Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कविता: बिबट्याचे मनोगत

B — bhagwatblog, Wed, 08/14/2019 - 07:38
सिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस भरपूर पर्यटनाची मज नाही सोस माणसा सोबत संघर्षात नाही मौज भरपेट भोजन सुद्धा मिळत नाही रोज सोसायटीत ओळखीचे कुणीच नाही म्हाडात तर घर सुद्धा घ्यायचे नाही नाशिक पाहण्यात तर मला रस नाही माणसं भेटण्याचा मला आनंद नाही हिंस्त्र तरी अन्न साखळीचा हिस्सा जंगल हिरावून तुम्हीच दिला घुस्सा वनक्षेत्र खालावले साखळी तुटली आत्ता मात्र भूख सुद्धा प्रखर वाढली शोधतो व्यक्तीला, जो प्रश्न सोडवेल शोधतो स्वतःला, जिथे उत्साह सापडेल शोधतो स्वप्नांना, तिथे आसरा भेटेल शोधतो जागेला, जिथे भोजन मिळेल नोंद: बिबट्याचे जंगल सोडून अन्ना साठी शहरात येण्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट्याचे मनोगत आणि व्यथा मांडण्याचा कवितेच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.

प्रतिक्रिया द्या
4855 वाचन

💬 प्रतिसाद (6)
य
यशोधरा Wed, 08/14/2019 - 07:47 नवीन
खरं आहे..
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Wed, 08/14/2019 - 08:25 नवीन
सॉरी, भिडली नाही थोडी अजून इंटेन्स असायला हवी असं वाटते, अर्थात तुमच्या भावनांचा आदर आहे
  • Log in or register to post comments
B
bhagwatblog Wed, 08/14/2019 - 08:55 नवीन
प्रतिसादा साठी धन्यवाद महासंग्राम, यशोधरा!!! तुमच्या भावनांचा आदर आहे >> थंक्स सॉरी, भिडली नाही थोडी अजून इंटेन्स असायला हवी असं वाटते >> प्रयत्न करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
च
चौथा कोनाडा Wed, 08/14/2019 - 09:59 नवीन
बिबट्याचे मानव जसा विचार करतो तसे काव्यमय मनोगत आवडले. ( त्याचे मनोगत मानवी समस्यांसार्खे मांडल्या मुळे कवितेत त्या तीव्रतेचा प्रभावाला कमी पडते ) परिस्थिती भीषण आहे, बिबट्या, वाघ, सिंह इ. लोक सेलिब्रिटी झालेत, बाकीच्या प्राण्यांचे काय ? पक्षी, किडे, जलचर याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Wed, 08/14/2019 - 11:52 नवीन
good
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 08/14/2019 - 14:26 नवीन
मनोगत आवडले आपले .. खरंच छान आहे ..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा