"गोकूळाष्टमी स्पेशल"गोपाळकाला by Namrata's CookBook :१६
Primary tabs

साहित्य Ingredients:

२ वाटी जाड पोहे(नेहमी पोह्यासाठी जे वापरतो ते पोहे)
१ वाटी मुरमुरे/चिरमूरे
१ लाह्या
हिरव्या मिरच्या ३(आवडीप्रमाणे)
डाळे
शेंगादाणे(भाजून)
डाळिंब
१ वाटी घट्ट दही
मीठ
साखर
कोथिंबीर
तेल/तुप
जिरे
हळद
मोहरी (आवडीप्रमाणे)
काकडी,केळी, सफरचंद (आवडीप्रमाणे)
लोणचे (आवडीप्रमाणे)
क्रमवार पाककृती:
१. पोहे २-३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या(पोहे जास्त भिजवायचे नाहीत फक्त ओले करायचे).
२. एका भांड्यात पोहे , मुरमुरे/चिरमुरे , ज्वारीच्या लाह्या घालून चान एकत्र करुन घ्या
३. आता डाळे , शेंगदाणे (भाजलेले), बारीक चिरलेली मिरची (अर्धी चिरलेली मिरची बाजूला ठेवावी), दही घालून छान मिक्स करा.
४. आता यामध्ये हळद(optional), चवीनुसार मीठ , साखर , डाळिंब घाला
(आपण काकडी, सफरचंद, केळी देखील घालू शकता)
५. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा
६. आता फोडणीसाठी कढईत तेल / तुप घाला ,तेल गरम झाले की जिरे, बारीक चिरलेली मिरची घालून १ मिनीट परतून घ्या
७. तयार फोडणी गोपाळकाला मध्ये घालून छान मिक्स करुन घ्या
गोपाळकला तयार आहे

अधिक टिपा:
आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये काकडी, सफरचंद, केळी देखील घालू शकता
रेसिपीचा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/4JI3IVKWy3o
वाह, मस्तंच. किती छान दिसतंय. बाकी सगळे घटक पदार्थ आहेत माझ्याकडे आत्ता घरात फक्त लाह्या नाहीत. लाह्या नाही टाकल्या तर चालेल का? काही पर्याय सुचवू शकाल का?
धन्यवाद .
लाह्या असल्या तर उत्तमच नाही घातल्या तरी चालतील.
नक्की करून बघा :)
वेगळी चव असेल.