Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संध्याकाळी तू गंगेतीरी

श — शिव कन्या, Sun, 09/01/2019 - 08:44
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.... तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे बघू देत लोकांना देवांना साधुंना माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून तिच्या देहात लयदार मिसळताना..... संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला सांग ना तुलाही असेच वाटते ना कुठूनतरी समुद्राने वाट काढावी नाहीतर गंगेने पदर उलटा करावा चार व्याकुळ डोळ्यांत प्रलय व्हावा... संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला माहित आहे तुला माहित आहे लाटांना माहित आहे हाक त्यांचीच तर आहे धावणाऱ्या रक्ताला मी फुलांनी अडवले आहे नशिबाची कविता तिच्या लयीत सोडली आहे ...... संध्याकाळी तू..... शिवकन्या

प्रतिक्रिया द्या
5061 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ज
जॉनविक्क Sun, 09/01/2019 - 13:06 नवीन
कुठूनतरी समुद्राने वाट काढावी नाहीतर गंगेने पदर उलटा करावा विस्तारून सांगाल काय ?
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sun, 09/01/2019 - 16:39 नवीन
समुद्र आपली मर्यादा ओलांडून वाट शोधेल का? नाही. गंगा कधी उलटी वाहील का? नाही. पण तिला वाटते हे असे अघटीत काहीतरी घडावे, आणि त्याची भेट व्हावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/01/2019 - 16:47 नवीन
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला सांग ना तुलाही असेच वाटते ना कुठूनतरी समुद्राने वाट काढावी नाहीतर गंगेने पदर उलटा करावा चार व्याकुळ डोळ्यांत प्रलय व्हावा... खास. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/02/2019 - 14:04 नवीन
छान...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रांजण गावाला, गावाला, महागणपती नांदला... :- Kartiki Barge | Unplugged |
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा