Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रावणसरी

म — मायमराठी, Wed, 08/21/2019 - 08:15
।। श्रावणसरी ।। भिजून गेल्या फांद्यांवरती, बसूनी सहजच गाती पक्षी, अलगद जाई वाऱ्यावरती, सप्तसुरांची मोहक नक्षी । सुईसारख्या चोचींमधुनी, दशदिशांना निरोप जाती साद घालती कोणा कळेना, दूरदूरची ओवून नाती । फुलांफुलांचे श्वास टिपुनी, दूरदूर हे वायू वाहती, परागमोहित किटक येऊनी, मकरंदाची गाणी गाती । वसुंधरा ही नटुनीसजुनी, पशुपक्ष्यांना ठेवी भुलवुनी, भेट घेण्या तिच्या नायका, सकलसृष्टीला जाई घेऊनी । त्यांस मिळाले निरोप नकळत, तरी अजुनी दर्शन नाही, एका सरीचीच मिठी देऊनी, पुन्हा पुन्हा तो निघून जाई। त्याच मिठीने शहारते ती, गर्भधारणी हरितमोहिनी, क्षणाक्षणांची प्रसवशालिनी, स्वर्गसुंदरी ओजमानिनी । ऐश्वर्यवतीचे हास्य खुलुनी, बिंबित होई नभांत धरती, धीर कसा मग त्यास असावा, बरसत येई प्रियेवरती। चरांचरांच्या विश्रब्धाला, मानवातली संस्कृती दिसते, घराघरांला लहानमोठ्या, सणासणांतूनी ऊर्जा मिळते। ह्या सगळ्याचा अबोल कर्ता, शिलेदार तो कर्तृत्वाचा, वसुंधरेचा ओजस भर्ता, श्रावण माळे हार सुखाचा । - अभिजीत

प्रतिक्रिया द्या
4543 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ग
गणेशा Wed, 08/21/2019 - 09:28 नवीन
मस्त लिहिली आहे
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 08/21/2019 - 13:13 नवीन
मिपाचे जुने जाणते लोक परतताना बघून खरॉखर तीव्र मंदी सुरू झाल्याची भावना तीव्र झाली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ब
बाजीगर गुरुवार, 08/22/2019 - 23:47 नवीन
क्या बात है अभिजीत राव....खूप सुंदर कविता. बालकवींची आठवण झाली. प्रासादिक, गेय नादमय, चित्रदर्शी.... छा गये ! वाह वाह !!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 08/23/2019 - 08:39 नवीन
खूप छान!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/23/2019 - 18:25 नवीन
आवडली रचना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मायमराठी Fri, 08/23/2019 - 19:40 नवीन
प्रोत्साहनाबद्दल खूप खूप आभार .
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 08/24/2019 - 07:31 नवीन
छंदबध्द कविता आवडली. बाकीबाब आठवले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मायमराठी Mon, 08/26/2019 - 06:16 नवीन
पैजारबुवा!, 'बाकीबाब आठवले' आपले हे शब्द माझ्यासाठी कोणत्याही सत्काराहून कमी नाहीत. बोरकरांचे काव्य म्हणजे अमृत, वाचणारे अमर नाही झाले तरच नवल. नवख्या सभासदाच्या कोवळ्या प्रयत्नांना एवढ्या उच्च दर्जाच्या लायकीचे मानणाऱ्या आपल्या मोठेपणाला दंडवत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
साहित्य संपादक Tue, 05/12/2020 - 18:09 नवीन
नमस्कार मायमराठी, आपणास व्यनि केला आहे. याच कवितेसंदर्भात आहे. कृपया पहावा!
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Tue, 05/12/2020 - 20:43 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा