहे. हे काम करतांना खालील गोष्टी करायचे योजिले आहे. १. चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्व बाजूंनी निरीक्षण करून त्याचे नकाशे तयार करणे. २. चंद्रावरील धातू, अधातू वगैरेंच्या साठ्यांचा अंदाज घेणे ३. चंद्रावर उतरणारे (धडकणारे) छोटे यान पाठवून त्याच्या कक्षेचा अभ्यास करणे ४. या यानाने चंद्रावर धडकण्यापूर्वी जवळून घेतलेली माहिती जमा करणे. आनंद घारे माझे लेखन आवडले असेल तर कृपया इथेसुद्धा भेट द्यावी. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/15/2008 - 16:33 नवीन
कालच एक नवीन गोष्ट कळली की चंद्राचं गुरूत्वाकर्षण सगळ्या बाजूंनी समान (सिमेट्रीकल) नाही. चंद्र जेवढ्या वेळात स्वतःभोवती फिरतो तेवढ्याच वेळात पृथ्वीभोवती फिरतो त्यामुळे चंद्राची एकच बाजू पृथ्वीवरुन दिसते आणि चंद्राच्या एकाच बाजूने पृथ्वी दिसते ही गोष्ट बर्‍याच लोकांना माहित असेल. पण त्यामुळे चंद्रावर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असमान झालं आहे त्यामुळे चंद्राच्या आपल्या बाजूला प्रचंड जास्त प्रमाणात ज्वालामुखी आहेत (होते?). खालच्या चित्रात पहा, डाव्या बाजूच्या चित्रात जे मोठे काळे डाग दिसत आहेत तीच ती मोठी पठारं. Image removed. Image removed. कालच एक नवीन गोष्ट कळली की चंद्राचं गुरूत्वाकर्षण सगळ्या बाजूंनी समान (सिमेट्रीकल) नाही. चंद्र जेवढ्या वेळात स्वतःभोवती फिरतो तेवढ्याच वेळात पृथ्वीभोवती फिरतो त्यामुळे चंद्राची एकच बाजू पृथ्वीवरुन दिसते आणि चंद्राच्या एकाच बाजूने पृथ्वी दिसते ही गोष्ट बर्‍याच लोकांना माहित असेल. पण त्यामुळे चंद्रावर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असमान झालं आहे त्यामुळे चंद्राच्या आपल्या बाजूला प्रचंड जास्त प्रमाणात ज्वालामुखी आहेत (होते?). आपल्यादिशेला असलेली बाजू लांबची बाजू चंंद्राच्या आपल्या बाजूला जेवढी पठारं आहेत तेवढी दुसर्‍या बाजूला नाहित आणि या पठारांच्या असमान विभागणीमुळे चंद्राचं गुरुत्वाकर्षण सिमेट्रीकल नाही. त्यामुळे एखादी गोष्ट चंद्राभोवती महिन्या-दोन महिन्यांपेक्षा जास्त स्थिर कक्षेत फिरती ठेवायची असेल तर त्याच्या विषुववृत्तापासून काही विशिष्ट अंशात कललेल्या वृत्तातच ती गोष्ट असणं भाग आहे, (माझ्या आठवणीप्रमाणे ८६.५, ४३.२ अंश, असे काही आकड्यांवर फारसा विश्वास ठेवू नये.) नाहीतर ती गोष्ट फारतर दोन महिने त्या कक्षेत राहून शेवटी चंद्रावर कोसळते. आपल्या चांद्रयानाच्या बाबतीत हीच गोष्ट महत्त्वाची आहे, की ते यान एका विशिष्ट कक्षेत स्थिर करणे. या यानातून पाठवलेले सिग्नल्स रेडीओ लहरींच्या रुपात पाठवले जात असून, बंगळूरूच्या जवळ एक रेडीओ दुर्बिण आहे ती गोळा करत आहे. (चंद्राचे फोटो विकीपीडीयावरुन साभार)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा