Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कृष्णजन्म

म — मायमराठी, Fri, 08/23/2019 - 18:12
कान्हा ! कुठून रे अक्षरं आणू? कसे शब्द बांधू? कश्या भावना गुंफू? हजार नावं घेऊ? का शब्दब्रह्म गाऊ? तुळशींनी सजवू? मनमखरात बसवू? का पंचप्राणंच अर्पू? सगळंच उष्टावलयंस तू ? कशाचा नैवेद्य दाखवू? निळाईसंग उत्तुंग आभाळी, सावळदंग अभंग सावली, मिस्कीलढंग अनंग माऊली, मयूरपंखी रंग तुझ्या कपाळी ।। सावरीत मुग्ध अलगुज, ऐकवीत गुप्त हितगुज, खेळवीत मुक्त गाईगुजं, प्रकटीत तृप्त आत्मगुज ।। तुज प्रकाशे चेतविती, संध्या या गर्भवती, शुद्ध चैतन्या प्रसविती, पुन्हा आकाशी उगविती ।। जन्मांचा जन्म जिथे, मृत्यूंचाचा मृत्यु जिथे, दिशांचा अंत जिथे, नियतीला खंत जिथे ।। शब्दांना सारूनी मागे, देहाला ठेवुनी जागे, बुद्धीचे तोडूनी धागे, येऊ का रे एकदा तिथे? ।। नसे मी पुण्यवान पार्थ, ना दुर्योधनाचा स्वार्थ, ना गमे श्रद्धेचा आर्त, न कळे ज्ञानाचा अर्थ ।। सावत्र कर्म बांधलेली, उलगडूनी हीन झाली, धर्मकथा व्यर्थ गेली, सहा श्वाने नीती नेली ।। निलाजऱ्या जीवाने बांधली पूजा, हसऱ्या तमाने रेखिल्या भुजा, कोरड्या विवेके घेतल्या सजा, पोरक्या मतीने जप सारा वजा ।। तुझी गीता ठेवुनी माथी, चाललो आम्ही वाळवंटी, ज्ञानामृत ते असुनी हाती, वणवणलो पाण्यासाठी ।। का असा खेळ व्हावा? तुझ्या या अंशाला , तुझ्याच मायेचा दंश व्हावा? कृष्ण कृष्ण नाम घेता, स्वर्ग इथे उष्ण व्हावा? देऊळातल्या देणग्यांना, हावऱ्या जीभांचा स्पर्श व्हावा? का धर्म मर्म भगवा वासनांनी उष्टवावा ।। नको ती वांझ मुक्ती, नको तो अगम्य स्वर्ग, एकदाच या अवनी, मनामनांत कृष्णजन्म व्हावा। - अभिजीत श्रीहरी जोगळेकर

प्रतिक्रिया द्या
2267 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/23/2019 - 18:18 नवीन
प्रासंगिक आणि छान. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 08/23/2019 - 18:36 नवीन
खुप सुरेख.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 08/23/2019 - 18:42 नवीन
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 08/24/2019 - 05:31 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा