Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धुरंधर

ख — खिलजि, Mon, 08/12/2019 - 11:00
पेटता पेटता विझलो कधी माझे मलाच कळले नाही दिला होता शब्द खरा पण काय ते नीट आठवलेच नाही या स्मृतीला कोण जाणे कुणाचा विखारी दंश झाला जो तो ओळखीचा असूनही इथे मलाच परका झाला कोणता हात धरू मी ? कोणता सोडून देऊ ? या हातांच्या विळख्यातच माझा नक्की कोणता ? तोच कळेनासा झाला समजत होतो धुरंधर स्वतःला पण या हळव्या हृदयाने घात केला मेंदूने बरेच समजावून पहिले त्यास पण हळूहळू तोही त्या हृदयात गेला इथेच घेतली समाधी मनाने इथेच माझा अंत झाला हाच तो विखारी दंश होता ज्याने धुरंधर परागंदा झाला {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

प्रतिक्रिया द्या
3728 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
महासंग्राम Mon, 08/12/2019 - 11:52 नवीन
इथेच घेतली समाधी मनाने इथेच माझा अंत झाला
भारीच आवडलंय
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Mon, 08/12/2019 - 12:06 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 08/12/2019 - 15:27 नवीन
त्रिवार धन्यन्यवाद
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 08/12/2019 - 20:25 नवीन
पण नेमकं काय घडले अजिबात समजत नाही... नुसतीच कोड्यातली भाषा.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 08/13/2019 - 08:17 नवीन
मित्रा हि एका वेड लागलेल्या प्रेमपूजाऱ्याची कहाणी आहे .. सुरुवातीला बर्याच पोरी खेळलेल्या आहेत त्याने ... त्यापैकीच एक त्याला वेड लावून जाते .. बर्याच खोट्या आणाभाका घेऊन झाल्यात त्याच्या प्रेमामध्ये .. पण ह्या मुलीबरोबर नक्की शब्दांची काय देवाणघेवाण झालीय तेच त्याला आठवत नाही .. पोर जणू लावण्याची खानाचं म्हणायला हवी , जिने ह्या धुरंधर समजणाऱ्याला पार वेड लावून टाकलंय... तिने त्याची लायकी ओळखून लगेच स्वतःला सावरलं पण हा धुरंधर मात्र तिच्यामागे भरकटत गेला ..
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Tue, 08/13/2019 - 08:25 नवीन
ही कविता जेनेरिक म्हणता येतील अशी होती, त्यामुळे ती एका पेक्षा जास्त प्रसंगाना लागू होऊन नेमका कुठला प्रसंग तुला अभिप्रेत आहे याबाबत वाचकांचा नक्कीच गोंधळ उडू शकतो. मिपाचा कवी ग्रेस वगैरे तर बनायचं नाहीना तुला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ख
खिलजि Tue, 08/13/2019 - 08:33 नवीन
माझी लायकी नाही आहे रे तेव्हढे मोठे व्यक्तिमत्व होण्याची .. मला माझाच राहू देत आणि माझ्यातच मला शोधू देत .. एव्हढंच पुरेसे आहे ..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा