आकाशवाणी ऑनलाइन
९० वर्षाहून अधिक काळ सेवेत असलेली आणि भारतात सर्वदूर पसरलेली व सर्वप्रकारच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची गंगोत्री असलेली जगातील सर्वात मोठी प्रसारण सेवा असलेली तुमची आमची आवडती आकाशवाणी आता कात टाकतेय . प्रमुख शहरातील आकाशवाणी केन्द्रे सात-आठ वर्षापासूनच ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस वर उपलब्ध होती परन्तु आता काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते अरुणाचल प्रदेश यत्र तत्र सर्वत्र असणारी आकाशवाणीची प्रादेशिक केन्द्रेही ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस वर उपलब्ध होत आहेत .
यात महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई अ , ब , विविधभारती , एफ एम रेन्बो , एफ एम गोल्ड , न्यूज सर्व्हिस यासह रत्नागिरी ,कोल्झापूर , पुणे , सांगली , सोलापूर , नागपूर ,गोवा व इतर अनेक प्रादेशिक केन्द्रे आता ऑनलाइन उपलब्ध आहेत . जगभरात कुठेही प्रसारभारती अॅप अथवा वेबसाईटच्या माध्यमातून ही सेवा ऐकता येइल ...
http://prasarbharati.gov.in/playersource.php?channel=165
https://play.google.com/store/apps/details?id=com.ionicframework.air152951
https://apps.apple.com/in/app/all-india-radio-live/id1289849764
https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews
https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867
💬 प्रतिसाद
(29)
ज
जालिम लोशन
Wed, 08/14/2019 - 20:34
नवीन
ऊपयोगी पडेल.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 08/15/2019 - 05:33
नवीन
चांगली माहिती.
सर्वांना स्वातंत्र्य वर्धापन दिन शुभेच्छा !
- Log in or register to post comments
म
मनो
गुरुवार, 08/15/2019 - 06:26
नवीन
जगभरातील केंद्रे
https://radio.garden
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 08/15/2019 - 06:34
नवीन
आकाशवाणी पुणे केंद्र अॅपवर लागत नाही. मराठी वर मुंबई केंद्राचा समावेश दिसतो. प्रसार भारतीच्या साईटवर मात्र पुणे लागते.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 08/15/2019 - 08:44
नवीन
सुंदर माहिती ! यामुळे जगात कोठेही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता येतील, ही फार सोयीची गोष्ट आहे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 08/15/2019 - 09:58
नवीन
प्रसारभारती साइटवर पुणे ,नागपूर, रत्नागिरी वगैरे लागत आहेत ती एफेम/एएम आहेत?
मुंबई अ,ब एएम लागतं का?
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
गुरुवार, 08/15/2019 - 10:49
नवीन
लाख लाख धन्यवाद मंदार भावू.
रेडिओ garden तर जबरी आहे .
तुम्ही दिलेल्या पहिली लिंक पण चांगली आहे. फक्त रत्नागिरी रेडिओ लागतं नाहीये.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 08/15/2019 - 10:55
नवीन
App भारी आहे!
खालील आपली केंद्रे appवर आहेत-
विविध भारती
AIR मराठी
AIR पुणे
FM GOLD मुंबई
FM RAINBOW मुंबई
आकाशवाणी संवादीता मुंबई
Air सांगली
Air नागपूर
Air म्हदेइ, पणजी
Air सोलापूर
Air कोल्हापूर
Air औरंगाबाद
Air रत्नागिरी
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Fri, 08/16/2019 - 12:33
नवीन
AIR पुणे कुठल्या अॅपवर आहे?
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Fri, 08/16/2019 - 19:15
नवीन
१. लेखात उल्लेख केलेल्या all india radio app मध्ये
आणि
२. प्रसारभारतीच्या app मध्ये.
https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sat, 08/17/2019 - 08:33
नवीन
मला दोन्ही ऎप मधे एआयआर पुणे मिळाले नाही. एआयाआर मराठी आहे. मला मराठी पुणे केंद्र ए एम हवे होते.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 08/17/2019 - 08:35
नवीन
मी दोन्ही app वापरून कन्फर्म केलंय.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sat, 08/17/2019 - 08:45
नवीन
माझ्याकडे हे अॅप होते. अॅन्ड्रॉईड वर मी अनइन्स्टॉल करुन परत इन्स्टॉल केले तरी फक्त ए आय आर मराठी असेच दिसते. त्यात मराठी हे मुंबई केंद्र असावे.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Tue, 08/20/2019 - 07:08
नवीन
मिळाले पुणे स्टेशन ए एम
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 08/18/2019 - 16:40
नवीन
प्रसारभारती साईटवरील एआईआर पुणे, आणि एआईआर म्हादेई पणजी म्हणजेच जुन्या मिडिअम वेव रेडिओवर लागणारी पुणे आणि पणजी केंद्रे आहेत हे दोन्ही ठिकाणचे कार्यक्रम लावून ऐकले.
रेडिओवर खरखर येते पण साईटवर स्पष्ट. फक्त फरक एवढाच की साईट अथवा ऎप दीड मिनीट मागे राहते.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 08/15/2019 - 12:33
नवीन
जुने रेडिओ ( ट्रानझिस्टर) आहेत त्यावर एएम,एफएम दोन्ही लागतं.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 08/16/2019 - 13:40
नवीन
माझ्या कडे खूप पूर्वी नोकिया चा e 11 असा कोणता तरी मोबाईल होता (मॉडेल नक्की आठवत नाही ) त्यात सर्व जगातील रेडिओ स्टेशन ऐंकण्याची सुविधा होती ऑनलाईन .
जगातील च नाही तर देशातील प्रत्येक राज्यातील रेडिओ स्टेशन सुद्धा लागायची
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Fri, 08/16/2019 - 15:17
नवीन
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 08/16/2019 - 15:59
नवीन
अरे वा... छान.. धन्यवाद
- Log in or register to post comments
ज
जुइ
Sat, 08/17/2019 - 21:06
नवीन
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद!
- Log in or register to post comments
झ
झपाटलेला फिलॉसॉफर
Sun, 08/18/2019 - 09:11
नवीन
उपयुक्त माहिती !
- Log in or register to post comments
र
रविकिरण फडके
Sun, 08/18/2019 - 19:03
नवीन
ही एकदम भारी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप आभार! आत्ता मी त्यातील उर्दू सर्व्हिस ऐकतोय. मस्त!
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 08/18/2019 - 19:18
नवीन
इंटरनेट रेडिओ आणि ऑनलाईन रेडिओ काय फरक आहे .
इंटरनेट रेडिओ खूप वर्षा पासून चालू आहे
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Sun, 08/18/2019 - 20:04
नवीन
साधा रेडिओ (IOT एनेबल नसेल तर त्या)वर इंटरनेट रेडिओ ऐकता येत नाही. पण इंटरनेट रेडिओवर साधा रेडिओ ऐकता येणे अशक्य नाही.
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Sun, 08/18/2019 - 20:01
नवीन
जिथे रेडिओ ऐकले जातात तिथे रेडिओ आहेत. जिथे नेट आहे तिथे याचा आजच्या काळात काय उपयोग ?
अर्थात कोणी ना कोणी ऐकत असेलच म्हणा
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 08/19/2019 - 06:47
नवीन
स्थानिक लोक आपापल्या राज्याचे कार्यक्रम स्वस्तात रेडिओ किंवा मोबाईलवर नेट न वापरता ऐकू शकतात.
परगावच्या लोकांना आपला माहेरचा रेडिओ इंटरनेट रेडिओतून ऐकायला मिळतो. आणि आता नेट स्वस्तच झाले आहे.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Mon, 08/19/2019 - 14:51
नवीन
गोव्याच्या केंद्राचे कार्यक्रम ऐकले.
मस्त गोड गोड कोकणी गाणी. कानाला एकदम गुदगुल्या केल्यासारखं वाटलं!!
बातम्या सगळीकडे एकावेळी लागतात. ते सोडलं तर air मराठी, पुणे, रत्नागिरी, नागपूर यांच्यावर वेगवेगळे कार्यक्रम असतात.
- Log in or register to post comments
१
१.५ शहाणा
गुरुवार, 08/22/2019 - 04:52
नवीन
खाजगी एफ एम वाहिन्या उपलब्ध आहेत का ? आमच्या ग्रामीण भागात रेडिओ वर कोणतेही एफ एम केंद्र लागत नाही .
- Log in or register to post comments
झ
झपाटलेला फिलॉसॉफर
Sun, 11/03/2019 - 12:50
नवीन
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद!
- Log in or register to post comments