चालू घडामोडी : सप्टेंबर २०१९
नमस्कार !
समस्त मिपाकरांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा !
आसाममधे एनआरसी ने प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीतून जवळ जवळ १९ लाख नागरीकांची नावे वगळली आहेत.
सुमारे १९ लाख नागरिक एनआरसीने जाहीर केलेल्या यादीतून बाहेर राहिले आहेत. शनिवारी सकाळी ही यादी जाहीर करण्यात आली. सरकारी कारवाई टाळण्यासाठी या लोकांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. यापूर्वी गेल्या जुलैमध्ये जाहीर झालेल्या एनआरसीच्या मसुद्यात ४१ लाख लोकांची नावे नव्हती. सुमारे ३ कोटी ११ लाख नागरिकांचा या यादीत समावेश आहे. राज्यातील बेकायदा स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी ही यादी तयार करण्यात आली आहे. यापूर्वी १९५१मध्ये अशा प्रकारची यादी जाहीर करण्यात आली होती.
यादीत मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या असण्याची शक्यता सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे. ओवेसींनी भाजपावर पुन्हा एकदा मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप केला आहे. ही यादी पुन्हा जरी तपासली आणि ५०% टक्के यादी जरी बरोबर म्हटली तरी ९-१० लाख हा घुसखोरीचा आकडा प्रचंड मोठा आहे. सरकार एवढ्या मोठ्या लोक संख्येवर कारवाई करु शकणार का हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.
आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार काय ? ह्यावर रोजच वर्तमानपत्रात छापून येत आहेत. मात्र "आमचं ठरलयं" असं दोन्ही पक्ष सांगतात त्यामुळे नेमके काय होईल याचा अंदाज अजून येत नाहिये.
राष्ट्रवादीचे बडे नेते तर सोडून चाललेतच पण आता पवारांचे नातेवाईक देखील सोडून चाललेत. कालच मुख्यमंत्र्यांनी पुढचा विरोधी पक्ष नेता काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचा नसेल तर वंचित आघाडीचा असेल असे वक्तव्य केले. महाराष्ट्रातील निवडणूका दिवाळीपूर्वीच पार पडतील असा अंदाज आहे.
चतुर्थी आणी चतुर्दशीला नेहमीप्रमाणे गणेश भक्त गावी जाताना / येताना ट्राफीक जाम मधे तासन तास अडकतील, त्यांचे कसे हाल झाले, रस्ते कसे खराब झाले आहेत, कोणत्या गल्ली च्या राजाला किती किलो सोने मिळाले अशा नेहमीच्या बातम्या येत्या १० दिवसात जास्त प्रमाणावर दिसतील. मंदिमुळे सणावर कसा परिणाम झाला हे वाचायला मिळेल.
मिपावर एखाद दुसरा ध्वनीप्रदुषण, पर्यावरणात्मक / प्रबोधनपर लेख येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या सर्व अडचणींवर मात करुन असे न म्हणता, या सर्व अडचणी आहेत तशा स्वीकारुन किंवा जमल्यास त्यांना वळसा घालून आपण गणरायाचे स्वागत करुया, १० दिवस राजकारणापासून शक्य झाले तर सुट्टी घेऊन नातेवाईक, कुटुंबियांना भेटूया, एकत्र येऊ या आणि गणेशोत्सव साजरा करुया. आणि हो, मिपा श्रीगणेश लेखमालेचा आनंद घेऊया.
धन्यवाद !
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !
💬 प्रतिसाद
(92)
स
स्वलिखित
Sun, 09/01/2019 - 08:02
नवीन
आमच्या इकडे ऊसाला कोल्हे लागल्यावर कोल्हे बाहेर काढत नाहीत, ऊस पेटऊन देतात
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/01/2019 - 08:25
नवीन
HAL-made "Dornier 228" aircraft can now be used in Europe
हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडने (HAL) बनविलेल्या "Dornier 228" या विमानाला भारताच्या Directorate General of Civil Aviation (DGCA) ने २०१७ मध्येच व्यापारी वापराचे प्रमाणपत्र दिले आहे. आता, त्याला European Union Aviation Safety Agency (EASA) नेही प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे, या "मेड इन इंडिया" विमानाची युरोपला निर्यात होण्याचा मार्ग खुला झाला आहे.
हे कमी अंतराच्या विमानप्रवासासाठी वापरले जाणारे हे १९ आसनांचे विमान ४२८ किमी/तास वेगाने ७०० किमी अंतर पार करू शकते.
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Tue, 09/03/2019 - 01:52
नवीन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वच्छ भारत अभियान राबविल्याबद्दल बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून पुरस्कार जाहीर झाला आहे.
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Tue, 09/03/2019 - 02:08
नवीन
विक्रम आणि प्रज्ञान ने चंद्र यान सोडले.
आता चंद्राकडे कूच. चंद्राच्या अज्ञात क्षेत्रात उतरण्याचे श्रेय्य भारतास मिळणार.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Tue, 09/03/2019 - 11:06
नवीन
JNU प्रशासनाने " द रोमिला थापर" ला
आपला बायोडेटा सादर करायचा आदेश दिला आहे . गेली २३ वर्ष "रोमिला थापर" JNU मध्ये प्रोफेसर होती. सध्या 86 वर्षाची रोमिला थापर JNU ची
एमिरेटस प्रोफेसर ( आजन्म प्राध्यापक) आहे. सर्वसाधारण पणे प्राध्यापक वयाच्या ६० साली निवृृृृृत्त होतात पण काही खास लोक आजन्म कमाई करत असतात. नेहरु खानदानातली म्हणजे खुपच खास !! डाव्या विचारसरणीची रोमिला थापर ही पं नेहरुची नातेवाईक आहे !!
रोमिला थापरला बायोडेटा मागीतल्यावर बाकीचे डावे पेटुन उठले आहेत ! ह्यात आघाडीवर आहे डाव्या विचारसरणीचा ईरफान हबिब !
ह्याच डाव्या विचारसरणीच्या लोकांनी भारताच्या ईतिहासाला पुर्णपणे बदलल ! शुरवीर हिंदु राज्यांचा सुवर्णकाल पुर्णपणे पुसुन टाकला. ईतकच नाही तर अयोध्येच्या रामजन्म भुमिला हिंदु नव्हेतर जैन बुद्ध धर्मासंबधीत स्थळ अशी नवी ओळख दिली .
- Log in or register to post comments
म
माकडतोंड्या
Tue, 09/03/2019 - 15:26
नवीन
ही बया कलंक आहे इतिहास संशोधन क्षेत्राला
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Tue, 09/03/2019 - 11:50
नवीन
+१००
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/03/2019 - 15:09
नवीन
Tough to prove 'Kashmir genocide' claim: Pakistan's ICJ lawyer
काश्मिरबाबत जगभर कांगावा करत फिरणार्या पाकिस्तानच्या गालावर, प्रत्येक देश आणि आंतरराष्ट्रिय संस्था, चपराक लावत आहेतच. पण, आज त्यांच्यावतीने आंतरराष्ट्रिय कोर्टात केस लढविणारा (उदा : कुलभूषण जाधव केस) वकील, खवर कुरेशी, यानेसुद्धा टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत घरचा आहेर दिला आहे !
वकिलाने त्या मुलाखतीत, "आंतरराष्ट्रिय कोर्टात भारताविरुद्ध काशिमरमध्ये नरसंहाराचा किंवा इतर कोणता मुद्दा घेऊन जाण्यासाठी पाकिस्तानच्या हाती कोणताच सबळ पुरावा नाही", असे स्पष्टपणे सांगितले. हाच एक मुद्दा पाकिस्तानच्या हाती उरला होता, तोसुद्धा फुसका असल्याचे त्यांच्याच वकिलाने सांगितले आहे. त्यामुळे, आता यापुढे अजून काय काय "खोटे मुद्दे बनवावे" असा प्रश्न पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयला पडला आहे (याबाबतीत, इम्रानचा विचार करण्याचा प्रश्नच नाही... त्या बिच्यार्याला ना डोके आहे, ना काही ठरवण्याचा अधिकार... त्याला केवळ लिहून दिलेली पोपटपंची करण्याचा आदेश पाळावा लागतो). :)
***************
युरोपियन युनियनने पाकिस्तानला अजून एक धक्का दिला आहे
इयुच्या अधिकृत मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात, "३७० कलमाला रद्दबातल केल्यामुळे अतिरेकाला ताब्यात आणण्यासाठी मदत होईल", असे विधान केलेले आहे. ही तर भारताची अधिकृत भूमिका आहे. त्यामुळे, इयुकडून पाकिस्तानला काही भीक घातली जात नाही, हे स्पष्ट होत आहे.
Abrogation of Article 370 will help curb terrorism, says European Parliament
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Tue, 09/03/2019 - 18:03
नवीन
M O Mathaiच्या पुस्तकातुन ,
When we talk of former Prime Minister Indira Gandhi, many Congressmen say that she is the Iron Lady of India; she divided Pakistan into two and many more. But will they speak up about the dark secrets of her?
M.O. Mathai was the Private Secretary to India’s first Prime Minister, Jawaharlal Nehru. He served as Nehru’s special assistant from 1946 to 1959. But Nehru’s personal secretary got too personal with Indira Gandhi. Yes, M.O. Mathai who was with Nehru, knew everything about the Nehru family, actually a bit too much. Mathai wrote a book named “Reminiscences of the Nehru Age” in which he has stripped naked the Nehru family. Several secrets of Nehru is revealed .
In his book Mathai has shown immense respect towards Nehru but he has even openly spoken out of the intimate relationship Nehru had with Edwina, Padmaja Naidu (Sarojini Naidu’s daughter), Mridula Sarabhai and many others. Nehru was deeply busy in impressing these ladies that he forgot to take care of India. Eventually, India lost the 1962 Indo-China war.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 09/04/2019 - 13:39
नवीन
मनमोहन सींग पंत प्रधान व चिद्दु फायनांस मिनिस्टर असताना काँग्रेसच्या काळात शेतकर्यांच्या आत्महत्या होत असत
ह्याच्या पेक्षा लाजीरवाणी गोष्ट नसेल !!
का ?
अहो घरच्या बागेत, कुंडीतल्या बागेत फायनांस मिनिस्टर चिद्दु लाखो / कोटी रुपयाच्या भाज्या उगवत असे. अश्या भाज्यांमुळे फायनांस मिनिस्टर चिद्दुचे ईंनकंम टॅक्स रिटर्न्सचे आकडे फुगलेले होते असे साक्षात ईंनकंम टॅक्स अधिकार्यांनीच मुलाखतीत सांगीतले !!
इतकी प्रगत पद्धतीने घराच्या गच्चीवत बाग फुलवुन कोट्याधी रुपये कमावणार्या फायनांस मिनिस्टर चिद्दुला भारतातील गरीब शेतकर्यांना अशी प्रगत पद्धत शिकवावेसे का वाटले नाही हा प्रश्न मला पडलेला आहे.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 09/04/2019 - 13:41
नवीन
कॉग्रेसच्या कर्नाटकातील नेते शिवकुमारच्या नावावर १२५ फ्लॅट मुंबईत आहेत. ह्या शिवाय बर्मिंगहॅम, युरोप दुबईत मध्ये व्हीलाज , मॉल सुद्धा आहेत. राजकारण सुरु करताना सुरुवातीला त्याची पॉपर्टी फक्त ७५ कोटी होती , आता ती फुगुन तब्बल ८५० कोटी झालेली आहे.
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Wed, 09/04/2019 - 20:23
नवीन
छे छे !! असे कसे ??
आपण खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेऊ नये. लोकसत्ताच्या मते शिवकुमार वर हे सगळे कथित भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 09/05/2019 - 15:47
नवीन
शेवटी चिदंबरमला सु कोर्टाने तिहाड जेल मध्ये आज पाठवले.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 09/05/2019 - 16:59
नवीन
अरे काय हे?
आरोप आणि गोळा केलेले पुरावे ठेवा ना कोर्टासमोर पटापट. उगाच वेळ जातोय.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 09/05/2019 - 17:57
नवीन
>>>>>आरोप आणि गोळा केलेले पुरावे ठेवा ना कोर्टासमोर पटापट.<<<<<
आरोपी चिद्दुवर "पुराव्याची छेडछाड करणार" ह्या कारणाने कोर्टा समोर पुरावे सादर करत नाहीत अशी कारणे दिलेली आहेत !!
चिद्दुवर ६-७ केस वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत !!
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 09/05/2019 - 18:01
नवीन
जागतिक किर्तीचे नेते मा. मोदीजी जगातील पहीले असे पंत प्रधान ठरले आहेत ज्यांना सर्वात जास्त दुसर्या देशाचे सर्वोच्च सन्मान मिळालेले आहेत !
भारताच्या पंत प्रधाना पैकी असे दुसर्या देशाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे मन मोहन सिंग व श्रिमती ईंदिरा गांधी आहेत ज्यांना प्रत्येकी एक सन्मान मिळाला . तो पण बांग्ला देशाचा !!
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 09/05/2019 - 18:04
नवीन
अब्दुल बासित तुम्हाला आठवत असेलच !! तोच ज्यांने शोभा डे ला भारत सरकारच्या काश्मिर विरुद्ध लेख लिहायला सांगितले होते !! ह्या बासित ने हल्लीच एक फोटो ट्विट केला,
पण त्याच्या ह्या खोट्या फोटोचा पर्दा फाश झाला !! फोटोतले पाॅर्न कलाकार असल्याच समोर आले !! हे कळल्यावर बासितने ट्विट पुसला ! पण ट्रोल झालाच !! हाईट म्हणजे त्या पाॅंर्न कलाकाराने सुद्धा बासितला जवाब दिला !
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 09/05/2019 - 18:28
नवीन
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 09/05/2019 - 18:44
नवीन
संजय दत्त आणि राहुल गांधी यांच्या काय नात आहे ?
"मोतिलाल नेहरु" यांच्या बर्याच बायकांपैकी एक होती "दिलीपा देवी". ही नवाबाच्या दरबारी गायिका होती.
मोतिलाल नेहरु" व "दिलीपा देवी"ची मुलगी "जद्दन देवी". ही सुद्धा एक गायिका होती. "नर्गिस " ही ह्या जद्दन देवी"ची मुलगी !! "संजय दत्त" हा ह्या नर्गिसचा मुलगा !!
संजय दत्त व राहुल गांधी हे नातेवाईक आहेत.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 09/17/2019 - 09:34
नवीन
चड्डीवाल्यांची आणखी एक नवी वावडी.
उचलली जीभ आणि लावली आभाळाला……..
कुठच्या कुठे लिंक जोडल्या आहेत.
उद्या म्हणाल की ब्रेट ली आणि ब्रूस ली हे दोघे भाउ भाउ आहेत म्हणून.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 09/05/2019 - 19:28
नवीन
1. Unbiased Proud
2. Anti-Establishment Biggrin
3. journalist Rofl
Ravish Kumar on ecomomic slowdown
https://twitter.com/Gujju_Er/st
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 09/05/2019 - 19:30
नवीन
https://twitter.com/Gujju_Er/status/1169545719524364289
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Fri, 09/06/2019 - 12:28
नवीन
मा मोदीजींचा साधेपणा !!
रशिया तल्या वोलाॅडीवोस्टाॅक यैथे भरलेल्या अती पुर्व देशांच्या संम्मेलनानंतर झालेल्या प्रेस काॅंफेरेंस मध्ये मा मोदीजींसाठी स्पेशल सोफा व दोन्ही बाजुला ईतर देशांच्या नेत्यांसाठी खुर्च्या ठेवलेल्या होत्या. मा मोदीजीनी हे बघितल्यावर सोफा हटवुन ईतर नेते बसणार तशीच खुर्चीची व्यवस्था करण्यास सांगुन तिथे उपस्धित सगळ्या नेत्यांची मन जिंकली !!
https://youtu.be/ymv3KmaVM2Q
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Mon, 09/09/2019 - 21:23
नवीन
व्यवस्थित मांडामाड करून फोटो सेशनच्या ऐनवेळी मोडींनी तो गुबगुबीत सोफा हटवायला लावून आपल्या हट्टी स्वभावाचे दर्शन घडवले. मोडी समर्थक भक्तगण अहो रूपम वगैरे गुणगान करायला मोकळे झाले!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 09/07/2019 - 17:52
नवीन
हाँग काँग मधील लोकशाही अधिकार कायम ठेवण्यासाठी चाललेली निशस्त्र नागरिकांची शांतीपूर्ण निदर्शने आणि चिनी पोलिस रबर बुलेट्स, अश्रूधूर आणि दंडूकेशाहीने मोडून काढत आहेत...
हाच चीन भारताला काश्मिरमध्ये लोकशाही तत्वे पाळायचा सल्ला देतो आणि पाकिस्तानला संयुक्त राष्टात मदत करतो.
ढोंगीपणाची कमाल म्हणजे, काश्मिरच्या अतिरेकी आणि फुटीरतावद्यांच्या बाजूने फेकन्युज फॅक्टरी चालवणारे भारतिय डावे, प्रेस्टिट्युट्स, बीबीसी, न्युयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, अॅम्नेस्टी, इत्यादी हाँग काँगच्या बाबतीत पायात शेपटी घालून गप्प आहेत.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/08/2019 - 11:02
नवीन
Chandrayaan-2: We got the image of Vikram lander, communication yet, says Isro chief
भारताच्या चंद्रयान२ प्रकल्पातील, चंद्रावर उतरणार्या "विक्रम" या भागाचा, चंद्रापासून २.१ किमी दूर असताना, पृथ्वीशी संपर्क तुटला. मात्र, चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत असलेल्या "ऑर्बायटर" यानाने, चंद्रावर उतरलेल्या "विक्रम"चे फोटो घेऊन पृथ्वीवर पाठवले आहेत.
जर विक्रम उत्तम अवस्थेत असेल आणि त्याच्या कार्यप्रणाली सुरु होऊन, परत संदेशवहन करू लागल्या, तर चंद्रयान मोहिमेचे चंद्राच्या पृष्ठ्भागावरचे संशोधन सुरु करता येईल. तसे झाले नाही तरीही, सर्व प्रकल्प फुकट गेला असेही नाही. कारण, सुमारे ९५% संशोधन प्रणाल्या ऑर्बायटरवर आहेत व त्या उत्तम अवस्थेत आहेत. ऑर्बायटर पुढील ७.५ वर्षे चंद्राभोवती फेर्या मारत आपले निर्धारीत काम करत राहणार आहे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 09/08/2019 - 15:54
नवीन
डॉक्टर सुहास म्हात्रे,
आत्तापर्यंतच्या सर्व बातम्यांत केवळ संपर्क खंडित झाला इतपतच माहिती आहे.
वाहिन्यांवर व इतरत्र मोहीम ९५% यशस्वी झाली म्हणजेच थोडक्यात फसली असं म्हणण्यात येतंय. मात्र विक्रम खरोखरंच आपटलंय का ते आजूनही नक्की झालं नाहीये. कदाचित ते व्यवस्थित उतरलं असेलही. अशा परिस्थितीत परत संपर्क प्रस्थापित होऊही शकतो.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/09/2019 - 21:27
नवीन
"विक्रमचे हार्ड लँडिंग झाले आहे. त्याचे तुकडे झालेले नाहीत पण ते एका बाजूला कललेल्या अवस्थेत आहे, असे ऑर्बिटरवरून मिळालेल्या फोटोत दिसत आहे आणि त्याच्याशी अजून संपर्क साधणे शक्य झालेले नाही." असे इस्रोने दिलेल्या निवेदनात सांगितले आहे.
विक्रमची संदेशवहन यंत्रणा चंद्राच्या पृष्ठभागाच्या २.१ किमीवर असताना बंद पडली होती ती अजून सुरू झालेली नाही. पॉवर सप्लायला धोका पोहोचल्याने ती बंद पडलेली असली तर अजून काही आशा आहे... कारण, विक्रमवर सोलार डिश आणि एक छोटी आपत्कालीन वापराची बॅटरी आहे. सद्याच्या विक्रमच्या स्थितीत संदेशवहन करणारी अँटेना त्याच्या खालच्या बाजूला आहे. (अ) पॉवर सप्लाय सुरु झाला आणि (आ) जर संदेशवहन अँटेनालाशी ऑर्बायटरला संपर्क करता आला, तर काही उपाय होऊ शकेल. मात्र, हे सगळे पर्याय सद्या तरी फक्त, "जर तर" असेच आहेत. त्यामुळे, प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर शास्त्रिय निरिक्षणे करणे विक्रमला सद्या तरी शक्य नाही. तरीही, विक्रमवरच्या प्रणाल्यांचा जीवनकाल ७ ऑगस्टपासून १४ दिवसांपर्यंत आहे... व २१ तारखेपर्यंत इस्रोचे संशोधक विक्रमला कार्यरत करण्याचा प्रयत्न चालूच ठेवणार आहेत.
दु:खात सुखाची गोष्ट अशी की शास्त्रिय संशोधनासाठी पाठवलेल्या प्रणाल्यांपैकी ९०-९५% ऑरबायटरवर आहेत, त्या १००% सुस्थितित आहेत आणि त्यांनी काम सुरू केले आहे... ते काम पुढचे १ वर्ष किंवा जास्त वेळ चालू राहील.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 09/10/2019 - 19:01
नवीन
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 09/10/2019 - 19:02
नवीन
लँडरचा ऑर्बिटरशी संबंध झालाय.
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Wed, 09/11/2019 - 03:09
नवीन
.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Wed, 09/11/2019 - 04:38
नवीन
नाही हो.
हे मिडियावाले टिआरपीसाठी किती उतावीळ झालेले असतात, ते सांगतोय.
https://youtu.be/ACJmWXD5fWM
ही लिंक आमच्या नातेवाईकांच्या ग्रुपवर फिरली व सगळ्यांनाच मनस्ताप झाला.
मिडियासाठी काहीतरी आचारसंहिता पाहिजे बाॅ.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 09/10/2019 - 19:05
नवीन
लँडरचा ऑर्बिटरशी संबंध झालाय.
असं इंडिया टिव्हीवर ७ तारखेला का सांगितल जात होतं कळत नाही.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/10/2019 - 20:59
नवीन
आजच्या दिवसाचे इस्रोचे अधिकृत निवेदन असे आहे...
September 10, 2019
Vikram lander has been located by the orbiter of Chandrayaan-2, but no communication with it yet. All possible efforts are being made to establish communication with lander.
इस्रो वेळोवेळी देत असलेली अधिकृत माहिती पुढील दुव्यावर मिळेल : https://www.isro.gov.in/chandrayaan2-latest-updates
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Wed, 09/11/2019 - 04:40
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Mon, 09/09/2019 - 18:01
नवीन
NDTV चे पत्रकार पल्लव बागला !!
तोच, जो ईज्रोच्या पत्रकार परिषदेत ईज्रो शास्त्रज्ञांवर खेकसत होता. शेवटी जेंव्हा प्रकरण अंगावर शेकल तेंव्हा सगळ्यांची माफी मागीतली !!
त्यावर NDTV च्या अध्यक्ष प्रणय राॅयच म्हणण होत की पल्लव बागला ने जे केल ते चुकीच होत. पण पल्लव बागलाने ईज्रोची सेवा शास्त्रज्ञांपेक्षा जास्त केलेली आहे . त्यावर नेटकर्सनी
पल्लव बागलाची पाळमुळे च खणुन काढली. त्या नेटकर्सनुसार पल्लव बागलाने ईज्रोचे फोटो परवानगी शिवाय गेट्टी नावाच्या साईटला विकल्या !! प्रत्येक फोटोचे ₹२६,००० प्रमाणे.
शेवटी NDTV च्या पत्रकाराकडुन अजुन काय अपेक्षा असेल !!
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Mon, 09/09/2019 - 19:44
नवीन
व्हाट्सएपवर पाठवून तमाम मित्राचीं दिवसभर डोकी तापवली होती , पण त्याने इसरो चे फोटो विकले ही नवीनच माहिती भेटली .
धन्यवाद !!!
लिंक शोधून पुन्हा डोकी तापवायला घेतो .
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Mon, 09/09/2019 - 21:34
नवीन
यू टर्न स्पेशलिस्ट अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांना सकासकाळी घाई होते. मग ते बसल्या बसल्या बोटे हळुवारपणे फिरवत ट्वीटींग करून सरकारचे धोरण बदलून टाकणारे संदेश पाठवतात. काहींना घरी पाठवतात. तर काहींना आपली नियुक्ती झाल्याचे कळते. इम्रान खानची फिरकी घेऊन त्यांना खुषीत घरी पाठवल्यावर पुढल्या ट्वीटींग वरून कळते की आपण तर उल्लू बनलोय!
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 09/11/2019 - 12:26
नवीन
अभिनव कुमार IPS यांचा काश्मिर बद्दल एक चांगला लेख इंडियन एक्सप्रेसमध्ये आला आहे. राष्ट्रप्रेमी जिज्ञासुंनी जरुर वाचावे.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 09/11/2019 - 12:30
नवीन
लेख वाचला, आवडला.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/11/2019 - 13:10
नवीन
सुंदर वास्तविक आणि समतोल लेख.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/11/2019 - 15:49
नवीन
यथातथ्य लिखाण
अगदी असाच दृष्टिकोन माझ्या काश्मीर मधील लष्करी मित्रांकडून पाहायला मिळतो.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/11/2019 - 18:06
नवीन
काश्मिरच्या बाबत जगभर थयथयाट करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार्या पाकिस्तानला घरचे आहेर मिळण्याचे काही थांबत नाही ! =))
१. Kuwait refuses to allow anti-India protest by Pakistani groups
कुवेतमधील All Pakistan Overseas Organisation International (APOOI)ने भारताने ३७० कलम रद्दबातल करण्याविरुद्ध आणि काश्मिरमधील कारवाईविरुद्ध निषेध मोर्चा काढण्याचे ठरवले होते. पण, कुवेतने त्याला परवानगी नाकारली इतकेच नव्हे तर, त्या संघटनेच्या तीन मुख्य पाकिस्तानी म्होरक्यांना कैद केले.
२. UAE tells Pakistan, Kashmir is not all Muslim community issue
भारताच्या काश्मिर कारवाईविरुद्ध इस्लामी देशांचे (उम्मा) मत तयार करण्यासाठी व भारताला त्याचे निर्णय परत घेण्यासाठी दबाव आणण्याच्या उद्येशाने, पाकिस्तानने सौदी अरेबिया आणि युएई या दोन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना खास आमंत्रण देऊन बोलविले होते. परंतु, पाकिस्तानला ठाम नकार देवून दोन्हीही परराष्ट्रमंत्र्यांनी, "काश्मिर प्रश्न उम्माचा (जगभरच्या सर्व मुस्लिम समाजाचा) नसून तो भारत व पाकिस्तानमधील द्विराष्ट्रिय प्रश्न आहे." असे पाकिस्तानच्याच भूमीवर सांगून पाकिस्तानला उलटे लटकावून मिरच्यांची धुरी दिल्यासारखे केले आहे !
अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत, फार मोठी मुस्लीम लोकसंख्या असलेला अण्वस्त्रधारी देश म्हणून उम्मामध्ये (जगभरच्या सर्व मुस्लिम समाजामध्ये) दबदबा असलेल्या पाकिस्तानला, इतके घरचे जोडे यापूर्वी कधीच मिळाले नव्हते (किंबहुना, तसे करण्याचे धाडस सौदी अरेबियासकट कोणत्याच देशाने केले नव्हते) !!! =)) =)) =))
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Wed, 09/11/2019 - 19:22
नवीन
ट्रम्पतात्यानी अफगनिस्तानमधून सैन्य पाठी घ्यायला नकार दिला. आता या निर्णयाचा पाकिस्तानच्या राजकारणावर क़ाय परिणाम होईल हे पाहणे मनोरंजक ठरेल. याचा दूसरा अर्थ असाही होत आहे की अमेरिकेला आता मनापासून पाकिस्तान बेभरवशाचा व धोकादायक वाटत आहे.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 09/12/2019 - 11:22
नवीन
भारत रक्षा मंत्रालय व अमेरिकेच्या डिफेंस सेक्रेटरी हॉट लाईन ने लवकरच जोडले जाणार आहेत अशी बातमी आज आलेली आहे.
भारत व अमेरिके दरम्यान उच्च स्तरीय बोलणी सुरु आहे त्या वेळेला ह्यावर शिक्का मोर्तब होईल. पण हॉट लाईन त्या अगोदरच सुरु
झालेली असेल.
ह्या नविन बातमीमुळे पिओके मध्ये मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे असा संशय येत आहे. आता अमेरिकेच्या नविन स्टांस मुळे, पाकिस्तानच्या व चीनच्या धोरणामुळे अफगानिस्तानला भारताबरोबर जमिनीने डायरेक्ट जोडण्यासाठी
पिओके ला खुप महत्व आलेले आहे. त्यात चीनने पिओके मध्ये सिपीईसी प्रोजेक्टवर बराच खर्च केलेला आहे. युनओ मध्ये दाखल केलेला पिओके हा भारत व पाकिस्तान मधला वादग्रस्त भुभाग आहे. त्यामुळे चीनने तेथे केलेली ईनवेस्टमेंट ही बेकायदेशीर आहे हे चीनला सुद्धा माहीती आहे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 09/12/2019 - 14:22
नवीन
डँबिस००७,
एकंदरीत पाकव्याप्त काश्मीर मुक्त होणारसं दिसतंय. सैन्यप्रमुख बिपीन रावतांचं हे वक्तव्य सूचक आहे : https://www.loksatta.com/desh-videsh-news/government-should-decide-on-pok-army-is-ready-says-army-chief-bipin-rawat-aau-85-1970649/
पाकव्याप्त काश्मिरातला एकरस्तारेलमार्गाचं काम थांबवावं अशी मागणी भारताने चीन व पाकिस्तानकडे केलीये : https://obortunity.org/2019/09/10/india-asks-china-pakistan-to-end-activities-related-to-cpec-in-pok/
मोदी पक्का लबाड, लुच्चा व डांबरट इसम आहे. रस्ता बांधून होईस्तोवर तोंडातनं चाकर शब्द काढला नाही. तयार झाल्यावर मात्र मानभावीपणे काम थांबवायला सांगतोय. हा रस्ता भारतीय मारगिरीच्या टप्प्यांत आहे हे रस्त्यावरचे शेंबडे पोरही सांगेल. पण ते पाकिस्तानला समजवायचे कोणी! मोदींनी ही बाब हेरून नेमकी खेळी केली. बांधून झालेल्या रस्त्याने वाहतूक सुरू व्हायला हवी असेल तर चीनला पाकिस्तानची नसून भारताची गरज आहे. आगे बढो मोदी!
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 09/15/2019 - 09:36
नवीन
शरद पवारांनी पाकीस्तान बद्दल प्रेम व्यक्त केल्याची वृत्ते आहेत. त्यांच्या नेमक्या भाषणाची क्लिप युट्यूबवर मिळाली नाही किंवा हल्ली त्यांचे बोलणे क्लिअर ऐकणे कठीण झाल्यामुळे गोंधळ होत आहेत की उतरत्या वयात सोडीयमची कमतरता झाल्यामुळे येणारे डिसओरीएंटेशन आहे ?
विशीष्ट समुदायास लक्ष्य करणे बद्दल टिका , मॉबलिंटींगवर टिका ३७० काढण्याच्या पद्धतीवर टिका इत्यादी ठिक आहे.
म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे त्यांना?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 09/15/2019 - 09:41
नवीन
संदर्भ मटा , अबीपी माझा
याचा अर्थ काय होतो ?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 09/15/2019 - 17:34
नवीन
पवार साहेब म्हणतात की पाकिस्तान म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण बनवलं जात आहे. संदर्भ : https://abpmajha.abplive.in/mumbai/sharad-pawar-on-india-pakistan-issue-in-ncp-minority-rally-mumbai-698396
अहो, पण नेमक्या याच समीकरणावर पाकिस्तान ओरबाडून वेगळा करण्यात आला ना? मग आजून वेगळी फूट कसली? भारत पाक एकीकरण व्हायला पाहिजे, असं पवार साहेब आडून आडून सुचवंत आहेत की काय!
-गा.पै.
- Log in or register to post comments
ज
जालिम लोशन
Sun, 09/15/2019 - 17:46
नवीन
निवडणुकीच्या तोंडावर पवार मुस्लिम लांगुचालन करत आहे. आणी फोरमपण तोच निवडला आहे.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »